महिलादिन सप्ताहनिमित्त नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी लेखक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प संवाद : 9890967003 ना गपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांचा पहिला माझा परिचय आमच्या अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या कोरोना काळातील ऑनलाइन मिटिंगमध्ये झाला. कोरोना काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही जवळपास 1100 ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केले होते. त्या कोरोना काळामध्ये मिशन आयएएस अमरावती व ज्ञानदीप महाविद्यालय खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने एक ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात तेव्हा श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी ह्या सिंधुदुर्ग जिल...