ब्रिगेड संतप्त
सातबारा कोरा कोरा न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
✍🏻अकोला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत ३० जूनऐवजी ५ जुलैपर्यंत वाढविण्याच्या निर्णयावर किसान ब्रिगेडने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुदतवाढीच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप करत कोणतीही चालढकल न करता सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचा सातबारा तातडीने कोरा करावा, अशी मागणी केली आहे.
किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी चंदीगड येथे देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या तयारीसाठी दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने घोषित करण्यात आलेल्या योजनेची अंमलबजावणी वारंवार पुढे ढकलणे म्हणजे त्या थोर व्यक्तिमत्त्वाचाही अपमान असल्याचा घणाघाती आरोप केला. सरकारने शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांची 'तारीख पे तारीख' देणे थांबवून प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत सातत्याने होत असलेल्या विलंबामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, सरकारने आता घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी किसान ब्रिगेडने केली आहे.
किसान ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष दिवाकर गावंडे, जिल्हाध्यक्ष भगवंतराव गवळी, कार्याध्यक्ष शरद वानखडे, उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, सरचिटणीस प्रदीप चोरे, सचिव राजेश मावळे, रामधन दामोदर, सिद्धार्थ तायडे आणि रवींद्र जवंजाळ यांनीही सरकारने जाहीर केलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा
दरम्यान, किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मिश्रा यांनी सरकारला इशारा देताना, शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करण्यात यावा. अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या तीव्र असंतोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले.
००००००००००००००
🌴||झाडे लावा🌴झाडे जगवा||🌴
🌴 वृक्ष वाचवा🌴पृथ्वी वाचवा 🌴
०००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
(PRO)
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी)
डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती संवाद : 9371854706 महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706 ____________________________ ________
डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
संवाद : 9371854706
महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .
Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706
____________________________ ________



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा