मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यातील नृत्य कला प्रोत्साहीत करणारा उत्सव : पीएसआय सौ.मालती कायते

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी लुटला नवरात्र -गरबा नृत्य आनंद  विद्यार्थ्यातील नृत्य कला प्रोत्साहीत करणारा उत्सव : पीएसआय सौ.मालती कायते अकोला :  भारतीय संस्कृतीतील सर्वच धर्म पंथ यामधील उत्सव हे मानवाला आनंद निर्माण करून देणारे प्रवाह असून विद्यार्थी जीवनात या उत्सवांचे आयोजन हे आपल्यातील कला गुणांना प्रोत्साहीत करणारे असावे, असे भावार्थ विश्लेषण अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशनच्या अधिकारी पीएसआय  सौ. मालती कायते यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थानिक बाभूळगांव येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झालेल्या नवरात्र उत्सवाच्या गरबा नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात पी एस आय मालती कायते यांनी उद्धाटक या नात्याने विद्यार्थ्यांना शिस्त व कायदा याबाबतही मोलाचे मार्गदर्शन केले.         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात तथा प्रमुख अतिथी या नात्याने सौ.अपर्णा शिरीषराव धोत्रे तथा सौ. दिपाली प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.         कार्यक्रम शुभारंभा अगोदर सर्...

🔷 मासिक राशीभविष्य 🔷 (बुधवार, दि. १ आॕक्टोबर २०२५)

     🔷   मासिक  राशीभविष्य    🔷      (बुधवार, दि. १  आॕक्टोबर २०२५)        संवत 2082, शक संवत 1947 (विश्ववसु संवत्सर), अश्विन. दशमीनंतर संध्याकाळी 07:01 पर्यंत नवमी तिथी . नक्षत्र पूर्वाषाद सकाळी 08:06 पर्यंत आणि त्यानंतर उत्तराषाढ. रात्री 12:33 पर्यंत अतिगंड योग , त्यानंतर सुकर्म योग. करण बलव सकाळी 06:39 पर्यंत, कौलव नंतर संध्याकाळी 07:01 पर्यंत, तैतिल नंतर.              🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶                   राशीभविष्य  🔷  मेष राशी :-        मेष राशी :- ग्रहांची जुळवाजुळव व्यावसायिक प्रयत्नांमध्ये क्षमता असलेला एक परिपूर्ण दिवस दर्शवते. तुमच्या संवाद क्षेत्रात चंद्राचा प्रभाव तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे आणि धैर्याने मांडण्यास प्रोत्साहित करतो. टीमवर्क नवीन दृष्टिकोन आणत असताना सहयोगी प्रकल्प चमकतात. वैयक्तिक आघाडीवर, तुमच्या नातेसंबंधांच्या आरोग्याचा विचार करा; प्रामाणिकपणाने कोणत्या...

• हेमांडपंथी शिल्पकलेचा एक उत्कृष्ठ व अप्रतिम नमुना

प्राचीनतेची साक्ष देणारे बार्शिटाकळीतील श्री कालंका माता मंदिर • शारदीय नवरात्रीत भाविक भक्तांची मोठी गर्दी • हेमांडपंथी शिल्पकलेचा एक  उत्कृष्ठ व अप्रतिम नमुना    (ज्येष्ठ पत्रकार मुफीज खान) बार्शिटाकळी :  शहरातील श्री कालंका माता मंदीरा मध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केल्या जात आहे. बार्शिटाकळी शहराची आध्यात्मीक ओळख व अकोला जिल्ह्यातील भावीकांचे शक्तीस्वरूप जागृत देवस्थान म्हणून बार्शीटाकळी शहरातील श्री कालंका माता राष्ट्रीयस्मारक भवानी मंदिर मागील अनेक शतकांन पासून विदृपा नदीच्या काठावर बसलेले आहे. कालंका माता भवानी मंदिर अति प्राचिन व हेमाडपंथी काळातील असल्याने तात्कालीन शिल्पकलेचा एक उत्कृष्ठ व अप्रतिम नमुना आहे. आर्कषक व मनमोहक काळ्या दगडा वरील कोरीव नक्षीकाम या मंदिराच्या ऐैतीहासीक प्राचिनतेची साक्ष पटवते.  वर्षभर पंचक्रोशीतील भावीकभक्त नवरात्रीत  हर्षउल्हासात कालंका मातेच्या दर्शनाकरिता मोठ्या संख्येने  या ठिकाणी येतात, नवरात्रीत नऊ दिवस कालंका माता स्वतः मंदिरात असल्याचा साक्षात्कार भक्तांना होत असल्याचे त्यांच्याकडून सां...

🔷 आजचे दैनिक राशीभविष्य 🔷 (मंगळवार, दि. ३० सप्टेबर २०२५)

  🔷   आजचे    दैनिक राशीभविष्य    🔷      (मंगळवार, दि. ३०  सप्टेबर २०२५)        विक्रम संवत 2082, शक संवत 1947 (विश्ववसु संवत्सर), अश्विन. अष्टमी तिथीनंतर नवमी संध्याकाळी 06:06 पर्यंत. पूर्वाषाढानंतर सकाळी 06:17 पर्यंत नक्षत्र मूळ. सकाळी 01:02 पर्यंत शोभन योग , त्यानंतर अतिगंड योग. करण बाव संध्याकाळी 06:06 पर्यंत, बलव नंतर.       🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶                   राशीभविष्य  🔷  मेष राशी :-        तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यस्त असेल. तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतील. तुमच्या क्षमता सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी किंवा करिअरशी संबंधित काहीतरी साध्य होऊ शकते. उत्पन्न आणि खर्च समान असतील. 🔷   वृषभ  राशी :-          आज तुम्हाला महत्त्वाच्या कामांमध्ये वरिष्ठांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. अपूर्ण कामांना गती मिळेल. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स खरेदी...

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जयंती समारोह उत्साहात संपन्न

पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रतिक  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस    पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जयंती समारोह उत्साहात संपन्न दीनदयाल संस्थेच्या प्रकल्पांची पाहणी यवतमाळ , दि. 29 (जिमाका) : समाजातील गोर-गरीब, वंचित दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले. त्यांचा एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पाहोचविण्यासाठी दीनदयाल सेवा प्रतिष्ठान हे प्रतिक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हसंराज अहीर, माजी आमदार मदन येरावार तसेच दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव, पदाधिकारी ज्योती चव्हाण, डॉ. मनोज पां...

शिवचरणपेठ येथील गेल्या 60 वर्षांपासून अखंडपणे श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाची परंपरा

शिवचरणपेठ येथील श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने 30 सप्टेंबरला होमहवन अकोला :  जुनेशहरातील  शिवचरणपेठ येथील  गेल्या 60 वर्षांपासून  अखंडपणे श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ विधिवत स्थापना करुन नवरात्रीचा जागर करण्यात येतो. यंदाचे 60 वे वर्ष आहे. येत्या मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी नवसाला पावणाऱ्या आईचे अष्टमी ला होमहवन आयोजन करण्यात आले आहे. नवसाला पावणारी आई म्हणून ख्याती आहे. अनेक भक्तांना याचा साक्षात अनूभव आला आहे. 60 वर्षाची  अखंड परंपरा कायम ठेवत अनेक भक्तगण येथे नवस कबूल करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी या ठिकाणी आवर्जून  येतात. दि 4 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1.00 वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकभक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळा  तर्फे करण्यात आल्याचे मंडळाचे योगेश कुटाफळे यांनी कळविले आहे.

दर्यापूर परिसरातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक - विश्वस्त प्रा.गजानन रामकृष्ण भारसाकळे यांच्या गोसेवा कार्यातील एका नाविन्यपूर्ण संशोधन

गोसेवेतील नाविन्यपूर्ण संशोधनाला कॉफीराईट मान्यता                 प्रा. गजानन भारसाकळेंचे              पर्यावरणीय तथा शेती विकासाचे          प्रभावी कार्य                          अकोला :  एखाद्या वैशिष्टपूर्ण कार्यासाठी केंद्र शासनाच्या निकषानुसार समाधानकारक कार्यपूर्तता झाल्यानंतर  भारत या कार्याला सरकारची कॉफीराईट मान्यता प्रमाण पत्राद्वारे प्रदान करण्यात येते. दर्यापूर परिसरातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक - विश्वस्त प्रा.गजानन रामकृष्ण भारसाकळे यांच्या गोसेवा कार्यातील एका नाविन्यपूर्ण संशोधन कार्याला भारत सरकारकडून नुकतेच कॉपीराईट प्राप्त झालेले आहे.          त्यांच्या संशोधनाचे शिर्षक " गायीच्या शेणापासून बायो-एनर्जी आणि सेंद्रिय खते निर्मितीद्वारे शाश्वत ग्रामीण विकास" असे असून हे केवळ शास्त्रीय दृष्टीकोनातून महत्वाचे नाही तर ग्रामीण भागाच्या आ...

