मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अकोला पाटबंधारे विभाग

       अकोला जिल्ह्यातील         धरणाचा जलसाठा      (दि 01/09/2025 Time -7:00 AM वा.) (1)  काटेपूर्णा प्रकल्प        पातळी 347.51 मी         साठा 82.173mmg3          टक्केवारी 95.16 %        आजचा पाऊस  00mm        एकूण पाऊस    448  mm 2) वान प्रकल्प ता. तेल्हारा      पातळी 410.46 मी      साठा  74.45 mm3       टक्केवारी 90.84 %      आजचा पाऊस    00mm      एकूण पाऊस    508 mm   3) मोर्णा प्रकल्प ता पातूर      पातळी  366.97मी       साठा 41.46 mm3       टक्केवारी  100 %      आजचा पाऊस 00 mm      एकूण पाऊस 474mm      सांडवा. 03 सेमी,       विसर्ग   01.92  cumecs. 4) निर्गुणा...

मासिक राशीभविष्य माहे सप्टेंबर 2025

  मासिक राशीभविष्य  माहे            सप्टेंबर 2025 मेष राशी :- तुमच्यासाठी उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन येईल. करिअरमध्ये बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. कौटुंबिक आणि घरगुती बाबींमध्ये थोडे सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या बाबतीत ताणतणाव आणि थकवा येऊ शकतो, म्हणून नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ सामान्य राहील; अनावश्यक खर्च टाळा. जुन्या मित्रांशी संपर्क साधण्यासाठी आणि नवीन संबंध निर्माण करण्यासाठी देखील हा एक शुभ काळ आहे. वृषभ राशी :- सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचा काळ आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशाने तुम्ही आनंदी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि बऱ्याच काळापासून अडकलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, कारण कोणताही गैरसमज किंवा अफवा त्रास देऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत, पचन आणि पोटाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्या. ध्यान आणि योग मानसिक शांती राखतील. मिथुन राशी :- नवीन संधी आणि...

🔶 आजचे दैनिक राशीभविष्य 🔶

       🔶   आजचे    दैनिक राशीभविष्य    🔶         (सोमवार, दि . 01 सप्टेबर 2025)           विक्रम संवत 2082, शके संवत 1947 (विश्ववसु संवत्सरा), भाद्रपद नवमी तिथी नंतर दशमी नंतर पहाटे 02:43 पर्यंत, नक्षत्र ज्येष्ठा रात्री 07:55 पर्यंत त्यानंतर मूळ दुपारी 04:31 पर्यंत विष्कुंभ योग, त्यानंतर प्रीति योग, करण बलव दुपारी 01:54 पर्यंत, नंतर कौलव 02:43 पर्यंत, त्यानंतर तैतिल.       🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶                   राशीभविष्य     🔘   मेष राशी :-           आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामात चांगली प्रगती होईल. घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळू शकते.   🔘   वृषभ  राशी :-           आज तुम्हाला धीर धरावा लागेल. काही जुन्या चिंता मनाला त्रास देऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा...

(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक,शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन, अकोला च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)

"  ऋतूचक्र........."             लेखक               प्रा.डॉ. मोहन खडसे, अकोला              संवाद : 9823289010               ईमेल: mvkhadse9@gmail.com         को ण कसा असेल सांगता येत नाही. कुणाला कोणती गोष्ट आवडेल अन् आवडणार नाही ,  हेही सांगणं तसं  कठीणच आहे. आता ऋतूचंच घ्या ना. एखादा ऋतू एखाद्याला आवडत नाही मात्र बाकीचे आवडतात ,  असं सर्वसाधारण दिसतं. तसं पाहिलं तर कोणताही ऋतू वाईट नाही , खराब नाही. कदाचित फायद्याचा नसेल पण तो आवश्यकही आहे , हे माणसाला जाणवायलाच पाहिजे. पण काहींना काही ऋतूंचा कंटाळा येतो म्हणा किंवा नकोसे असतात असेही म्हणा. तसं पाहिलं तर प्रत्येक ऋतूमध्ये खूप काही चांगलं असतं ,अर्थात जाणण्याचा प्रयत्न केला तर !       भर उन्हाळ्यात कोणी जर थंडगार पाणी आणि जमलंच तर लिंबू सरबत दिलं ,तर बरं वाटतं की नाही ? पावसाळ्यामध्ये रिमझिम पाऊस पडत असताना ओलं होऊ, या भीतीने कुठेतरी थांबलं अन् तेवढ...

०१ सप्टेंबर मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनानिमित्त

मराठा सेवा संघाचे संस्थापक :  पुरुषोत्तम खेडेकर                    लेखक:                  प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे                     माजी सरचिटणीस ,                         मराठा सेवा संघ                           अमरावती कॅम्प                         संवाद : 9890967003       १ सप्टेंबर हा मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन. हा वर्धापनदिन संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात संपन्न केला जातो. महाराष्ट्रातही संपूर्ण 36 जिल्ह्यात तसेच वेगवेगळ्या तालुक्यात हा वर्धापनदिन आयोजित करण्यात येतो. मराठा सेवा संघाची स्थापना श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना केली.     ...

