मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आरोग्य धनसंपदा

पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद.... . तुम्ही सकाळी किती वाजता उठता...?      हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.        पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?      “हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!      पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का...? इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितला.. ‘SAVERS’      ह्य...

आजचे दैनिक राशीभविष्य शनिवार,दि ०१ नोव्हेंबर२०२५

 आजचे   दैनिक राशीभविष्य  शनिवार,दि ०१ नोव्हेंबर २०२५            विक्रम संवत 2082, शके संवत 1947 (विश्ववसु संवत्सर), कार्तिक. एकादशी दशमी तिथीनंतर सकाळी 09:12 पर्यंत. पूर्वाभाद्रपदानंतर संध्याकाळी 06:20 पर्यंत नक्षत्र शततारका. पहाटे 02:09 पर्यंत ध्रुव योग , त्यानंतर व्याघत योग. करण गार सकाळी 09:12 पर्यंत, वणीज नंतर रात्री 08:28 पर्यंत, विष्टी नंतर. मेष राशी :-   दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी कराल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पालकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. व्यवसाय आणि करिअरसाठी दिवस चांगला जाईल. ऑनलाइन आणि शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांनी आज हुशारीने गुंतवणूक करावी. आज शारीरिक आरोग्याच्या समस्या असतील. वैवाहिक जीवनात गैरसमज दूर होतील. वृषभ राशी :-  तुम्ही दिवसाची सुरुवात नवीन उर्जेने आणि नवीन विचाराने कराल. सततच्या कौटुंबिक समस्येमुळे मानसिक ताण येईल. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन ...

मॉ. गायत्री संघाची विशेष सभा

मॉ. गायत्री ज्येष्ठ नागरिक संघाला  आ. मिटकरी यांनी दिला 5 लाखाचा निधी         प्रतिनिधी / 31 ऑक्टोबर   अकोला : मॉ. गायत्री ज्येष्ठ नागरिक संघाला आमदार अमोल मिटकरी यांनी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गायत्री नगर परिसरात असलेल्या जेष्ठ नागरिक संघातील वयोवृद्ध नागरिकांना दैनंदिन उपयोगाकरिता सुसज्ज अशा टिन शेड ची गरज होती. नागरिकांनी आपली ही मागणी  आ. अमोल मिटकरी यांचे समोर मांडताच  त्यांनी त्वरित हा  5 लाख रुपयांचा निधी सदर कामाकरिता मंजूर केला.               मॉ. गायत्री संघाची आज एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रमुख अतिथी म्हणून  आ. मिटकरी उपस्थित होते. या संघात वारकरी संप्रदायातील अनेक वयोवृद्ध नागरिक सभासद आहेत. संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या करिता एक विरंगुळा केंद्र तयार करण्यात आलेले आहे. या केंद्रात एका अद्यावत  अशा  टिन शेडची अतिशय गरज होती. आ. मिटकरी यांनी दिलेल्या निधीमुळे ही गरज आता पूर्ण होणार आहे. याप्रसंगी संघातर्फे  आ. मिटकरी यांचा शाल व श्रीफळ द...

आजची कथा

आजची कथा कर्माचा सिध्दान्त                        लेखक                     - सचिन मधुकर परांजपे                     पालघर      “ आ युष्यभर मजबूत पैसे खाऊन, अतोनात भ्रष्टाचार करुनही माणसं सुखासमाधानाने आणि मजेत रहातात त्यामुळे कर्मसिध्दान्त वगैरे सगळं झूट आहे” असा अनेकांच्या विचारांचा ट्रेन्ड सध्या दिसून येतो. मी अजिबात जजमेंटल नाही पण माझा अशा कितीतरी लोकांशी संपर्क आणि संवाद असल्याने मी याची एक्झॅक्टली दुसरी बाजू सांगतो. पटली तर घ्या नाहीतर सोडून द्या....       माझ्या परिचयातील असेच एक गृहस्थ... आयुष्यभर फक्त अतोनात भ्रष्टाचार केला. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पैसे खाल्ले. रिटायरमेंटपर्यंत एकही इनक्वायरी नाही की कसली चौकशीही नाही. खाल्लेला पै न पै नीट पचवून, इन्वेस्ट्मेंट करुन आणि पुढच्या दोन पिढ्यांची व्यवस्था करुन पेन्शनीत मस्त आयुष्य जगत होते. कसलीही ददात नाही की काही नाही.... वरवर पाहता अतिशय स...

