मुख्य सामग्रीवर वगळा

महिला दिन सप्ताह निमित्त



         महिलादिन सप्ताहनिमित्त 

 नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी 

                   लेखक
          प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
          संचालक मिशन आयएएस                             अमरावती कॅम्प 
         संवाद : 9890967003

नागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांचा पहिला माझा परिचय आमच्या अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या कोरोना काळातील ऑनलाइन मिटिंगमध्ये झाला. कोरोना काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही जवळपास 1100 ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केले होते. त्या कोरोना काळामध्ये मिशन आयएएस अमरावती व ज्ञानदीप महाविद्यालय खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने एक ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात तेव्हा श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी ह्या  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या कार्यक्रमाला दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू हे देखील उपस्थित होते. मॅडमनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आमच्या स्पर्धा परीक्षा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. याच कार्यक्रमांमध्ये माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी कोकण भागामध्ये मिशन आयएएस सुरू करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत असेही आश्वासन दिले होते. 
       योगायोगाने विजयालक्ष्मी मॅडम नागपूरला विभागीय आयुक्त म्हणून आल्या .विजया लक्ष्मी मॅडमचा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील अनुकूल कल लक्षात घेता आम्ही त्यांना भेटलो .माझ्याबरोबर माझ्या  आय ए एस मिशनच्या नागपूरच्या संचालिका सौ सोनाली बुंदे मिशन आय ए एस नागपूरचे संचालक श्री अनिल मोहोड श्री राजेश मोहोड  प्रा. रमेश पिसे. श्री संजय सवाईथूल व विद्यार्थी संचालक डॉ.हर्ष यादव हे होते. नागपूर विभागातील येणाऱ्या सहा जिल्ह्यांमध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली मिशन आयएएस हा प्रकल्प राबवावा यासाठी आम्ही एक प्रस्ताव करून आणला होता .विजयालक्ष्मी मॅडमनी प्रस्ताव लगेच वाचला. आणि आपला अनुकूल अभिप्राय लगेच व्यक्त केला. त्या म्हणाल्या  हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मला हा उपक्रम आमच्या नागपूर विभागात राबविणे आवडेल .
      त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांना आमच्या प्रस्तावावर स्वतःच्या हस्ताक्षरात या प्रस्तावावर तात्काळ अंमलबजावणी करावी अशी सूचना केली .आणि त्या मला म्हणाल्या सर जिल्हा परिषद बाजूलाच आहे. आपण लगेच जिल्हा परिषदेमध्ये जा आणि हा प्रकल्प सुरुवातीला नागपूर जिल्ह्यापासून सुरू करा. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये गेलो.नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती  सौम्या शर्मा आय.ए.एस. यांना भेटलो .विभागीय आयुक्तांनी स्वतःच्या हस्ताक्षरमध्ये या प्रस्तावावर शिफारस केल्यामुळे त्यांनाही लगेच कार्यवाही करणे आवडले आणि लगेच त्यांनी नागपूर जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना बोलावले .त्यांना सूचना केल्या आणि हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या शाळांमध्ये व इतर संस्थांमध्ये राबविण्याचा आदेश दिला .आणि एक चांगला प्रकल्प नागपूर विभागात सुरू झाला .
      अनेक वेळा प्रस्ताव येतात आणि जातात स्थगित राहतात. परंतु श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी मॅडम यांनी इतक्या तत्परतेने हा प्रस्ताव स्वीकारला आणि अमलातही आणला .खरं म्हणजे काही तासात हे सगळं झालं .पत्र काढणे .ते जिल्हा परिषदेला पाठवणे .मग त्यावर कार्यवाही होणे .याला विलंब लागू शकतो. हे लक्षात घेऊन विजयालक्ष्मी मॅडमनी स्वतःच आपल्या हस्ताक्षरात आमच्या प्रस्तावावर सौम्या मॅडमला सविस्तर लेखी सूचना दिल्या व त्या अमलात आणण्याची सूचनाही केली. विभागीय  आयुक्तांच्या  या सूचनेमुळे आज नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचा मिशन आयएएस हा  प्रकल्प नियमितपणे सुरू झालेला आहे .या कामासाठी मी स्वतः आणि आमचे नागपूरचे संचालक मंडळ कामाला लागलेले आहोत.
