मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

🔶 भूतान येथे 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात झेप हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. त्या ग्रंथात सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ व मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी लिहिलेला सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या वरील लेख समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो असा-🔶

 महाबीजचे महाव्यवस्थापक            दिलीप स्वामी               म हाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोबर  2025 रोजी एक परिपत्रक काढून छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांचा महसूल विभागाच्या कामकाजात गतिमानता आणणारा  "महसूल विभागाची कार्यपद्धती"  हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.         यापूर्वी देखील सोलापूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना श्री दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये जो प्रयोग केला होता तो देखील महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दिलीप स्वामी पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जात आहे. ही कार्यपद्धती  लोकांशी समन्वय साधणारी आणि कर्मचाऱ्यांचे उत्तरदायित्व वाढविणारी आहे.  श्री दिलीप स्वामी यांची उपजिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड केल्यानंतर  त्यांची पहिली  नेमणूक  अमरावती येथे झाली. त्यांच्याबरोबर श्री अविनाश हदगल व संजय...

🌹आरोग्य धनसंपदा...!

       हाडे कमजोर का होतात?      हाडांसाठी आवश्यक घटक     शरीराला कसे मिळवायचे?   आ पली हाडे बाहेरून कठीण दिसतात; पण ती जिवंत ऊती आहेत. शरीरात सतत जुने हाड कमी होऊन त्याजागी नवीन हाड तयार होत असते. जेव्हा हाडांची झीज होण्याचा वेग नवीन हाड तयार होण्यापेक्षा जास्त होतो, तेव्हा हाडांची ताकद आणि घनता कमी होऊ लागते. यासाठी फक्त Calcium पुरेसे नसते. शरीराला अनेक पोषक घटकांची आवश्यकता असते. 1. Calcium — हाडांच्या मजबुतीसाठी दूध, दही, पनीर, रागी, तीळ, कडधान्ये आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात नियमित समावेश करा. 2. Vitamin D — Calcium शरीरात शोषण्यासाठी  योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश घ्या. Vitamin D कमी असल्याचे रक्ततपासणीत आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने supplement घ्या. 3. Protein — हाडांची Collagen रचना आणि स्नायूंसाठी डाळी, कडधान्ये, दूध-दही, पनीर, अंडी, मासे किंवा आपल्या आहारपद्धतीनुसार इतर protein-rich पदार्थ नियमित घ्या. 4. Magnesium आणि इतर minerals बदाम व इतर nuts, बिया, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि विविध भाज्या यांचा संतुलित आह...

संशोधनानुसार, एका व्यक्तीने दिवसभरात ८ ग्लास पाणी प्यायला हवे

दिवसभरात किती पाणी प्यायला हवं?         आ पल्या शरीराचे वजनात जवळपास ६० टक्के पाण्याचा समावेश आहे. शरीरातील बहुतांश क्रियांसाठी पाण्याची गरज असते. पेशींपर्यंत पोषक घटक पोहोचवणे, अनावश्यक पदार्थ बाहेर टाकणे, जेवण पचवणे अशा क्रियांसाठी पाणी लागते. शरीरात पाणी कमी झाले, तर डिहायड्रेशन, गोंधळ आणि चक्कर येण्यासारख्या समस्या येऊ शकतात. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलाच हवे. शरीराला किती पाणी हवे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यात वजन, शरीराचा आकार, तापमान, शारीरिक हालचाली आदी.       संशोधनानुसार, एका व्यक्तीने दिवसभरात ८ ग्लास पाणी प्यायला हवे. पुरुषांनी ३ लिटर पाणी प्यायला हवे. महिलांनी दिवसभरात २ लिटर पाणी प्यायला हवे आणि मुलांनी दिवसभरात ६ ते ८ कप पाणी प्यायला हवे. गर्भवती महिलांनी दिवसभरात १० ते १२ ग्लास पाणी प्यायला हवे.        जर शारीरिक हालचाली जास्त करत असाल आणि उष्ण वातावरणात राहत असाल, तर तुम्ही जास्त पाणी प्यायला हवे. किडनी किंवा ह्रदयांचा आजार असेल, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्यायला हवे.      ...

