मुख्य सामग्रीवर वगळा

खासदार व लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला यांना सदर गीत संग्रह भेट देण्यात आले. यावेळी शुभेच्छा देत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणे हे उत्कृष्ट कार्य असल्याची प्रतिक्रिया श्री बिर्ला यांनी दिली.

डॉ रामप्रकाश वर्मा यांच्या 'शिखर नव छू लें' गीत संग्रहाचे कोटा येथे वितरण
विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणे उत्कृष्ट कार्य - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

अकोला / कोटा...
 भारतात प्रामुख्याने कोटा शहरात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या खूप चिंतेची बाब असण्याच्या स्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे मनोबल उंचविणाऱ्या डॉ. रामप्रकाश वर्मा यांच्या 'शिखर नव  छू लें' या गीतसंग्रहाचे कोटा येथे वितरण करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम कोटा येथील खासदार व लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला यांना सदर गीत संग्रह भेट देण्यात आले. यावेळी शुभेच्छा देत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणे हे उत्कृष्ट कार्य असल्याची प्रतिक्रिया श्री बिर्ला यांनी दिली. 
       तदनंतर सदर गीत संग्रह बंसल कोचिंग क्लासेसचे सीओ श्री समीर बंसल यांना देण्यात आले.  आपण या गीतांचे आपल्या आवाजात रेकॉर्डिंग पाठवावे ते आम्ही विद्यार्थ्यांना नियमित ऐकवू अशी प्रतिक्रिया देऊन ही काळाची गरज असल्याचे बंसल म्हणाले. रिझोलन्स कोचिंग क्लासेसचे अधिकारी किर्ती सिंग यांनी सदर गीत संग्रह चाळून  या मधील अनेक कविता आमच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रसारित करू, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढेल, असे म्हटले. तर एच आर विभागाच्या अधिकारी डॉ निधी श्रीवास्तव यांनीही  सकारात्मक प्रतिसाद दिला. एलन कोचिंग क्लासेसचे  प्राचार्य  खुनेजा यांनी या गीत संग्रहाला प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला. भारतेंदु परिषदचे कोटा येथील ज्येष्ठ पदाधिकारी व कोटा उपभोक्ता संचाचे अध्यक्ष श्री हरेकृष्णा बिर्ला यांनाही सदर पुस्तक देण्यात आले तेव्हा कोटा येथील वाचनालयात हा गीतसंग्रह देणार असल्याचे ते म्हणाले. 
      विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला मोबाईल,  सोशल मीडिया,  ताण तणाव,  पालकांचा दबाव,  अशी विविध कारणे असली तरी विद्यार्थ्यांचे मनोबल कुंमकूवत होणे, हे एक महत्त्वाचे कारण असल्याचा सूर या क्षेत्रातील दिग्गजांनी काढला.  त्यात एकुण 70 गीतांचा संग्रह असलेला शिखर नव छू लें' हा गीत संग्रह विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना सतत ऊर्जा देऊन प्रेरणा देण्याचे काम करेल, असा आशावाद यावेळी संबंधितांनी व्यक्त केला. 
       सदर गीत संग्रहाचे वितरण वेळी डॉ.  रामप्रकाश वर्मा, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे खामगाव,  तसेच कोटा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री गुप्ताजी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...