       नागपूर बरोबरच आम्ही सर्वप्रथम निवडला तो गडचिरोली जिल्हा. मागासलेला जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा. या भागात आमचे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती  वडसा देसाईगंज येथील श्री नंदूभाऊ नरोटे आम्हाला मदत करावयाला आले .त्यानंतर आम्ही निवडला तो चंद्रपूर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये आम्हाला मदत करायला चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोपणा येथील आमचे विभागीय संचालक श्री संजय ठावरी व शिक्षक आमदार हे मदतीला आले .नागपूरची जबाबदारी आम्ही सोनाली बुंदे श्री प्रशांत भाग्यवंत प्रा. रमेश पिसे यांच्यावर सोपवली .त्यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात येणारी महाविद्यालये तसेच बहादुरा बेसा पिंपळा हुडकेश्वर  काटोल मौदा कामठी या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन या मिशन आयएएसला हातभार लावला .या उपक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे हे पण मदतीला आले. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील जागा स्पर्धा परीक्षा कार्यशाळा उपक्रमासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी जागा देखील व इमारती देखील उपलब्ध करून दिल्या. एक चांगला प्रकल्प नागपूर विभागात प्रारंभ झालेला आहे .आणि याचे श्रेय जाते ते नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त व सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्रीमती  विजयालक्ष्मी बिद्री आय.ए.ए यांनाच .त्यांच्या सौजन्याने मला त्यांच्या सरकारी विदर्भ भवन ह्या बंगल्यामध्ये वृक्षारोपण करण्याचा मान देखील मिळाला .
       आम्हाला नागपूरला श्रीमती विजयालक्ष्मी मॅडमला भेटायला जायचे असले तर एक एसएमएस पुरेसा आहे .मॅडम लगेच भेटायला बोलावतात. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आम्हाला मॅडमची लगेच भेट घेता येते. एक आयुक्त काय करू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे विजयालक्ष्मी बिदरी यांना मानावे लागेल .विजयालक्ष्मी मॅडमचे वडील  श्री शंकर बिदरी हे देखील आयपीएस अधिकारी म्हणून नावलौकिकास आलेले आहेत .चंदन तस्करी मध्ये संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या वीरप्पनचा सफाया करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या वडिलांनी आपल्या आयपीएस असण्याच्या कार्यकाळावर एक पुस्तक देखील लिहिलेले आहे .सत्यमेव जयते हे त्या पुस्तकाचे नाव आहे. वडील आयपीएस अधिकारी असल्यामुळे नकळत त्यांचे गुण त्यांची तत्परता त्यांची तेजस्विता आणि त्यांची तपस्विता विजयालक्ष्मी मॅडमच्या अंगी उतरली आहे आणि म्हणूनच कोणतेही काम अतिशय तत्परतेने करण्यामध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे .
      आजही आमचे नागपूरचे सर्व संचालक वेळोवेळी विजयालक्ष्मी मॅडमला भेटतात .त्यांचे मार्गदर्शन घेतात. आणि मिशन आयएएस नागपूर विभागातील वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये राबविण्यासाठी सातत्याने काम करतात. हे सगळे करण्याचे श्रेय व प्रेरणा विजयालक्ष्मी बिदरी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच आहे. हे वेगळे सांगणे न लगे .अशा या कर्तव्यदक्ष कर्तव्य तत्पर व लगेच निर्णय घेणाऱ्या विभागीय  आयुक्त अधिकारी असणाऱ्या विजयालक्ष्मी बिदरी यांना जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त मानाचा मुजरा. 
      •प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे 
          ००००००००००
              SUPPER NEWS-24

विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार,अकोला.
       महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती.. मिळविण्यासाठी
Follow this link to join my WhatsApp group: or contact 9371854706


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...