आजचे दैनिक राशीभविष्य शुक्रवार,दि ३१आॕक्टोबर२०२५

 आजचे   दैनिक राशीभविष्य         शुक्रवार,दि ३१ आॕक्टोबर२०२५          विक्रम संवत 2082, शक संवत 1947 (विश्ववसु संवत्सरा), कार्तिक नवमी तिथी सकाळी 10:03 पर्यंत, त्यानंतर दशमी संध्याकाळी 06:51 पर्यंत नक्षत्र धनिष्ठा, त्यानंतर शततारका नक्षत्र वृद्धी योग पहाटे 04:31 पर्यंत, त्यानंतर ध्रुव योग करण कौलव सकाळी 10:04 पर्यंत, त्यानंतर तैतिल रात्री 09:44 पर्यंत, त्यानंतर गरज. मेष राशी :-   आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. कामात काही अडथळे येऊ शकतात, परंतु संयमाने काम केल्यास सर्व काही ठीक होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. वृषभ राशी :-  आज तुमच्या आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. घरात मतभेद होऊ शकतात, परंतु परिस्थिती लवकरच सुटेल. मिथुन राशी :-  आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. तुम्ही मित्रांना भेटू शकता. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कर्क राशी :-  आज तुम्हाला थोडी चिंता वाटेल. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याला मदत करावी लागू...

खाद्य संस्कृती

आरोग्यदायी हिरवी मिरची...        आपल्या दैनंदिन जेवणात एखाद्या पदार्थाला चविष्ट बनवणारी लहानशी हिरवी मिरची किती जादू घेऊन आली आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? बऱ्याच जणांना ती फक्त तिखटपणासाठी ओळखली जाते, पण खरं पाहिलं तर हिरवी मिरची ही आरोग्याचा खजिनाच आहे. थोड्या प्रमाणात रोजच्या आहारात मिरचीचा समावेश केल्याने शरीरात चयापचय सुधारतो, पचन व्यवस्थित होते आणि अंगातील दुखणे देखील कमी होते.  किती प्रमाणात खावी...? तज्ञांच्या मते, रोजच्या जेवणात १ ते २ हिरव्या मिरच्या पुरेशा असतात. त्याहून अधिक खाल्ल्यास अॅसिडिटी किंवा जठराशी संबंधित त्रास होऊ शकतो. म्हणूनच, योग्य प्रमाणात खाणे हेच आरोग्यासाठी सर्वात उपयुक्त आहे. सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणात हिरवी मिरची घेतल्यास ती सहज पचते. रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात मिरची खाल्ल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो, म्हणून रात्री टाळणे उत्तम.    हिरवी मिरची कशी खावी...? हिरवी मिरची खाण्याचे अनेक मार्ग आहेत. काहींना ती कच्ची खायला आवडते, तर काहींना भाजून किंवा तळून. पण सर्वात आरोग्यदायी पद्धत म्हणजे कच्ची मिरची, कारण त्यातून ...
आपला प्रांत सोडून इकडे मोलमजुरी करणाय्रा  आदिवासी व अत्यंत गरीब कुटुंबासोबत "कस्तूरी"ने साजरी केली दिवाळी व भाऊबीज अकोला : मेळघाट परिक्षेत्रातील ' रुईपाठा' या आदिवासी गावामध्ये कस्तुरी या सेवाभावी संस्थेने यंदाचा ,  दिवाळी' हा सण नुकताच साजरा केला...या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण आज सकाळी  पुनश्च घुसरवरून दीड किमी. अंतरावर आपातापा रोडवर शेतमजुरी करण्यासाठी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील अंबाळा गावातील आदिवासी व अत्यंत गरीब कुटुंबातील पाड्यावर भेट देऊन त्यांच्यासोबत संवाद साधला आणि त्या कुटुंबातील मजुरांची दिवाळी व भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा केला . हे लोक स्वतःच्या पोटापाण्यासाठी आपला प्रांत सोडून इकडे मोलमजुरी करण्यासाठी आले आहेत.. ते  दिवाळी व भाऊबीज साठी आपल्या गावी जाऊ शकले नाहीत. ही बाब निदर्शनास येताच कस्तुरी टीम ने भेट देऊन त्या समूहातील ५० महिलांना नवीन साड्या व  दिवाळीचे फराळ आणि मिठाई पॅकेट्स चे आज वितरण केले..   याप्रसंगी सर्व माता भगिनी व लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते...उपक्रमात सर्वश्री प्रा.किशोर बुटोले , डॉ.शांताराम बु...

