(यशोधन गोडबोले यांजकडून)
•अकोला : स्थानिक श्री विठ्ठल मंदिर येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या भागवत सप्ताह मध्ये सहाव्या पुष्पात ह.भ.प. श्री सुजित महाराज देशमुख यांनी भागवत कथेमधील श्रीकृष्णाच्या बाललीला स्कंध उलगडून सांगितले. यावेळी गोपालकाला व गोवर्धन पूजा करण्यात आली.
भगवान श्रीकृष्ण नंदराजा व यशोदे कडे जसेजसे मोठे होतात तसें त्यांच्या बाल लिलांचे सुंदर वर्णन आहे, गोप व गोपिकांसोबत जंगलात खेळणे, गाईंसोबत असलेले त्यांचे विशेष प्रेम, यशोदामैय्याला आपल्या लिलांनी त्रास देणे त्यांना मोहित करणे व आपल्या दिव्यत्वाचा आभास करून देणे अश्या अनेक कथा सुजितमहाराज यांनी सांगितल्या.
त्याच वेळी कालिया मर्दन, कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पाठवलेली पुतना व तिचा केलेला वध या सर्व बाललीला भगवंताने आपल्या समर्थ्याने केल्या हे हीं सांगितले. शेवटी गोपालकाला करून आजच्या सत्राचे समापन करण्यात आले.
त्यानंतर महाआरतीच्या वेळी सर्वसेवाधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा तसेंच मंडळाकडून यजमान श्री विकास व सौ वैशाली वाणी व श्री प्रवीण पुरवार सपत्नीक उपस्थित होते
भागवत कथा सफल करण्यासाठी व्यवस्थापक रमेश अलकरी यांचे मार्गदर्शनाखाली अजय खोत, प्रमोद अलकरी, नितीन विसपुते, कैवल्य अलकरी, संजय कुलकर्णी, उमेश डहाके, गजानन ठोसर, यश ठाकूर, भगवान मेहर परिश्रम घेतं आहेत.
तसेंच भागवत समाप्तीला म्हणजेच पौर्णिमा दिनांक ३१ रोजी रुख्मिणी स्वयंवाराची कथा व श्रीकृष्ण रुख्मिणी विवाह देखावा करण्यात येणार आहे.
०००००००००००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
(PRO)
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी)
डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती संवाद : 9371854706 महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ...Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706०००००००००००००००००००००००
डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
संवाद : 9371854706
महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ...
Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706
०००००००००००००००००००००००


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा