मिशन आयएएसतर्फे ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर (प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे ) अमरावती : स्पर्धा परीक्षेच्या जगतात संपूर्ण भारतात विनामूल्य काम करणाऱ्या व दुसऱ्या वर्गापासून आयएएस या परीक्षेचे केवळ एक रुपया प्रतिदिन इतक्या अल्पशुल्कामध्ये प्रशिक्षण देणाऱ्या अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस आणि वलगावच्या श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे येत्या उन्हाळ्यात ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे सात दिवसांचे शिबिर मे महिन्यात अमरावती शहरातील सर्वात भव्य असलेल्या शिकची रिसॉर्ट मध्ये संपन्न होणार आहे. मिशन आयएएस ही भारतामधील प्रतिष्ठीत सेवाभावी संस्था असून गेल्या पंचवीस वर्षांमध्ये या संस्थेने स्पर्धा परीक्षा विषयक विविध उपक्रम आयोजित केले आहेत. या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आय ए एस या संस्थेचे उद्घाटन महाराष्ट्राचे सध्याचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी के...