• मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम
अकोला : येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महाविद्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे.
कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार
कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मिळाले.
वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे
तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ६६.८३ टक्के गुण मिळाले.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. ताराताई हातवळणे, सचिव श्री गोपालजी खंडेलवाल, संचालक मंडळ सदस्य तसेच मोहरीदेवी खंडेलवाल महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. रसिका वाजगे, उपप्राचार्य श्री उमेश कुडमेथे, पर्यवेक्षक दादा वंजारे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी गुणवंत विद्यार्थीनींचे कौतुक केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा