विद्यार्थ्यांनी वाचन- संस्कृतीवर भर देवून मोबाईलचा कामापूरताच वापर करावा
- शिक्षणतज्ञ गजानन नारे यांचे आग्रही प्रतिपादन
शहरात एकत्रीत कुटुंब म्हणून ओळख असलेले मांडेकरबंधू परिवारातर्फे आयोजित पारिवारीक कौतूक सोहळा मध्ये कु . मधुरा सोहळे BCA , चि . केदार मांडेकर यांनी ८६% असे भरीव यश संपादन केल्याबद्दल त्यांच्या शैक्षणिक प्रोत्साहनार्थ कार्यक्रमाचे आयोजन जयहिंद चौकात करण्यात आले होते .
यावेळी व्यासपिठावरून डॉ . गजानन नारे यांनी विद्यार्थीच्या प्रगती मध्ये पारिवारीक प्रोत्साहन करीता मांडेकर परिवाराच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे कौतूक करीत विद्यार्थाना घरातील प्रोत्साहन अत्यंत गरजचे व महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले . तर न्यु इंग्लिश हायस्कूल चे प्राचार्य माधवजी मुंशी यांनी विद्यार्थ्याना कौटुंबिक संस्कार - त्याचे उत्तम चारिञ घडवितात . परिवार हा दिशादर्शक कार्य करीत असतो असे अनुभवी विचार ठेवून असे प्रोत्साहन कार्यक्रम विद्यार्थाना शैक्षणिक दिशा प्राप्त करुन देतात, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी केंदप्रमुख ज्ञानेश्वर मांडेकर यांनी करताना विदयार्थ्याच्या भविष्यातील दिशाक्रमणात कौटुंबिक योगदान महत्वपुर्ण असल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढावा याकरीता पारिवारीक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले ,असे स्पष्ट करीत कार्यक्रमाची रुपरेषा विशद केली .
कार्यक्रमाचे संचलन जिल्हा परिषद शाळा कुंभारीचे मुख्याध्यापक संतोष देशमुख यांनी रंगतदार स्वरुपात शैक्षणिक बाबीस उजाळा देत अभ्यासूपणे केले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार विजय केंदरकर, माजी केंद्र प्रमुख सैय्यदरब्बानी , सेवानिवृत्त सुधीर महाजन यांनी अनमोल विचार व्यक्त केले.
आभार प्रदर्शन गोपाल मांडेकर अध्यक्ष सेवा सहकारी संस्था यांनी केले .कार्यक्रमाला गजानन पायदल, वारीप्रमुख निलेश कपले, जेष्ठ नागरौक महादेवराव मांडेकर, सेवा सहकारी संस्थाचे उपाध्यक्ष नरेंन्द्र भिरड, पुरुषोत्तम मांडेकर, मनोहर कथले , श्रीपाद सोहळे , गजानन कथले, गजानन लोळ, गणेश वानखडे, राहूल वाळेकर , अजय अहिर,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा