मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे  भावी सनदी अधिकाऱ्यांचा दीपस्तंभ                                   लेखक                           •  मुरलीधर घाटोळ                     डॉक्टर कालोनी,तपोवन,अमरावती                               संवाद : 9422539467 अ भियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे 16 यूपीएससी उत्तीर्ण भावी सनदी अधिकाऱ्यांचा सामुहिक सत्कार ही बातमी वाचली आणि एकदम नरेशची आठवण झाली. मिशन आय ए एस.चे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे हे नाव आता महाराष्ट्रातच नव्हे तर इतरही काही राज्यात स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत  सुपरिचित झाले आहे.  मध्यप्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार तामिळनाडू केरळ राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश जम्मू कश्मीर ओरिसा कर्नाटक आंध्र प्रदेश जम्मू या प्रदेशातील विद्यार्थी जर मोठ्या संख्येने आय ए एस...
            आरोग्य धनसंपदा •  तुळशीची पाने रोज चावून खा!  •   आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी...                   संकलन-संपादन           सौ. स्नेहा अ. पाठक,अकोला.       आ पल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते.        तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने चावून खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, श्वसन संस्थेस मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. या सर्व कारणांमुळेच तुळशीची पाने चावून खाणे ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित  सवय ठरते.         तुळशीच्या पानांत नैसर्गिक औषधी गुण अस...
                                   लग्न                                 लेखक                      Ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd)                          (सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार,                                   लेखक, समुपदेशक, निवेदक)       नु कत्याच एका लग्नाला निमंत्रित असल्याने गेलो. तर तिथे थाट काय वर्णावा ??? दारातच डाव्या उजव्या बाजूला बर्फात कोरलेले पाच पाच फुटाचे दोन राजहंस उभे..... ते बर्फ लवकर वितळू नये म्हणून त्याभोवती थंड हवेचा झोत सोडणारे अजस्त्र पंखे, त्यात पण रोज वॉटर जोडलेलं त्याचा सुगंधी फवारा येणाऱ्याच्या अंगावर फवारला जात होता.        आत गेल्यावर खुर्चीत...
          प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे      एक समर्पित व्यक्तिमत्व                                        लेखिका                           •   सौ चित्रा पुरुषोत्तम चौधरी                             सिद्धिविनायक नगर अमरावती                               मोबाईल क्र. ९६८९७२३७६५           १ जुलै 2025  अमरावतीचे आमचे जावई श्री नरेशचंद्रजी काठोळे यांना वाढदिवसाप्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा.           ध्येयपूर्तीचा वारकरी अशीच सर्व जादुगिरी अशा स्वभाव वैशिष्ठांनी या कोंदनात बसविलेल्या हिऱ्यासम   जादुगार श्री नरेशचंद्र काठोळे सर्वप्रथम त्यांना वाढदिवसा प्रित्यर्थ उत्तम आयुरारोग...
          इडली डोश्याचा  MBA प्रवास                                            लेखक                                 ©® मकरंद पिंपुटकर                               चिंचवड, पुणे, 8698053215        १९८९ साली हैदराबाद शहरी लक्ष्मणराव शिंदे यांनी आपली सगळी जमापुंजी गुंतवली आणि एक रेकडी - ढकलगाडी विकत घेतली. आपल्या ८ वर्षांच्या मुलाच्या - रामच्या सोबतीने त्यांनी इडली डोश्याचा व्यवसाय सुरू केला. शाळा सांभाळून राम वडिलांना सकाळ - संध्याकाळ मदत करायचा. लक्ष्मणराव रोज वेगवेगळ्या ठिकाणी गाडी लावून नवनवीन ग्राहकांपर्यंत पोचायचे. हातची चव आणि बापलेकांची मेहनत यामुळे व्यवसाय ठीकठाक चालला होता. रोजचे खर्च निभत होते, रामच्या शिक्षणाचा खर्च निघत होता. पण ना धंद्याला म्हणावी तशी बरकत होती,...
• राज्यातील  एकमेव अभिनव उपक्रम  • दर महिन्याला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा  •  जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार                         लेखक             -  प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे  सं चालक,  मिशन आयएएस  अमरावती कॅम्प. संवाद :  9890967003 म हाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मोठ्या संख्येने उत्तीर्ण कराव्यात यासाठी विविध स्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. त्यातीलच एक चांगला प्रयत्न अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर यांनी येत्या एक जुलैपासून सुरू केलेला आहे. श्री आशिष येरेकर हे नुकतेच अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले आहेत. आल्या आल्या त्यांनी स्पर्धा परीक्षेतील अमरावतीचे वातावरण पाहून दर महिन्याच्या एक तारखेला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्याचे निश्चित केले आहे. त्या उपक्रमातील पहिली विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा अमरावती येथे एक जुलै रोजी दुपारी दो...
•  ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर यांचे विचार •  नियम व कायद्याचे काटेकोरपणे पालन केल्यास समाजाला मोकळा श्वास घेता येईल अकोला :  आपण आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे नियम, कायदा यांचे काटेकोरपणे पालन केल्यास समाजाला मोकळा श्वास घेता येईल संपूर्ण समाज आपला आहे ही भावना रुजविण्यासाठी प्रत्येकाने हृदयपूर्वक प्रयत्न करावेत असे विचार ज्येष्ठ पत्रकार,  महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक समितीचे सदस्य महेंद्र कवीश्वर यांनी व्यक्त केले। शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून डॉ  आनंदीबाई जोशी महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नागरी कर्तव्य व शिष्टा चार या विषयावर कवीश्वर हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते, अध्यक्षस्थानी संस्था व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष जयंत पडगीलवार हे होते या समितीचे सदस्य वैशाली देशपांडे, अभिजीत शोभणे, अविनाश तोडसाम, विलास अनासाने, प्राचार्य शरदचंद्र ठोकरे हे व्यासपीठावर विराजम होते। कोण काय करतो यापेक्षाही मी काय करतो यावर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे आहे असे सांगून आपले शहर, गल्ली, रस्ते  सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि ...