🔷 आजचे दैनिक राशीभविष्य 🔷 (सोमवार, दि. 29 सप्टेबर 2025)

  🔷   आजचे    दैनिक राशीभविष्य    🔷      (सोमवार, दि. 29  सप्टेबर 2025)         विक्रम संवत 2082, शक संवत 1947 (विश्ववसु संवत्सरा), अश्विन  सप्तमी तिथी दुपारी 04:32 पर्यंत, त्यानंतर अष्टमी, नक्षत्र मूळ  सौभाग्य योग सकाळी 01:00 पर्यंत, त्यानंतर शोभन योग | करण वणीज दुपारी 04:32 पर्यंत, त्यानंतर विष्टी 05:23 पर्यंत, त्यानंतर बव.       🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶                   राशीभविष्य  🔷  मेष राशी :-        आज तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ दिवस आहे. मोठी आर्थिक समस्या दूर होऊ शकते. कुटुंबात शांती आणि आनंद राहील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद वाढेल. 🔷   वृषभ  राशी :-          आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात फायदेशीर ठरेल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे संकेत आहेत. 🔷  मिथुन राशी :-    ...

• मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली भरीव मदत

      • श्री गजानन महाराज            संस्थान, शेगावकडून      पूरग्रस्तांसाठी १ कोटी ११       लाख रुपयांची मदत • सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवत सेवा परंपरेचा जागर शेगाव  –  महाराष्ट्र राज्यात यावर्षी अतिवृष्टीने मोठे संकट ओढवले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून पुरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव (पब्लिक ट्रस्ट रजि. नं. A-250, बुलडाणा) या श्रद्धास्थानाने सामाजिक बांधिलकी जोपासत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. १ कोटी ११ लाखांचा निधी सुपूर्द केला आहे.       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस      यांच्याकडे धनादेश सुपूर्द दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी श्री संस्थानच्या वतीने हा मदतनिधी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृतरित्या धनादेशाद्वारे (Cheque) सुपूर्द करण्यात आला.  ...

रविवारी प्रसिद्ध होणारा स्तंभ 'कवडसा'

"सस्पेन्शन ऑर्डर करा ! ....."         जा गा बदलली, प्रदेश बदलला,  देश बदलला म्हणजे संस्कृती ,प्रथा - परंपरेत नक्कीच काहीतरी बदल होत असतो. प्रत्येक बदल हा काही चांगलाच असतो असं नाही. प्रत्येक प्रथा हीच समाजहिताची , लोककल्याणकारी असते, असंही नाही किंवा नसतेच असेही नाही. काही प्रथा मात्र निश्चितपणे लोकहितासाठी, समाजातील दुर्बल घटकांसाठी असतात आणि त्या सर्वच ठिकाणी असतात. खरं म्हणजे कोणत्याही समाजामध्ये असलेल्या प्रथा आणि परंपरा ह्या विशिष्ट हेतूने लोककल्याणकारी आणि दुर्बल घटकांसाठी असाव्यात, अशी अपेक्षा असते मात्र कालांतराने त्यामध्ये कुणाचा तरी  स्वार्थ जोडला जातो आणि त्या प्रथांची पूर्ती वाट लागली जाते लावली जाते. मग उरतात केवळ प्रथा आणि परंपरा .जेवढे लोक ,जेवढ्या पद्धती जेवढ्या संस्कृती असतात ,तेवढ्याच त्यांच्या ठिकाणी काही प्रथा असतात. कोणत्याही धर्म , कोणतीही प्रथा ,कोणतीही संस्कृती , मूळात वाईट नसते कारण ती निर्माण करण्यामागे हेतू हा नक्कीच लोकहिताचा असतो मात्र कालांतराने बदल होत होत त्यात  काही माणसांचा स्वार्थ शिरतो आणि मग उरते निव्वळ प्रथा - परंप...

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टातच प्रखर लढा देऊ : प्रकाश पोहरे

विविध संघटनांद्वारे " कृषी योद्धा " प्रकाश पोहरे यांचा भावपूर्ण सत्कार   शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टातच प्रखर लढा देऊ :  प्रकाश पोहरे अकोला :   शेतकऱ्यां प्रति शासनाची संवेदना शून्य वृत्ती, वारंवार येणारी नैसर्गिक संकटे आदींमुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहेत. या समस्या सोडविण्यासाठी कितीही आंदोलने केली तरी पाहिजे तसे यश मिळत नाही. ही बाब विचारात घेऊन आता लवकरच एका जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टातूनच या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू. असे प्रतिपादन शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश  पोहरे यांनी केले                 भारतीय किसान परिसंघाच्या  (शिफा) राष्ट्रीय सचिव पदावर प्रकाश पोहरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्थानिक मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आज त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. आपल्या या सत्कारास उत्तर देताना प्रकाश पोहरे  बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कृषी नेते महाद...