गोरक्षण स्थळी वैकुंठ रथाचे कार्यार्पण संपन्न

गोरक्षण स्थळावर वैकुंठ रथ असावा : प्रा गजानन भारसाकळे     गोरक्षण स्थळी वैकुंठरथाचे कार्यार्पण संपन्न                 गणेश साखरे यांनी केले विधिवत पूजन                                      दर्यापूर : महाराष्ट्र राज्यात गायीला मातेचा दर्जा प्राप्त असून संगोपण कर्तव्यासह तिचा अंत्य संस्कार सुद्धा तितक्याच सन्मानाने साध्य व्हावा  या उदात्त हेतुने दर्यापूर तालुक्यातील माहुली ( धांडे ) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्था स्थळावर गाय वासरांच्या अंतीम संस्कारासाठी एका वैशिष्टपूर्ण वैकुंठ रथाची निर्मिती करण्यात आली आहे . गोरक्षण संस्थेचे संचालक प्रा. गजानन भारसाकळे यांनी आपल्या अभियांत्रिकी  ज्ञानाच्या संकल्पनेतून या मनुष्य चालीत रथाला पूर्णाकृती रूप दिलेले असून या रथावर  दोन व्यक्ती साह्याने गाय - वासरांना मोक्ष स्थळावर वर्षभर कोणत्याही ऋतुमध्ये नेण्याची क्षमता आहे . या रथाचे विधिवत पूजन माहुली ( धांडे ) येथील श्री नारायण गुरु...

प्रथम पुण्यस्मरण स्व.बाळासाहेब उर्फ रामचंद्र हरिहर खंडारे (पाटील)

             प्रथम पुण्यस्मरण स्व.बाळासाहेब उर्फ रामचंद्र हरिहर खंडारे (पाटील)         • जन्म :११/०७/१९६४        • मृत्यू : ३०/१०/२०२४ आज एक वर्ष झाले तुला जाऊन पण सतत डोळ्यासमोरच दिसतोस...             शोकाकुळ • श्री हरिहर बाबाराव खंडारे (वडील) • सौ.गौकर्णा हरिहर खंडारे (आई) • राजकन्या रामचंद्र खंडारे (पत्नी) • सुरेश पाटील ,सौ.रत्नप्रभा पाटील  • श्री बाळासाहेब तायडे, सौ रेखा तायडे •  श्री सुधीर बोंडे, सौ मंगला बोंडे  • श्री त्र्यंबकराव साबळे, सौ. सुवर्णा साबळे • श्री देवानंद देवराव गावंडे (जावाई) • सौ राधिका देवानंद गावंडे (मुलगी • श्री स्वप्नील प्रकाश इंगळे (जावाई) • सौ. निलीमा स्वप्नील इंगळे (मुलगी) • श्री संकेत रामचंद्र खंडारे (मुलगा) • सौ पोर्णिमा संकेत खंडारे (सुन) • कु. राणी भालचंद्र खंडारे (पुतनी) • कु.मंजिरी भालचंद्र खंडार (पुतनी) • कु. अनिका संकेत खंडारे (नात)

आरोग्य धनसंपदा

अंगस्थिती – शरीराचा डौल आणि आरोग्याचा पाया                         संकलन :           डॉ. जितेंद्र चंद्रकांत घोसाळकर           धन्वंतरी गोपियुश, अलीबाग,                  रायगड            संवाद : 8484991388                              7798617222 मानवी शरीर हे निसर्गाने अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर रचनेने घडवले आहे. प्रत्येक हाड, प्रत्येक स्नायू आणि सांधा विशिष्ट कार्यासाठी बनलेला आहे. या सर्व घटकांची योग्य जुळवाजुळव होऊन जेव्हा शरीर आपली नैसर्गिक, सुखद आणि संतुलित स्थिती राखते, तेव्हाच त्याला “अंगस्थिती (Posture)” म्हणतात. शरीराची ही अंगस्थिती म्हणजेच आपल्या आरोग्याचा पाया आहे. माणूस स्वस्थ बसतो, उभा राहतो, चालतो, वाकतो किंवा झोपतो — या सर्व क्रियांमध्ये स्नायूंना ताण न पडता शरीर आपले कार्य योग्य रीतीने पार पाडते, तेव्हाच ती अंगस्थिती...

अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या हक्काची खुलेआम पायमल्ली

• पे ट्रोल पंपावर मोफत हवा मिळत नाही, नियम वाऱ्यावर! •  हवा पंप 'शोभेचे साधन', नियमांकडे दुर्लक्ष चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या हक्काची खुलेआम पायमल्ली होत आहे. मोफत हवा पंपाची सुविधा ही प्रत्येक वाहनधारकाचा हक्क असूनही, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी ही सेवा बंद किंवा दाखवण्यासाठी ठेवलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मोफत हवा, तसेच सुविधा संदर्भात पेट्रोल पंप चालकांना निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कारवाईचे निर्देश 'थंड' मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी सुविधा नसलेल्या पंपांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर काही पंपांनी सेवा सुरू केली होती. मात्र, आता पुन्हा अनेक ठिकाणी या सुविधा गायब झाल्या आहेत. एवढेच नव्हे, तर काही पंपांवर नियमित पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याचेही प्रकार घडत आहेत, त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांनी करावी तक्रार 'पेट्रोल पंपावर मोफत हवा, पिण्याचे पाणी किंवा शौचालयाची सुविधा नसेल, तर कंपनीकडे किंवा जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल करता य...

खासदार व लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला यांना सदर गीत संग्रह भेट देण्यात आले. यावेळी शुभेच्छा देत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणे हे उत्कृष्ट कार्य असल्याची प्रतिक्रिया श्री बिर्ला यांनी दिली.

डॉ रामप्रकाश वर्मा यांच्या 'शिखर नव छू लें' गीत संग्रहाचे कोटा येथे वितरण विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणे उत्कृष्ट कार्य - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला अकोला / कोटा...  भारतात प्रामुख्याने कोटा शहरात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या खूप चिंतेची बाब असण्याच्या स्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे मनोबल उंचविणाऱ्या डॉ. रामप्रकाश वर्मा यांच्या 'शिखर नव  छू लें' या गीतसंग्रहाचे कोटा येथे वितरण करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम कोटा येथील खासदार व लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला यांना सदर गीत संग्रह भेट देण्यात आले. यावेळी शुभेच्छा देत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणे हे उत्कृष्ट कार्य असल्याची प्रतिक्रिया श्री बिर्ला यांनी दिली.         तदनंतर सदर गीत संग्रह बंसल कोचिंग क्लासेसचे सीओ श्री समीर बंसल यांना देण्यात आले.  आपण या गीतांचे आपल्या आवाजात रेकॉर्डिंग पाठवावे ते आम्ही विद्यार्थ्यांना नियमित ऐकवू अशी प्रतिक्रिया देऊन ही काळाची गरज असल्याचे बंसल म्हणाले. रिझोलन्स कोचिंग क्लासेसचे अधिकारी किर्ती सिंग यांनी सदर गीत संग्रह चाळून  या मधील अनेक कविता आम...

१७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश   मुंबई  :  वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह - ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री  फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आदी उपस्थित होते.   ...

“रिफाइंड तेल” म्हणजे रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वच्छ केलेले तेल — यात रंग, वास, चव, आणि नैसर्गिक घटक बदलले जातात, जेणेकरून तेल अधिक दीर्घकाळ टिकणारे आणि आकर्षक दिसणारे बनते.

रिफाइंड तेल म्हणजे काय आणि ते कसे बनते?                     लेखक                    ✍️ डॉ. जितेंद्र घोसाळकर                    धन्वंतरी गोपियुश उपचार                      संवाद : 7798617222 “रिफाइंड तेल” म्हणजे रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वच्छ केलेले तेल — यात रंग, वास, चव, आणि नैसर्गिक घटक बदलले जातात, जेणेकरून तेल अधिक दीर्घकाळ टिकणारे आणि आकर्षक दिसणारे बनते. परंतु या प्रक्रियेमुळे शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्वे नष्ट होतात आणि तेल जास्त प्रमाणात रासायनिकदृष्ट्या प्रक्रिया केलेले (chemically processed) बनते. #रिफायनिंगची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया १. तेलाचे रासायनिक विलयन (Solvent Extraction) सुरुवातीला, बी किंवा बिया (उदा. सोयाबीन, सूर्यफूल, कापूसबिया) यांच्यातून तेल काढण्यासाठी Hexane (हॅग्झेन) नावाचा रासायनिक सॉल्व्हेंट वापरतात. हॅग्झेन हे पेट्रोलियम डेरिव्हेटिव्ह आहे — म्हणजेच ते ग...

आरोग्य धनसंपदा

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने होणारे अद्भुत फायदे! आ जकाल लोक आपल्या शरीरातील टॉक्सिन्स (विषारी घटक) कमी करण्यासाठी विविध उपाय करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्याकडे जे नैसर्गिक उपाय आहेत ते सर्वात सुरक्षित आणि प्रभावी आहेत? त्यापैकी एक म्हणजे तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे. होय, फक्त किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्यामुळे तुमचे शरीर स्वच्छ, ताजेतवाने आणि निरोगी राहते.        तांब्याचे भांडे प्राचीन काळापासून आरोग्यासाठी प्रसिद्ध आहे. या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर पडतात, पचन सुधारते, त्वचा निरोगी होते. आणि ऊर्जा वाढते. विशेषत: जे लोक वर्कआऊट करतात किंवा ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करतात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.   तांब्याच्या पाण्याचा उपयोग कसा करावा? 1.  भांडे निवडा:  स्वच्छ, शुद्ध तांब्याचे भांडे वापरा. इतर धातूंचा प्रभाव नको असेल तर फक्त तांब्याचे. 2.  पाणी भरा : भांड्यात स्वच्छ पाणी भरा. कोणीही झरे किंवा फिल्टर्ड पाणी वापरू शकते. 3. ठेवा: भांडे झाकण ठेवून किमान ८ तास, म्हणजे संपूर्...