मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आरोग्य धनसंपदा...!

 मीठ कमी खा, मस्त जगा...      ✍🏻 ए का गावात एक गुंड होता. तो सर्वांकडचे अन्न खायचा. एकाने सांगितले की, त्याच्या अन्नात रोज थोडे मीठ टाका. त्याची चव घ्या. ते हळू हळू त्याच्या नकळत वाढवा. लोकांनी तसे केले. त्या जादा मिठाने उच्च रक्त दाब होवून तो गुंड मेला. पण गावकर्यांना चव घेता घेता मिठाची चटक लागली. ते भरपूर मीठ खाऊ लागले. घरोघरी सर्वाना उच्च रक्त दाब झाला. तरुणांचे मरण वाढले.       त्या लोकांप्रमाणे, उच्च रक्त दाब हेच आज आपले, भारतीयांचे नंबर १ चे मरणाचे कारण आहे. दर चौथ्या माणसाला उच्च रक्त दाब आहे. बहुतेकांना हे माहिती नाही. ही माहिती सांगून  सर्वांना आपला रक्त दाब मोजायला सांगा. सर्वांना वाचवा.       जास्त मीठ खाण्याचा  उच्च  दाबाशी संबंध आहे. जागतिक आरोग्य संघटना सांगते की प्रत्येकाने रोज ५ ग्रॅमच्या वर मीठ खाऊ नये.८ ग्राम च्या वर मीठ रोज खाणाऱ्यांना उच्च रक्त दाब होण्याची  शक्यता जास्त असते. आपण सरासरी १० ग्रॅम मीठ खातो काही  लोक रोज ३० ग्रॅम मीठ खातात. आपले जसे वय वाढते  तसा आपला रक्तदाब वाढतो. ...
अलीकडील पोस्ट

आजचे राशिभविष्य गुरुवार,दि.२४ सप्टेंबर २०२६

                            सुविचार . 118            संयम ठेवा, वेळ बदलते. आजचे राशिभविष्य गुरुवार,दि.२४ सप्टेंबर २०२६ आजचे पंचांग  विक्रम संवत 2083, शक संवत 1948 (पराभव संवत्सर), भाद्रपद. त्रयोदशी तिथी रात्री 11:18 पर्यंत आणि त्यानंतर चतुर्दशी. सकाळी 10.35 पर्यंत नक्षत्र धनिष्ठा त्यानंतर शततारका दुपारी 03:54 पर्यंत धृती योग , त्यानंतर शूल योग. करण कौलव सकाळी 11:09 पर्यंत, तैतिल नंतर 11:18 पर्यंत, गर नंतर मेष राशी :- तुमच्या करिअरसाठी चांगला असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर एका महत्त्वाच्या कामाची जबाबदारी येऊ शकते आणि तुमच्या वरिष्ठांच्या तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा ओळखी फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक बाबी सामान्य राहतील, परंतु अनावश्यक खरेदी टाळा. कुटुंबातील सदस्यासोबत असलेले गैरसमज दूर होऊ शकतात. वृषभ राशी :- कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना जुन्या ओळखींचा फायदा होऊ शकतो. आपली आर्थिक स्थिती मजबूत करण...

संमेलनात सावरकरांच्या अनेक पैलूंवर लेख असलेल्या स्मरणिकेचे, देवेंद्र भुजबळ यांच्या "झेप" पुस्तकाचे, शैलजा देशपांडे यांचं "अनादि मी", या पुस्तकांचे प्रकाशन

       भूतानमध्ये "झेप" ! १५ वे सावरकर संमेलन               ✍🏻 १५ वे सावरकर संमेलन भूतानच्या थिंपू या राजधानीत येत्या २ ऑक्टोंबर रोजी होत आहे.  या संमेलनात सावरकरांच्या अनेक पैलूंवर लेख असलेल्या स्मरणिकेचे, देवेंद्र भुजबळ यांच्या "झेप" पुस्तकाचे, शैलजा देशपांडे यांचं "अनादि मी", या  पुस्तकांचे प्रकाशन देखील   होणार आहे.          " झेप " " झेप" या पुस्तकात  विविध क्षेत्रात लक्षणीय झेप  घेतलेल्या सर्वश्री  डॉ विजय  भटकर, डॉ  Branch शेवगावकर,विकास  खारगे, तुकाराम  मुंडे, नयना गुंडे, सदानंद  शेटे, डॉ. विजय शिरीषकर, सुधाकर  तोरणे , दिलीप स्वामी,भावेश भाटिया, अण्णासाहेब  टेकाळे, राधिका  भांडारकर,आर. आर.  लेमाडे, मारुती कदम,राम काजरोळकर,कृष्णा दिवटे, उमाकांत रासने, शरद चौधरी , नंदकुमार पाटील,अमोल  मोहोळकर, सुखदा प्रधान सिंग, प्रमोद झिंजाडे, सुभाष  खाकाळ,प्रा. डॉ मनिषा चाळसे, दिलीप पाथरे, अनिल  राजपिसे, शोभा जोपुळे, विराग...
  “घालीन लोटांगण” म्हणजे नेमके काय? “घा लीन लोटांगण” ही महाराष्ट्रात पूजा किंवा आरतीनंतर म्हटली जाणारी समारोपाची प्रार्थना आहे. विशेष म्हणजे ती एका व्यक्तीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहिलेली एकच रचना नाही. आज प्रचलित असलेल्या पाठामध्ये वेगवेगळ्या परंपरांतील रचना एकत्र आल्या आहेत. उपलब्ध स्रोतांनुसार पहिले मराठी कडवे संत नामदेवांचे मानले जाते; त्यानंतरचे संस्कृत श्लोक प्राचीन भक्ती-वेदान्त परंपरेतील आहेत.  १. “घालीन लोटांगण” — संत नामदेव मूळ रचना घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे । प्रेमें आलिंगीन, आनंदे पूजीन । भावे ओवाळीन, म्हणे नामा ॥ या कडव्याच्या शेवटी “म्हणे नामा” असल्यामुळे हे कडवे संत नामदेवांचे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संतकवी असून त्यांचा काळ साधारण इ.स. १३व्या–१४व्या शतकातील आहे.  शब्दांचा अर्थ लोटांगण — संपूर्ण शरीर जमिनीवर ठेवून नमस्कार करणे. चरण — देवाचे पवित्र पाय. रूप — देवाचे सगुण स्वरूप. आलिंगन — प्रेमाने देवाला जवळ घेणे. पूजीन — पूजा करणे. ओवाळीन — आरती करून भक्तिभाव व्यक्त करणे. सखोल अर्थ नामदेव म्हणतात— “देवा, मी माझा अहंकार स...

