• बहूगुणी जिरा... • दैनंदिन जीवनातील उपयोग... संकलन-संपादन अभय संजयराव पाठक बदलत्या जीवनशैली मुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका संभवतो. कोलेस्टेरॉल वाढल्याने ह्रदय विकार उद्भवू शकतात. जिरे दररोज सातत्याने सेवन केले तर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक डाएट केले जातात. जिरे गरम पाण्यात उकळून त्याचे दररोज सकाळी अनाशापोटी सेवन केले तर वजन कमी होते असे सिद्ध झाले आहे. मुळव्याधीवरही जिरे हा रामबाण उपाय आहे. जिरे, सैंधव मीठ आणि ताक एकत्र करून पिल्यास मुळव्याधीपासून आराम मिळतो. सांधेदुखी चा त्रास हा अत्यंत त्रासदायक असतो. सांधेदुखीवरही जिरे इलाज करू शकतात. जिरे, मेथ्या, ओवा, बडीशेप इत्यादि घटकांना बारीक वाटून हे चूर्ण दररोज खाल्ले तर सांधेदुखी वर आराम मिळतो. बदधकोष्ठतेमुळे बैचेन झाल्यासारखे होते व यावर मात्रा म्हणून ताक, सैंधव मीठ आणि जिरे पावडर एकत्र करुन त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. उलटी...