मुख्य सामग्रीवर वगळा

(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक,शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन, अकोला च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)


"  ऋतूचक्र........."

            लेखक 
           प्रा.डॉ. मोहन खडसे, अकोला 
           संवाद : 9823289010
              ईमेल: mvkhadse9@gmail.com

       कोण कसा असेल सांगता येत नाही. कुणाला कोणती गोष्ट आवडेल अन् आवडणार नाही ,  हेही सांगणं तसं  कठीणच आहे. आता ऋतूचंच घ्या ना. एखादा ऋतू एखाद्याला आवडत नाही मात्र बाकीचे आवडतात ,  असं सर्वसाधारण दिसतं. तसं पाहिलं तर कोणताही ऋतू वाईट नाही , खराब नाही. कदाचित फायद्याचा नसेल पण तो आवश्यकही आहे , हे माणसाला जाणवायलाच पाहिजे. पण काहींना काही ऋतूंचा कंटाळा येतो म्हणा किंवा नकोसे असतात असेही म्हणा. तसं पाहिलं तर प्रत्येक ऋतूमध्ये खूप काही चांगलं असतं ,अर्थात जाणण्याचा प्रयत्न केला तर !
      भर उन्हाळ्यात कोणी जर थंडगार पाणी आणि जमलंच तर लिंबू सरबत दिलं ,तर बरं वाटतं की नाही ? पावसाळ्यामध्ये रिमझिम पाऊस पडत असताना ओलं होऊ, या भीतीने कुठेतरी थांबलं अन् तेवढ्यात एक चहाची टपरी दिसली.तेथे असलेल्या दुकानदाराला काय म्हणावं बरं ? म्हणावं छान गरमागरम भजे - पकोडे काढ अन् आल्याचा चहा दे. मनात विचार करावा -  हे सगळं खाणं होईपर्यंत पाऊस थांबेलच की. हिवाळ्यात  भाजीपाला किती छान असतो हिरवागार आणि ताजा. जेवण किती छान जातं. जेवणाचा आनंद येतो. तो घ्यावा की नाही ? जेवढे पैसे आहेत तेवढ्यात तर घ्यावाच. जेव्हा जसं शक्य होतं  तसं, अशा पद्धतीने ऋतूचा आनंद घेता येतोच यात शंकाच नाही. कोणत्याही ऋतू बद्दल कुरकुर करायची नसल्यास !
       जसे हवामानाचे ऋतू असतात तसेच माणसाच्या जगण्याचेही असतात. माणसं आवश्यकतेनुसार  जगण्याचे ऋतू ठरवतात. स्वतःच्या आवश्यकतेनुसार, गरजेनुसार हे ऋतू माणूस ठरवतो म्हणून तर जगण्याच्या लहान सहान अडचणी निर्माण करून टाकतो.  माणूस जसा प्रत्येक हवामानाच्या ऋतूमध्ये सर्वच गोष्टींची काळजी घेतो अन् त्यानुसार राहतो तसंच या जगण्यातल्या ऋतू बद्दल ही  राहलंच पाहिजे की नाही ? या ऋतू बद्दल प्रत्येकाचे मतं वेगवेगळे असू शकतात. काही माणसं ही ऋतूप्रमाणे राहतात बदलतात त्यांना ओळखणं आवश्यक असतं. यामुळेच की काय कुठेतरी वाचलं होतं - 

पतझड में ही रिश्तों की 
परख होती है 
बारीश में तो 
हर पत्ता ही हरा दिखता है
               खरं म्हणजे माणसाचे जगणे म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच आहे. एक कथा वाचण्यात आली ती अशी - एका गुरुने आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी गुरुकुलच्या मार्गावर भरपूर काटे टाकून ठेवले. त्यांना म्हणाले की उद्या सकाळी तुम्ही गुरुकुल मध्ये यावं तुमची परीक्षा घेणार आहे. तीनही शिष्य सकाळी निघाले. ते कमजोर निश्चितच नव्हते. काटे पोचत असले तरी पहिला शिष्य अखेर पोहोचला. दुसराही पोहोचला पण त्याला एक काटा बोचलाच. तिसरे शिष्याने मात्र काट्यांच्या फांद्यांना ओढत दूर फेकून दिले आणि लगबगिने गुरुकुलकडे पोहोचला. पहिल्या आणि दुसऱ्या शिष्याला गुरु म्हणाले की तुम्ही दोघेही सध्या फक्त प्राणी आहात मनुष्यप्राणी व्हायचे आहात म्हणून तुमचे शिक्षण आणखीन काही दिवस होणार. तिसऱ्या शिष्याला पाहताच गुरु म्हणाले , " तू माझ्या परीक्षेत उत्तीर्ण झालास. ज्ञान तेच आहे हे व्यवहारांमध्ये कामी येईल. व्यवहार समाजात व्यवहार करताना असे राहा की लोकांनी टाकलेले काटे तुम्हाला बोचायला नकोत आणि तुम्ही सुद्धा कुणाला तुमचे काटे बोचू देणार नाही....."
        माणसाची योग्यता ही जर शिक्षणाने - वयाने ठरत असती तर फक्त काहीच माणसं यामध्ये उत्तीर्ण झाली असते. बाकीचे सगळे नापास झाले असते. असं मात्र कधी होत नाही. सर्वच प्राण्यांना आपापले संरक्षण अन्  हित साध्य करण्याची बुद्धी असते मात्र माणसाला त्याच्या आसपासच्या सर्वच लोकांचे हित साधण्याची, काळजी घेण्याची बुद्धिमत्ता असते. मात्र माणूस हा फक्त प्राण्यांसारखा राहायला लागला की काय अशी शंका येते.    म्हणूनच की काय माणसाला  भेदभाव करण्याची ,आपले -  परकीय करण्याची बुद्धी असते आणि तिथेच त्याचा ' घात ' होण्याची शक्यता निर्माण होते. कथेतील पहिल्या व दुसऱ्या शिष्यासारखं माणूस करण्याचा प्रयत्न करतो मात्र सगळेच काटे तो बाजूला करत नाही म्हणून काही काटे तर त्याला निश्चितपणे बोचणार असतात, यात शंकाच ती काय ? पण त्यातूनही वाचता येतं अन् शक्यतो इतरांनाही वाचवता येतं , हेही तितकच खरं आहे. काही काटे बोचणार म्हणून माणसाचं जगणं कधी खराब होतं का ? माणसाचा सकारात्मक आणि खरेपणा जाणण्याचा दृष्टिकोन असलाच पाहिजे. सुप्रसिद्ध शायर शमीम किरहानी  शेरमध्ये म्हणतात-

काटों से गुजर जाना 
दुश्वार नही लेकिन 
काटें ही नही यारो 
कलियां भी हैं राहो में

             प्रा. मोहन खडसे, अकोला.
                      संवाद : 9823289010
                   ईमेल: mvkhadse9@gmail.com

(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक,शिक्षण तज्ञ असून त्यांच्या सावित्री फाउंडेशन, अकोला च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक, शैक्षणिक कार्य करतात.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...