• वाल्मिकी समाज सभागृह निर्मितीमुळे वचनपूर्तीचा आनंद • आमदार साजिद खान पठाण यांचे प्रतिपादन अकोला : माझ्या राजकीय जडणघडणीत अठरापगड जातीधर्माच्या मंडळीचा मोलाचा वाटा असून त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंतचा माझा राजकीय प्रवास करू शकलो. त्यात भरीस भर म्हणून वाल्मिकी समाजबांधवांनी प्रत्येक वळणावर मला निरपेक्ष मदत केली. अकोला महानगरपालिकेचा विरोधीपक्षनेता असतांना वाल्मिकी समाजबांधवांशी जुळलेले ऋणानुबंध उत्तरोत्तर दृढ होत गेले. आज अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून वाल्मिकी समाज सभागृहाचे उदघाटन करतांना वचनपूर्तीचा आनंद माझ्या मनात ओसंडून वाहत आहे असे भावनिक प्रतिपादन आमदार साजिद खान पठाण यांनी केले. प्रभाग क्र. 07 मधील विजय नगर, तारफैल, अकोला येथे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते वाल्मिकी समाज सभागृहाचे उद्घाटन सोमवारी उत्साहात पार पडले. प्रभाग क्र. 07 मधील विजय नगर, तारफैल, अकोला येथे वाल्मीकि समाजासाठी सभागृह नसल्याने सदर समाजातील नागरिकांना त्यांचे कार्यक्रम साजरे करण्यासाठी मोठी अडचण निर्माण व्हायची. साजिद खान पठाण...