श्री गणेशोत्सव विशेष

      श्री गणेश विसर्जन                मिरवणूकीनिमित्त        वाहतूक मार्गात बदल अकोला : (जिमाका) श्री गणेश विसर्जन मिरवणूकीनिमित्त अकोला शहर व अकोला – अकोट राज्य वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी जारी केला.        हा बदल खालील कालावधीत लागू राहील. अकोला शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि.7 सप्टेंबर 2025 चे सकाळी 6 वाजेपर्यंत. अकोला-अकोट या राज्य मार्गावरील वाहतूक दि.06 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि.7 सप्टेंबर 2025 चे सकाळी 12 वाजेपर्यंत तसेच अकोला-पारस फाटा ते बाळापूर मार्गावरील वाहतूक दि.6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि.7 सप्टेबर चे सकाळी 12 वाजेपर्यंत.                   अकोला शहर श्री विसर्जन              मार्गावरील वाहतूक :  डाबकी रोडकडून बसस्थानकाकडे जाणारी व मामा बेकरीकडे जाणारी वाहतू...
आयुष्मान भारत अंमलबजावणीत अकोला जिल्हा सातवा `मोबाईलने इ केवायसी करा, पाच लाखांचे कवच मिळवा` अकोला :  आयुष्मान भारत, जनआरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा अधिकाधिक गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी गावे, वस्त्या, शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन केवायसी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात खासगी व शासकीय मिळून ४० रुग्णालयांत योजनेत सुविधा उपलब्ध असून, योजनेच्या अंमलबजावणीत अकोला जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे.        या योजनेतून लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार व १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया सुविधा मिळणार आहेत. ई-केवायसी करून घेण्यासाठी आरोग्य प्रशासनाने पुढाकार घेतला असून, ७ लक्ष ६० हजार ३५० कार्ड तयार झाले आहेत. लाभार्थ्यांची एकूण संख्या १७ लक्ष ३३ हजार १६ असून, उर्वरित ई- केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे.     योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे शिधापत्रिकाधारक पात्र आहेत. मात्र यासाठी आयुष्मान कार्ड तयार करून घेणे बंधनकारक आहे.          लाभार्थी स्वतःच्या म...

श्री गणेश उत्सव विशेष लेख:

   गणेशोत्सव : टिळकांच्या      प्रेरणेपासून ‘राज्य   महोत्सव’पर्यंतचा प्रवास                     लेखक                    • प्रवीण टाके                       उपसंचालक                            विभागीय माहिती कार्यालय,                           कोल्हापूर                            संवाद : 9702858777         भा रतीय संस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा उत्सव जल्लोषात, भक्तिभावात आणि सामूहिकतेच्या भावनेत साजरा होतो. हा सण सर्व समाजात आणि घराघरात लोकप्रिय आहे. या उत्सवाचा इतिहास केवळ धार्मिकतेशी जोडलेला नसून, त्यामध्...

आज रविवार, दि. 31 आॕगस्ट 2025 चे राशीभविष्य

       🔶   आजचे    दैनिक राशीभविष्य    🔶         (रविवार, दि . 31 आॕगस्ट 2025)           विक्रम संवत 2082, शक संवत 1947 (विश्ववसु संवत्सर), भाद्रपद  अष्टमी, तिथी 12:58 पर्यंत त्या नवमी नंतर, नक्षत्र अनुराधा संध्याकाळी 05:27 पर्यंत त्यानंतर ज्येष्ठा. दुपारी 03:58 पर्यंत वैधृती योग , त्यानंतर विष्कुंभ योग, करण व्यष्टी 11:55 AM पर्यंत, त्यानंतर बाव 12:58 AM पर्यंत, त्यानंतर बालव.                  🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶 🔶                   राशीभविष्य     🔘   मेष राशी :-           नातेसंबंधात असलेल्यांसाठी, संवाद साधत राहणे महत्वाचे आहे. कोणत्याही प्रलंबित समस्या प्रामाणिकपणे हाताळा. आजचा काळ हा बंध मजबूत करण्यासाठी आणि तुमच्या जोडीदाराच्या जवळ जाण्यासाठी उत्तम आहे.   🔘   वृषभ  राशी :-           आज नवीन...

श्री गणेश उत्सव विशेष

          पे शवेकालीन  परंपरा लाभलेला    श्री बाराभाई गणपती                             लेखक                     विजय द. केंदरकर               संवाद : 9371854706   अ कोल्यातील मानाचा गणपती म्हणून जुने शहरातील श्री बाराभाई गणपती महराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आजही या गणपतीला भक्तगण मोठयाभक्ती भावाने दर्शनाला येऊन मनोकामना पूर्ण करतात. विसर्जनाच्या वेळी सर्वात आधी मानाचा गणपती म्हणून पुजल्या जातो. श्री बाराभाई गणपतीची विधिवत पूजा अर्चा आरती करून अकोल्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. ही परंपरा अजूनही कायम आहे. श्री बाराभाई गणपती अकोला शहरातील गणेश उत्सवाचे आगळेवेगळे आकर्षण आहे.अकोल्यातच नव्हे तर पूर्ण विदर्भात हा गणपती प्रसिद्ध आहे. हा गणपती प्रथम मानाचा समजल्या जातो. शेकडो वर्षापासून ही प्रथा अखंड सुरु असून सुरूच राहणार आहे. आता बाराभाई गणपती म्हणजे काय? तो कोठे व केव्हा स्थापन झाला? य...

महसूल मासानिमित्त प्रशासनातील दीपस्तंभ

 महापुरुषांना ग्रंथांच्या माध्यमातून मानवंदना देणारा  अभ्यासाक अधिकारी       अप्पर जिल्हाधिकारी        श्री राजेश खवले                     लेखक                    प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे                      संचालक, मिशन आयएएस                      अमरावती कॅम्प                           संवाद : 9890967003       म हाराष्ट्राच्या राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये ज्या लोकांची त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल चर्चा आहे, त्यामध्ये नागपूर विभागीय कार्यालयातील अपर आयुक्त म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असलेले श्री राजेश खवले यांचे नाव वरच्या क्रमांकामध्ये आहे. या माणसाने आपले शासकीय काम प्रमाणिकपणे सांभाळून त्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून चार ग...