  'श्री राजराजेश्‍वर भगवान':   अकोल्‍याच्‍या श्रध्‍देचा दिपस्‍तंभ. . .                          लेखक               © निशिकांत देशपांडे,                   अकोला. संवाद : 9850342404       "नमः शिवाय शान्ताय सर्वपापप्रणाशिने।     भक्तानां हृत्स्थितायै च श्रीराजेश्वराय ते नमः॥"     अ कोल्याच्या पवित्र भूमीवर, अत्‍यंत तेजस्वी, दिव्य आणि प्राचीन परंपरेच्‍या रूपात उभे आहे श्री राजराजेश्वर मंदिर. अकोल्याचे ग्रामदैवत, अकोलेकरांच्‍या श्रद्धेचा केंद्रबिंदू, आणि इतिहासाच्या उत्कट क्षणांचा साक्षीदार असे हे देवालय. श्री राजराजेश्वर मंदिर सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे असून मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. राजा अकोलसिंहाच्‍या जीवनात घडलेली कथा आणि शिवलिंगाची जागृती ही  कथा माहिती नाही असा अकोल्‍यात तरी कोण असेल?         श्री राजेश्वर हे महादेवाचे अतीव शांत, पण जागृत रूप आहे. हे मंदिर केवळ एक...
किशोर बळी यांचा तुफान विनोदी एकपात्री प्रयोग ' सारं गाव मामाचं'... #लोकरंग_सादर_करीत_आहे..!! * एप्रिल महिन्यात मधुरा वेलणकर यांच्या प्रसिद्ध ' मधूरव' या यशस्वी कार्यक्रमानंतर लोकरंग घेऊन येत आहे किशोर बळी यांचा तुफान विनोदी एकपात्री प्रयोग ' सारं गाव मामाचं'...       लोकरंग चे सभासद होण्यासाठी तातडीने संपर्क साधा... ग्रामपंचायत टुनकी (डिजिटल) आपले सहर्ष स्वागत करीत आहे... टाईमातला टाईम काढून अन सतरा कामं बाजुले ठेवून या लागतेच बरं !  ▪️'लोकरंग'चे अध्यक्ष मा.अनिलभाऊ गावंडे, उपाध्यक्ष भारतदादा गणेशपुरे अन पुऱ्या टीमनं आकोलेकर रसिकाईसाठी किशोर बळी यांचा पहिला एकपात्री नाट्यप्रयोग नि:शुल्क आयोजित करेल हाये. मात्र प्रवेशिका आवश्यक हाये. प्रवेशिका आकोल्यात कुठी भेटतील, ते पोस्टरवर वाचा.  ▪️मर्यादित आसनसंख्या अन 'प्रथम प्रवेश प्रथम प्राधान्य' असा हिशोब असल्याच्यानं उशिरा आल्यावर जागा भेटनच, याची गॅरंटी नाई.  ▪️आकोल्यात वर्षातून असे पाच कार्यक्रम होतील. मेम्बर व्हासाठी एक अनामत रक्कम अन वार्षिक शुल्क राहील. त्याबद्दल पोस्टरवार वाचा. काहून की दोन कार्यक्र...
•  रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अकोला :  अलिकडे नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरात मोकाट गायीने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू झाला, तर दुसरी ज्येष्ठ व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अकोल्यातही मोकाट जनावरे भर रस्त्यात मधोमध बसतात. मुख्य रस्त्यावरील वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. अनेक वस्तीत आपल्या शिंगांणी अनेकांना जखमी केल्याचे वृत्त आहे. परंतू याचा बंदोबस्त करण्यात प्रशासन ढिम्म आहे.        यद्यपि, ही हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. गायीच्या पोटात तेहतीस 'कोटी' देवांचा वास असल्याने रस्त्यावर दिसलेल्या गायींना स्पर्श करून दर्शन घेतल्याशिवाय कोणीही पुढे जाताना सहसा दिसत नाही. गाई शांत स्वभावाच्या असतात. त्या तुलनेत तिच्याच पोटी जन्मलेले बैल हे मात्र रागीट स्वभावाचे असतात. त्यामुळे शेतीकामे व फावल्या वेळात या बैलांना शर्यतीत उतरवले जाते. एखाद्यावर बैलाने केलेला हल्ला दुर्लक्षिला जाऊ शकतो; परंतु गायीने केलेल्या हल्ल्यात एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला प्राण गमवावे लागणे, ही नक्कीच हळहळ व्यक्त क...

आरोग्य धन संपदा

तुळशीचे पाने रोज चावून खा आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी...       आ पल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते.        तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने चावून खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, श्वसन संस्थेस मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. या सर्व कारणांमुळेच तुळशीची पाने चावून खाणे ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित  सवय ठरते.         तुळशीच्या पानांत नैसर्गिक औषधी गुण असून सर्दी-खोकला आणि ताप यांपासून संरक्षण मिळते, तसेच त्वचेचे आणि पचनाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. तुळशीमध्ये जीवनसत्त्वे सी, ए, के आणि बी-कॉम्प्लेक्स, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, कॅल्शियम, लोह ...