आजचे राशिभविष्य गुरुवार,दि.१ आक्टोंबर २०२६

                            सुविचार . १२५   वेळ आणि संधी पुन्हा मिळत नाहीत. आजचे राशिभविष्य  गुरुवार,दि.१ आक्टोबर २०२६ आजचे पंचांग  विक्रम संवत 2083, शक संवत 1948 (पराभव संवत्सर), भाद्रपद, दुपारी 12:35 पर्यंत पंचमी तिथी , त्यानंतर षष्ठी पहाटे 04:27 पर्यंत नक्षत्र रोहिणी, त्यानंतर मृग रात्री 09:17 पर्यंत सिद्धी योग , त्यानंतर व्यतिपात योग करण तैतिल दुपारी 12:35 पर्यंत, त्यानंतर गार रात्री 11:25 पर्यंत, त्यानंतर वणीज राशिभविष्य  मेष राशी :- कामावरील एखादे जुने काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळू शकतो आणि तुमच्या वरिष्ठांच्या तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसायात ग्राहकांशी संबंधित एखादे प्रकरण तुमच्या फायद्याचे ठरू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळा. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याला मदत करण्याची गरज भासू शकते. वृषभ राशी :- आजचा दिवस विशेष महत्त्वाचा असू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात एका जुन्या ओळखीचा...

अकोला पूर्व मतदारसंघात कोरड्या दुष्काळाची भीषणता

आ. रणधीर सावरकरांनी बांधावर जाऊन घेतला आढावा, शेतकऱ्यांना दिला धीर 🔷अकोला : अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी आज मतदारसंघातील टाकळी बुद्रुक, हनवाडी, किनखेड या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि पाणीटंचाईच्या समस्येची माहिती घेतली. यावेळी गावातील शेतकऱ्यांसोबत सविस्तर संवाद साधत त्यांच्या व्यथा, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या. "हिंदुस्थानचा शेतकरी हा देशाचा कणा आहे. आज निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात आहे, पण या संकटात आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," असे मत आमदार सावरकर यांनी व्यक्त केले. पिण्याच्या पाण्यासाठी विशेष नियोजन येणाऱ्या काळात केवळ शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभाग, जिल्हा प्रशासन आणि सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने संपर्क साधून दुष्काळावर कशी मात करता येईल...

🔘 दर मंगळवारी प्रकाशित साप्ताहिक स्तंभ सरळ सरळ

अबब...हृदयरोगाचे प्रमाण ३२ टक्के ! '‘दिल की हिफाजत सिर्फ दवा से नही होती, अच्छी आदतों से जिंदगी खूबसूरत होती !         २९ सप्टेंबर... जागतिक हृदय दिन! जगभरात हा दिवस हृदयविकाराबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. हृदयविकाराचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर उपचार याबाबत या दिवशी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. पण प्रश्न असा आहे की, वर्षातून एक दिवस हृदयाची आठवण करून उपयोग काय? कारण हृदयाला काळजीची गरज वर्षभर असते!       जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २०२२ मध्ये हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे जगभरात सुमारे १९.८ अर्थात सुमारे दोन कोटी दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. हे जगातील एकूण मृत्यूंच्या सुमारे ३२ टक्के आहे. यातील मोठा हिस्सा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे होतो.  म्हणजेच हृदयरोग ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची समस्या राहिलेली नसून ती जागतिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे.       भारताची परिस्थितीही चिंताजनक आहे. WHO च्या भारतविषयक माहितीनुसार, २०१६ मध्ये भा...

🌹भूतान येथे होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात महाराष्ट्राचे माजी माहिती आयुक्त संचालक श्री देवेंद्र भुजबळ त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथातील सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांचे केलेले शब्दांकन

    अमरावतीच्या  विभागीय       आयुक्त श्रीमती नयना गुंडे            श्री मती नयना गुंडे हया सध्या अमरावती विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा माझा परिचय गोंदियाला त्या जिल्हाधिकारी असताना पासूनचा आहे. एक कर्तव्यदक्ष कार्यतत्पर सनदी अधिकारी म्हणून त्यांचा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे. त्या नाशिकला आदिवासी विभागाच्या आयुक्त असताना मी व ज्युनिअर आयएएस हा दुस-या वर्गापासून शालेय विद्यार्थ्यांना आय ए एस चे प्रशिक्षण विभाग सांभाळणारे लातूरचे संस्कार प्रकाशनाचे संचालक श्री ओमप्रकाश जाधव यांच्यासह त्यांना भेटलो होतो.       अतिशय तत्परतेने निर्णय घेणाऱ्या या सनदी अधिकाऱ्याचा त्यादिवशी प्रत्यय आला. मी माझे व्हिजिटिंग कार्ड आतमध्ये पाठविताच श्रीमती नयना गुंडे मॅडमनी ताबडतोब मला व लातूरचे श्री ओम प्रकाश जाधव यांना आतमध्ये बोलाविले. मी थोडक्यामध्ये त्यांना मिशन आयएएस समजावून सांगितले.        त्या म्हणाल्या हा उपक्रम चांगला आहे .हा संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या विभागात राबविण्यासाठी मला ...

