मुख्य सामग्रीवर वगळा

•  ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर यांचे विचार

•  नियम व कायद्याचे काटेकोरपणे पालन केल्यास समाजाला मोकळा श्वास घेता येईल



अकोला : 

आपण आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे नियम, कायदा यांचे काटेकोरपणे पालन केल्यास समाजाला मोकळा श्वास घेता येईल संपूर्ण समाज आपला आहे ही भावना रुजविण्यासाठी प्रत्येकाने हृदयपूर्वक प्रयत्न करावेत असे विचार ज्येष्ठ पत्रकार,  महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक समितीचे सदस्य महेंद्र कवीश्वर यांनी व्यक्त केले।

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून डॉ  आनंदीबाई जोशी महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नागरी कर्तव्य व शिष्टा चार या विषयावर कवीश्वर हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते, अध्यक्षस्थानी संस्था व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष जयंत पडगीलवार हे होते या समितीचे सदस्य वैशाली देशपांडे, अभिजीत शोभणे, अविनाश तोडसाम, विलास अनासाने, प्राचार्य शरदचंद्र ठोकरे हे व्यासपीठावर विराजम होते।

कोण काय करतो यापेक्षाही मी काय करतो यावर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे आहे असे सांगून आपले शहर, गल्ली, रस्ते  सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि नियमांचे काटेकोर पालन सर्वांनी करावे राष्ट्रीय मांनकांचा अवमान होऊ नये याचीही काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन ही महेंद्र कवीश्वर यांनी केले।

डॉ प. दे कृ वि चे प्रा डॉ हर्षवर्धन देशमुख यांनी पर्यावरण रक्षण व संवर्धन  या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही पर्यावरणाचा ऱ्हास यामुळेच होतोय याचा विचार प्रत्येकानेच करण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील याकडे डॉ देशमुख यांनी लक्ष वेधले।प्रारंभी प्राचार्य ठोकरे यांनी वृक्ष रोप देऊन मान्यवरांचे स्वागत केले संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्यात असे प्रस्ताविकातून सांगत सर्वांचे स्वागत केले। संचालन प्रशांत बोकाडे ,आभार सोनल कुळकर्णी यांनी मानले।संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभासी   पद्धतीने केले कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात या खात्याच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनीही आभासी पद्धतीने  मोलाचे मार्गदर्शन केले।कौशल्य गीताने आरंभ झालेल्या या सुरेख सोहळ्याची सांगता राज्यगीताने झाली। गटनिदेशक रणजित महल्ले यांच्यासह संस्थेतिल कर्मचारी यांनी परिश्रमपूर्वक  हा कार्यक्रम यशस्वी केला।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...