मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ. बबन बेलसरे यांना जीवन गौरव पुरस्कार 
 उद्या नागपुरात सन्मान

       (प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे)
अमरावती : 
अमरावती शहरातील सामाजिक बांधिलकीचे सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायी डॉ. बबन बेलसरे यांना विदर्भस्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
•क्लिक करा, सविसतर वाचा ...


 वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार शनिवार दि. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वा. नागपूर येथील रामदास पेठेतील सुप्रसिद्ध सेंट्रल पॉईंट हॉटेलच्या सभागृहात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर अतिथींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन एओआय व एच एन एस या संघटनांनी त्यांच्या विदर्भस्तरीय अधिवेशनामध्ये आयोजित केला आहे.
डॉ. बबन बेलसरे यांचा वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात चांगला नावलौकिक असून ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या वीस वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा श्री प्रा. शाम मानव यांचे कार्यक्रम ते अमरावती शहरात आयोजित करीत आहेत. याशिवाय मिशन आयएएस डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी  साहित्य संगम विदर्भ सत्यशोधक मंडळ इंडियन मेडिकल असोसिएशन प्रयास या विविध संस्थांशी पदाधिकारी म्हणून त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील एस एल हायस्कूलमध्ये झाले असून महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयात तर एमबीबीएस त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयातून पूर्ण केले आहे.  सामाजिक बांधिलकी जपणारा डॉक्टर म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. अमरावती शहरात होणाऱ्या विविध सामाजिक साहित्यिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. या सत्कार समारोहात त्यांच्याबरोबर त्यांच्या अर्धांगिनी प्रा. सौ रेखा बेलसरे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना मिळालेल्या ह्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल मिशन 
आयएएसचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...