खिला जो मेरा दिल... लेखक • डॉ.मोहन खडसे संवाद : 9823289010 मा णसाच्या जगण्यात काय महत्त्वाचे आहे? याचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असण्याची शक्यता असते. कुणी म्हणेल आनंद महत्त्वाचा, कुणी म्हणेल पैसे महत्त्वाचे, कुणी म्हणेल प्रतिष्ठा आणि लोकोप्रेम महत्त्वाचे ! मात्र कुणाला असं वाटत असेल तर ते चुकीचं नाहीच की समाधान महत्त्वाचे आहे. आता पुन्हा तेच की प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्रत्येकाचा विचार हा महत्त्वाचा आहे आणि त्याचा सन्मान करणे, हे इतरांचे कर्तव्य आहे, जे पूर्ण केले म्हणजे समाधान आपोआप मिळते.संवाद आणि चर्चा नेहमीच होत असतात. कुणी कुणाशी संवाद करताना व्यक्त होणे, हा एक भाग असू शकतो तर त्या व्यक्त होण्यातून इतरांना काही सांगणे, हा दुसरा भागअसू शकतो. असंच एकदा चर्चा सुरू असताना एकजण दुसऱ्याला म्हणाला, 'मला तुमच्यासाठी काही करणे हा आनंदाचा विषय कमी मात्र समाधानाचा विषय जास...