श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचे सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन अकोला : श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर/पिंपळोद यांच्या वतीने रविवार दिनांक ७ जून २०२६ रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथे भव्य सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचे पारायण सकाळी ८.३० वाजता सुरू होणार असून हा ऐतिहासिक सोहळा श्री माहेश्वरी भवन, एसटी स्टँड समोर, शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे संपन्न होणार आहे. या धार्मिक व ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच आदल्या दिवशी येणाऱ्या भक्तांसाठी शनिवार दिनांक ६ जून २०२६ रोजी श्री माहेश्वरी भवन येथे निवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्याचे आयोजन श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर/प...