मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सातबारा कोरा कोरा न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

कर्जमाफीत ‘तारीख पे       तारीख'; शेतकऱ्यांची थट्टा!     ३० जूनची मुदत पुन्हा              वाढविल्याने किसान         ब्रिगेड संतप्त सातबारा कोरा कोरा न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ✍🏻 अकोला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत ३० जूनऐवजी ५ जुलैपर्यंत वाढविण्याच्या निर्णयावर किसान ब्रिगेडने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुदतवाढीच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप करत कोणतीही चालढकल न करता सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचा सातबारा तातडीने कोरा करावा, अशी मागणी केली आहे.         किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी चंदीगड येथे देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या तयारीसाठी दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.         यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने घोषित करण्यात आलेल्या योजनेची अंमलबजाव...

🔴दैनिक देशोन्नती मध्ये दर मंगळवारी प्रकाशित माझा साप्ताहिक स्तंभ सरळ - सरळ

  अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण विरोधी मोर्चा  हक की लडाई में जो पीछे रह गए, उन्हे आगे बढाना है। आरक्षण की ताकद से, हर वंचित को सशक्त बनाना है।              'अ नुसूचित जातीतील अ ब क ड उपवर्गीकरण हटाव आणि संविधान बचाव', यासाठी आज ३० जून रोजी मुंबईत ५९ अनुसूचित जातीचा जनआक्रोश महामोर्चा आयोजित केला आहे. आंबेडकरी चळवळीचे नेते भीमराव आंबेडकर तसेच आनंदराज आंबेडकर आणि माजी मंत्री बबनराव घोलप हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.          अनुसूचित जातीतील अ ब क ड उपवर्गीकरण काय आहे? हे वर्गीकरण गरजेचे आहे का? या वर्गीकरणामुळे अनुसूचित जातीत इतर वर्गाचा काय फायदा, काय तोटा होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासणे गरजेचे आहे.        ‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण केले पाहिजे, मात्र हे लागू करावे किंवा नाही, हे राज्याचे अधिकार आहेत,’ असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी  दिला आहे. तर महाराष्ट्र शासनाने याविषयी निवृत्त न्यायमुर्ती अनंत मनोहर बदर यांची एक सदस्यीय समिती गठीत केली. ...

आजचे राशिभविष्य (बुधवार,दि. १ जुलै २०२६)

आजचे राशिभविष्य (बुधवार,दि. १ जुलै २०२६) विक्रम संवत 2083, शक संवत 1948 (पराभव संवत्सर), ज्येष्ठ मासे कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी सकाळी 07:38 पर्यंत, त्यानंतर द्वितीया नक्षत्र पूर्वाषाढा सकाळी 06:51 पर्यंत, त्यानंतर उत्तराषाढा, दुपारी 04:04 पर्यंत इंद्र योग, त्यानंतर वैधृती योग करण कौलव सकाळी 07:38 पर्यंत, त्यानंतर तैतिल रात्री 08:40 पर्यंत, त्यानंतर गर. ____________________ सुविचार 48. चांगल्या गोष्टींसाठी वेळ द्या. ______________ स र्व प्रकारच्या पूजा,वास्तू व ज्योतिष शास्त्रविषयक माहितीसाठी संपर्क पं.व्यंकटेश देशपांडे (गुरुजी) संवाद :     7499121664                 9881601459. _____________________________ आजचे राशिभविष्य (बुधवार,दि.१ जुलै २०२६) मेष राशी :- आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीच्या किंवा नवीन नोकरीच्या उत्तम संधी मिळू शकतात.  वृषभ राशी :- तुम्ही संयमाने काम केल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. बऱ्याच काळापासून थांबलेल्या गोष्टी हळूहळू पुन्हा म...

पंजाबराव देशमुख मिशन IAS अकादमी ही संस्था म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था नाही; ती स्वप्नांना पंख देणारे तीर्थक्षेत्र आहे. तिथे येणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ परीक्षेची तयारी करत नाही, तर तो जीवन समजून घेतो, माणुसकी शिकतो आणि राष्ट्रसेवेची शपथ घेतो.

युगपुरुष, प्रेरणापर्व आणि आमचे पूज्य गुरुवर्य डॉ . नरेशचंद्र काठोळे सर यांना वाढदिवसानिमित्त कृतज्ञ अभिवादन                           लेखक                    महेबूब कासार           Ex. Deputy Commissioner               of GST. Mumbai         आ दरणीय गुरुवर्य डॉ. नरेशचंद्र काठोळे सर,  साष्टांग दंडवत प्रणाम! आज दि. १ जुलै... हा दिवस कॅलेंडरवरील एक साधा दिवस नाही. हा दिवस त्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा जन्मदिन आहे, ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा दिली, लाखो हृदयांमध्ये आत्मविश्वास चेतवला आणि असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा सूर्य उगवला.       सर, परमेश्वर प्रत्येक युगात काही निवडक व्यक्तींना पृथ्वीवर पाठवत असतो. त्या व्यक्ती स्वतःसाठी जगत नाहीत; त्या समाजासाठी जगतात. त्या स्वतःची ओळख निर्माण करण्यापेक्षा इतरांचे भविष्य घडविण्यात आनंद मानतात. आपण अशाच दिव्य ...

प्रा.डाॅ.नरेशचंद्र काठोळे सरांचा १ जुलैला 73 वा वाढदिवस. त्यासाठी त्यांना खूप खूप आभाळभर शुभेच्छा. आपले हे सेवाभावी व्रत असेच अखंडपणे सुरू राहो. आणि आपले उद्दिष्ट सफल होवो. हीच प्रार्थना...

    विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे                     अफलातून व्यक्तिमत्व  मिशन आयएएसचे संचालक     प्रा.डाॅ. नरेशचंद्र काठोळे                    लेखिका             ©®पल्लवी उमरे                   कार्यकारिणी सभासद                     मिशनआयएसआय                             मुंबई.         वि द्या विनयेन शोभते. असंच एक  विनयशील प्रतिभावंत , हरहुन्नरी व्यक्तिमत्व,गाढे अभ्यासक,व्याख्याते ,लेखक ,आणि मार्गदर्शक , दिवसरात्र मिशन आयएएसच्या कार्याला संपूर्णपणे वाहून घेतलेले उत्स्फूर्त सेवाभावी बुद्धिवादी व्यक्तिमत्व म्हणजे मिशन आयएएस अमरावतीचे संचालक श्री. नरेशचंद्र काठोळे सर...   मिशन आयएएस मुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिच...

वारकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'चरण सेवा' उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या ११ प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे.

      वारकऱ्यांच्या 'चरण           सेवेला' प्रारंभ मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा         भक्ती विठोबाची,सेवा               आरोग्याची उपक्रम           मुंबई/अकोला, दि. ३०: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना तसेच स्वयंसेवक यांच्या समन्वयातून पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या चरणसेवेला प्रारंभ झाला आहे. त्यात आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि आरोग्य जनजागृतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चरण सेवेकरिता समन्वय वारकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'चरण सेवा' उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अ...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, ३० जून २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. आणि महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येणार आहे.

'जय महाराष्ट्र’ ‘व दिलखुलास’ कार्यक्रमात महाबीजचे   व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांची विशेष मुलाखत             🔶मुंबई, दि.३०: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘महाबीजच्या कार्याचा आणि आगामी कृषी धोरणांचा वेध’ या विषयावर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) चे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.      ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, ३० जून २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. आणि महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार २, शुक्रवार, ३ आणि शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन आणि ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.       महाराष्ट्राच्या कृषी विकासात महत्त्वपूर्ण योगदान ...

आजचे राशिभविष्य (मंगळवार,दि. ३० जून २०२६)ु

आजचे राशिभविष्य (मंगळवार,दि. ३० जून २०२६) संवत्सर विक्रम संवत 2083, शक संवत 1948 (पराभव संवत्सर), ज्येष्ठ प्रतिपदा नक्षत्र पूर्वाषाढा ब्रह्म योग दुपारी 03:18 पर्यंत, त्यानंतर इंद्र योग. करण बलव संध्याकाळी 06:33पर्यंत _____________ सुविचार 47. दुसऱ्यांचा आदर करा. __________________________ स र्व प्रकारच्या पूजा,वास्तू व ज्योतिष शास्त्रविषयक माहितीसाठी संपर्क पं.व्यंकटेश देशपांडे (गुरुजी) संवाद :     7499121664                 9881601459. _____________________________ आजचे राशिभविष्य (मंगळवार,दि.३० जून २०२६) मेष राशी :- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. नशीब तुमच्या बाजूने असेल, पण कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना थोडे शांत राहा. वृषभ राशी :- आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक लाभ घेऊन येईल. भगवान हनुमानाच्या आशीर्वादाने, तुम्हाला पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबात आनंद नांदेल. मिथुन राशी :- जे नोकरी करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला कार्यालयात तुमच्या वरिष्ठांकड...