मुख्य सामग्रीवर वगळा




         22 वर्षापूर्वीची स्थापना  

                लेखक :

           •  प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे 

                 संवाद : 9890967003


         मिशन आयएएस आज संपूर्ण भारतामध्ये काम करीत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्राचे माजी तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री उद्धव ठाकरेसाहेब यांचे प्रधान सचिव व आताचे अपर मुख्य सचिव मा.श्री विकास खारगे यांच्या हस्ते बारा मे 2000 रोजी अमरावतीच्या दंत महाविद्यालयात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री अभिनय कुंभार आय आर एस.( .शिराळा जि.सांगली आता आयकर आयुक्त पुणे)अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री धनराज खामतकर व प्रा.अमोल पाटील हे होते .अमरावती शहरात स्पर्धा परीक्षेसाठी सुरू झालेला व विनामूल्य सेवा देणारा हा पहिला उपक्रम.

       त्यापूर्वी अमरावती शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी एकही ग्रंथालय किंवा अभ्यासिका उपलब्ध नव्हती.  परंतु विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे कोषाध्यक्ष प्राचार्य श्री बाबुराव उर्फ अण्णासाहेब हिवसे यांनी पुढाकार घेतला व या उपक्रमाची मुहूर्तमेढ अमरावती शहरात 12 मे 2000 रोजी करण्यात आली. या 25  वर्षात मिशन आयएएसने संपूर्ण भारतात आपल्या प्रबोधनाचे जाळे विणले आहे.

 373आयएएस व राजपत्रित अधिकारी                       

या एक 25 वर्षात मिशन आयएएसमध्ये जवळपास 373 आयएएस  व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहेत. मिशन आयएएसने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत. संस्कार शिबिरात या अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले आहे .विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री जे पी डांगे यांनी  एकूण तेरा कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे. त्याचबरोबर दुसरे मुख्य सचिव श्री रत्नाकर गायकवाड यांनी देखील आमच्या उपक्रमात भाग घेतला आहे एवढ्या मोठ्या संख्येने आय ए एस. सनदी  अधिकारी सहभागी झालेली मिशन आयएस ही भारतातील एकमेव संस्था आहे.                                            

  फक्त एक रुपयात आय ए एस                             

        मिशन आयएएसतर्फे फक्त एक रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते .विद्यार्थ्यांनी दिवसाला एक रुपया याप्रमाणे वर्षाला 365 रुपये भरायचे. त्यामध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य देण्यात येतात. त्यांची परीक्षा घेण्यात येते. त्यांचे पेपर तपासण्यात येतात आणि त्यांना गुणपत्रिका व प्रमाणपत्र देखील देण्यात येते. फक्त एक रुपयामध्ये आयएएसची प्रशिक्षण देणारी मिशन आयएएस सारखी दुसरी संस्था आज तरी अस्तित्वात नाही .सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रशिक्षण दुसऱ्या वर्गापासून देण्यात येते .शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठी मानसिकता तयार करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.                       

  संपूर्ण भारतात 15177 कार्यशाळा                      

 बारा मे 2000 रोजी अमरावतीला स्थापन झालेल्या मिशन आयएएसने आतापर्यंत संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात 15177 विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या कार्यशाळेसाठी मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व त्यांचे सहकारी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेव्हा कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत.त्यांच्या या कार्यशाळेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून त्यामध्ये सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री रमेश घोलप आयएएस व श्री विशाल नरवाडे  यांचा समावेश आहे. या उपक्रमाला संपूर्ण भारतात उत्तम प्रतिसाद असून अशाप्रकारे पूर्ण भारतात स्पर्धा परीक्षा घेऊन मिशन आयएएसने व्यापक जनजागृती केली आहे .                                         

लाँकडाऊनचा सदुपयोग                                    

 काही वर्षां पूर्वी संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरू झाले. त्यामुळे विविध राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी मिशन आयएएसने 5 जून पासून दोन हजार वीस पासून जय जवान जय किसान ही स्पर्धा परीक्षेला वाहिलेली व्याख्यानमाला सुरू केली.  अकरा महिने ही व्याख्यानमाला सुरू होती. या व्याख्यानमालेमध्ये अनेक आयएएस आयपीएस  सनदी व राजपत्रित अधिकारी व्याख्याते म्हणून आलेले आहेत .याशिवाय विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांचा सुसंवाद व्हावा यासाठी मिशन आयएएसने  वेळोवेळी झूम मिटींगचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वेगवेगळे सनदी व राजपत्रित अधिकारी उपलब्ध करून दिले आहेत. या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद असून लोकांनी लाँकडाऊनच्या काळात या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे .       

आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार                              

मिशन आयएएसने गेल्या 21 वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आय ए एस या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आय ए एस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी अमरावतीला आयोजित केला आहे. या सत्कारांमध्ये बरेचसे आईएएस टॉपर अमरावती शहरात येऊन गेले आहेत. त्यामध्ये भारतातून पहिली आलेली शेना अग्रवाल पंजाब .अमृतेश औरंगाबादकर पुणे. राहुल रेखावार नांदेड. शिप्रा आग्रे लातूर .डाँ.विपीन इटणकर चंदिगड .डा.अश्विनी जोशी रत्नागिरी. संपदा मेहता पुणे. श्री विशाल नरवाडे बुलढाणा यांचा समावेश आहे. यावर्षी देखील लाँकडाऊन असताना झूम मीटिंग द्वारे झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साखर आयुक्त श्री  शेखर गायकवाड .माजी सनदी अधिकारी श्री किशोर गजभिये .यशदाचे डॉ. बबन जोगदंड व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे हे उपस्थित होते .                             

   पुस्तकांचे प्रकाशन                                             

मिशन आयएएसने या 25 वर्षात स्पर्धा परीक्षेला उपयुक्त ठरणारी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये मी आयएएस अधिकारी होणारच. शेतकऱ्याची मुले झाली कलेक्टर. स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी. प्रेरणा स्पर्धा परीक्षेची. आनंदी राहा यशस्वी व्हा. विद्यार्थ्यांनो अधिकारी व्हा यासारख्या पुस्तकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लाकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ही पुस्तके ई-बुक स्वरूपात विनामूल्य वितरित करण्यात आली आहेत .मिशन आयएएसची ही वाटचाल गेल्या 25 वर्षांपासून निरंतरपणे सुरू असून स्पर्धा परीक्षेसाठी 24 तास विनामूल्य सेवा देणारी ही भारतातील एकमेव  आकादमी आहे.                                                     

     23 ते 100  अधिकारी      

      मिशन आयएएसने बारा मे दोन हजार रोजी जेव्हा स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त तेवीस विद्यार्थी हे आय ए एस परीक्षा पास होत होते .मिशन आयएएसने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तसेच जिथे जमेल तिथे विनामूल्य स्पर्धा परीक्षा घेऊन जे वातावरण तयार केले तसेच महाराष्ट्रातील इतरही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी जे  मार्गदर्शन केले त्यामुळे या 25 वर्षानंतर या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आय ए एस या परीक्षेच्या निकालात अभूतपूर्व बदल झाला असून हा आकडा 23 वरून 25 वर्षात 100 च्या वर गेलेला आहे. सातत्याने एखाद्या उपक्रमाचा प्रामाणिकपणे पाठपुरावा केला तर समाजामध्ये कोणता बदल होऊ शकतो हे मिशनने  सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे .                      

             • प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे 

   संचालक. मिशन आयएएस. अमरावती.

                  संवाद : 9890967003

========================




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...