गणेशोत्सव २०२६ शांतता समिती बैठक 🔷 ४८१ गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती...

गणेशोत्सवाला जागतिक ओळख देण्यासाठी Bappa.org वर नोंदणी करा : पो.अ.अर्चित चांडक यांचे गणेश मंडळे व नागरिकांना आवाहन •अकोला : श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दलाच्या वतीने श्री गणेशोत्सव मंडळे तसेच शांतता समिती सदस्यांची बैठक २२ सप्टेंबर रोजी निमवाडी येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, उपविभागीय अधिकारी जावडे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंग मोहता यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अकोला शहर व परिसरातील ४८१ श्री गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहून गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत पोलीस प्रशासनाशी चर्चा केली. “गणेशोत्सवाला जागतिक ओळख देण्यासाठी Bappa.org वर नोंदणी करा” पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणासंदर्भात देण्यात आल...

दैनिक देशोन्नती मध्ये दर मंगळवारी प्रकाशित माझा साप्ताहिक स्तंभ सरळ सरळ.

कधी थांबायचे हे कळले पाहिजे !               ‘मंज़िल की चाह रखो,              मगर ठहरना भी सीखो,              जो मिल गया है ज़िंदगी में,              उसे सँभालना भी सीखो!’       मा णसाच्या आयुष्यात ‘मिळवणे’ जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ‘कुठे थांबायचे’ हे ओळखणेही महत्त्वाचे आहे. महत्त्वाकांक्षा माणसाला पुढे घेऊन जाते; पण हव्यास अनेकदा मिळालेलेही हिरावून घेतो. सध्या सुरू असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या पर्वातील पुण्याच्या अर्पिता झा यांची अलीकडील घटना आणि २०२४ मधील डॉ. नीरज सक्सेना यांचा प्रसंग या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने हाच जीवनधडा सांगतात.          ‘कौन बनेगा करोडपती’ म्हणजे ज्ञान, आत्मविश्वास आणि नशिबाची परीक्षा. अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांसाठी प्रत्येक प्रश्नासोबत पैशाची रक्कम वाढत जाते. काही हजारांपासून सुरू झालेला प्रवास लाखो आणि कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचतो. अशा व...

आजचे राशिभविष्य बुधवार,दि.२३ सप्टेंबर २०२६

                            सुविचार . 117     यशासाठी सातत्य आवश्यक आहे. आजचे राशिभविष्य बुधवार,दि.२३ सप्टेंबर २०२६ आजचे पंचांग  विक्रम संवत 2083, शक संवत 1948 (परभव संवत्सर), भाद्रपद. द्वादशी नंतर त्रयोदशी रात्री 10:50 पर्यंत. नक्षत्र श्रवण सकाळी 09:09 पर्यंत आणि त्यानंतर धनिष्ठा. दुपारी 04:26 पर्यंत सुकर्म योग, त्यानंतर धृती योग. करण सकाळी 10:22 पर्यंत, बालव नंतर रात्री 10:51 पर्यंत, कौलव नंतर. मेष राशी :- तुमच्या कामातील मेहनतीची तुमच्या वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल आणि तुम्हाला एका महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दिली जाऊ शकते. नवीन ग्राहक किंवा ओळखींमुळे व्यवसायात फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, परंतु अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. कुटुंबातील सदस्यासोबतच्या संभाषणाने जुने गैरसमज दूर होतील. वृषभ राशी :- आज करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एका चांगल्या पर्यायाचा विचार करू शकता. थांबलेले व्यावसायिक प्रकल्प पुन्हा सुरू केल्यास नफा मिळण्य...