आजचे राशिभविष्य बुधवार,दि.३० सप्टेंबर २०२६

                            सुविचार . १२४            स्वतःवर प्रेम करा. आजचे राशिभविष्य  बुधवार,दि.३० सप्टेंबर २०२६ आजचे पंचांग  विक्रम संवत 2083, शक संवत 1948 (पराभव संवत्सर), भाद्रपद. चतुर्थी तिथीनंतर दुपारी 02:55 पर्यंत पंचमी . नक्षत्र भरणी सकाळी 07:36 पर्यंत आणि कृतिका 06:02 पर्यंत रोहिणी पर्यंत. रात्री 12:20 पर्यंत वज्र योग , त्यानंतर सिद्धी योग. &करण बलव दुपारी 02:55 पर्यंत, कौलव नंतर 01:46 पर्यंत, तैतिल नंतर. राशिभविष्य मेष राशी :- कामाची सुरुवात व्यस्त वेळापत्रकाने होऊ शकते. तुम्ही एक जुना प्रश्न सोडवण्यात सक्रिय भूमिका बजावाल. कामाच्या ठिकाणी तुमची मते स्पष्टपणे मांडणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात, घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी समोरच्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेणे चांगले. दुपारनंतर आर्थिक बाबी अधिक स्थिर होऊ शकतात. वृषभ राशी :- तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन कामाच्या ठिकाणी एक समस्या सोडवण्यास मदत करेल. व्यवसायात ग्राहक किंवा भागीदारासोबत सुरू असलेल्या चर्चेत प्रगती होऊ शक...
"बदलाची लहर: भारतातील दलित महिला पत्रकारांचा उदय"                  लेखक              प्रा. राहुल गोवर्धन माहुरे           शांतीनगर, जुनेशहर, अकोला              मोबा. 9822278925   ख रं पाहता दलित शब्द वापरु नका असे लोक म्हणतात परंतु जे सत्य आहे त्याला काही केल्या नाकारता येत नाही. जी ‘जात’ नाही ती ‘जात’ यासारखे दलित शब्दाचे झाले आहे. असो..     आरक्षणाच्या नावाने जे लोक बोटं मोडतात ज्यांच्या कपाळावर आठ्या पडतात त्यांना एक गोष्ट सांगायला पाहीजे स्पर्धा किंवा बरोबरी ही नेहमी समान तुल्यबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये होत असते. हजारो वर्षांपासून ज्यांना माणुस म्हणून ही स्विकारल्या गेले नव्हते  निसर्ग निर्मीत पाण्यासाठी ज्यांनी संघर्ष करावा लागला. आम्ही देखील मानव आहोत हे सांगण्यासाठी हजारो वर्षे सतत लढा द्यावा लागला. त्या लोकांना शिक्षण कशाशी खातात हे ही माहीत नव्हते डॅा बाबासाहेब आंबेडकर यांना ही शाळेच्या बाहेर बसुन शिकावे लागले. हि गो...
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सूचना मंगळवारी प्रसिध्द 🔶 अमरावती, दि.२९ (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली असून त्यानुसार विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ, अमरावती यांनी निवडणुकीची सूचना आज प्रसिद्ध केली आहे.        निवडणूकीसाठीची नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांचेकडे मंगळवार ६ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत विभागीय आयुक्त यांचे कार्यालयात सभागृह क्र. २ तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील.       नामनिर्देशनपत्रांची छाननी ब...

भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत 4 गोल्ड,4 सिल्वर मेडल,1 ब्राँझ मेडल प्राप्त केले

        शालेय क्रीडा स्पर्धेत               भिकमचंद खंडेलवाल             विद्यालयाच्या खेळाडूंचे                    सुयश     अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक बॉक्सिंग व कुस्ती स्पर्धेत भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत 4 गोल्ड,4 सिल्वर मेडल,1 ब्राँझ मेडल प्राप्त केले.    पियुष शेंडगे, दीपक पवार,  विश्वदीप गोपनारायण,अथर्व सानप यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले. ओम मेहरे,चिंना इंगळे, पियुष भोजने,  प्रज्वल डोंगरे यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले, तर आदित्य वानखडे ब्राँझ मेडल प्राप्त केले.       तसेच अवनी ग्लोबल फाऊंडेशन तर्फे आयोजित आजीबाईचा बटवा विज्ञान मॉडेल प्रतियोगिता मध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सहभाग नोंदविला. त्यांना डाॅ. श्रीवास्तव मॅडम ...
  भुतान 'सावरकर'  संमेलन    देवेंद्र भुजबळ स्वागताध्यक्ष १५ वे स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन भूतानच्या थिंपू  राजधानीत येत्या २ ऑक्टोंबर रोजी होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ  लेखक सुधीर सेवेकर,  स्वागताध्यक्ष   सावरकरांच्या पत्रकारितेचे अभ्यासक तथा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ,  संमेलनाचे निमंत्रक भाऊ सुरडकर, कार्याध्यक्ष स्नेहल पाठक, भूतानच्या राज परिवारातील सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.       सावरकरांच्या अनेक पैलूंवर मान्यवरांचे लेख असलेल्या  स्मरणिकेचे, देवेंद्र भुजबळ यांच्या "झेप ",शैलजा देशपांडे यांच्या "अनादि मी,"या  पुस्तकांचे प्रकाशन या वेळी  होणार आहे. संमेलनाची काही  वैशिष्ट्ये: - एका परिसत्रात ज्येष्ठ साहित्यिका प्रा. स्नेहल पाठक ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर कुटुंबातील  "तीन अग्निशिखा" हा विषय मांडणार आहे. - अस्मिता शिंगोटे ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ , पांढरकवडा या शाखेची  वाटचाल सांगणार आहेत.  - ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक वाकोडकर हे स्वातंत्र्यवीर सावरक...

🌹मंत्रालयातील मा.माहिती संचालक श्री देवेंद्र भूजबळ यांच्या 'भूतान' येथील वि.दा. सावरकर साहित्य संमेलनात प्रकाशित होणा-या झेप या संपादित ग्रंथातील हा लेख...!

      प्रशासनातील एक                 दैदीप्यमान दीपस्तंभ :अपर  मुख्य सचिव विकास           "जि तनेवाले कोई अलग काम नहीं करते,   वे हर काम अलग ढंग से करते हैं!"- शिव खेरा           ही ओळ श्री. विकास खारगे यांच्या व्यक्तिमत्त्वावर तंतोतंत खरी उतरते. ते सेकंदात विचार करतात, सेकंदात निर्णय घेतात आणि सेकंदात कृती करतात.        एक जुलै 2026. सकाळची वेळ. माझ्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर नाव पाहिले तर... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव राहिलेले  आणि आता महाराष्ट्राचेच अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांचे नाव दिसले! माझ्या 73 राव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी हा फोन केला होता. विचार करायला लावणारी बाब: मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव राहिलेले व  विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाही अशा अविश्वसनीय व्यस्ततेतूनही त्यांनी माझ्यासाठी वेळ *काढला*. मला भेटून बोलण्यापेक्षा पी.ए.ला फोनवर...
             पितृपक्ष : आयुर्वेद           आणि संस्कार    भा रतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण-उत्सवामागे केवळ धार्मिक विधी नसून जीवन जगण्याची एक विशिष्ट दृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांची परंपरा दडलेली आहे. पितृपक्ष हा त्याच परंपरेतील एक महत्त्वाचा काळ. आपल्या पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या चांगल्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हा पितृपक्षाचा मुख्य भाव आहे. ॥ कृतज्ञतेची संस्कृती ॥ ‘पितर’ म्हणजे केवळ दिवंगत पूर्वज नव्हे, तर आपल्या अस्तित्वाला आकार देणाऱ्या मागील पिढ्यांचे प्रतीक म्हणूनही त्यांच्याकडे पाहता येते. त्यांनी दिलेले संस्कार, ज्ञान, परंपरा, अनुभव आणि जीवनमूल्ये यांचे स्मरण करण्याची संधी पितृपक्ष देतो.        श्राद्ध, तर्पण, पिंडदान, अन्नदान यांसारख्या प्रथा विविध कुटुंबांमध्ये आणि प्रदेशानुसार वेगवेगळ्या पद्धतीने पाळल्या जातात. या विधींच्या धार्मिक अर्थाबरोबरच त्यामागील कृतज्ञता, स्मरण, संयम आणि दानशीलता ही मूल्येही महत्त्वाची आहे...