दृष्टी असलेला कुलगुरू स्व.दादासाहेब काळमेघ लेखक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संस्थापक संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प संवाद : 9890967003 ✍🏻 मा झ्या 73 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी सामाजिक राजकीय साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरपूर वावरलो. या सर्व क्षेत्रात वावरत असताना मला दृष्टी असलेले फार कमी लोक मिळाले. त्यामध्ये दादासाहेबांचा क्रमांक फार वरचा आहे. दादासाहेब काळमेघ हे व्यक्तिमत्व आगळे वेगळे होते. अशी माणसे फार कमी जन्माला येतात. दादासाहेबांनी आपल्या बोलण्याने वागण्याने संस्काराने समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. त्यामुळे आज त्यांना जाऊन 29 वर्ष जरी झाली तरी सर्वजण त्यांची आवर्जून आठवण काढतात. मला आठवते दादासाहेब काळमेघ हे श्री शिवाजी संस्थेचे अध्यक्ष होते. प्रत्येक वेळेस बहुमत पाठीशी असेल असे नाही .पण त्यांनी त...