मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
      सामाजिकतेतील सहसचिव प्रवीण वासनिक                          लेखक             प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे               संस्थापक संचालक      मिशन आयएएस अमरावती कॅम्प                    संवाद : 9890967003 ✍🏻 ए क ऑगस्ट 2026. वेळ रात्री अकरा वाजताची. माझा फोन खणखणला. माझे सहसचिव श्री प्रवीण वासनिक यांचा तो फोन होता. श्री तुकाराम मुंढे यांचा अमरावतीच्या पोटे टाऊनशिप मधील भरगच्च कार्यक्रम संपून अडीच तास झाले होते. या कार्यक्रमासाठी बाहेरगावावरून आलेल्या लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रवीण वासनिक वर दिली होती. त्या जबाबदारीतून मोकळे झाल्यानंतर त्याने मला फोन केला होता. सर्वांची भोजन व निवास व्यवस्था झाल्याचे त्यांनी मला कळविले व  मला सर तुम्ही कुठे आहात. मी म्हणालो मी सर्किट हाऊसला श्री तुकाराम मुंढे यांच्याबरोबर आहे.       त्यावर तो...

🌹दैनिक देशोन्नती मध्ये दर मंगळवारी प्रकाशित माझा साप्ताहिक स्तंभ सरळ सरळ

पोषणाचा मंत्र... निरोगी जीवनाचा आधार! ‘थाली में अगर पोषण का रंग भर जाएगा, हर इंसान स्वस्थ और सक्षम बन जाएगा।   ✍🏻 आ जपासून म्हणजेच १सप्टेंबरपासून ७सप्टेंबरपर्यंत देशभरात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जाणार आहे. आरोग्य, उत्पादकता आणि सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहार व पोषणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताहाची सुरुवात १९८२ मध्ये खाद्य व पोषण मंडळामार्फत करण्यात आली.              संतुलित आहार म्हणजे केवळ भात, पोळी किंवा भाजी खाणे नव्हे. आपल्या ताटात डाळी-वरण, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, विविध रंगांची फळे, दूध-दही, भरड  धान्ये आणि तृणधान्ये यांचा योग्य प्रमाणात समावेश असणे आवश्यक आहे.          शरीराची वाढ, ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्ती आणि विविध अवयवांचे कार्य व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे, कर्बोदके, चरबी, खनिजे आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. त्यामुळे एकाच प्रकारच्या अन्नावर अवलंबून न राहता विविधता असलेला आहार घेणे महत्त्वाचे आहे. भ...
          श्रावण महिन्यातील उपवास.. आहार कसा असावा आणि शरीराला होणारे फायदे  ✍🏻श्रा वण महिना म्हणजे भक्ती, संयम आणि सात्त्विक आहाराचा काळ. या महिन्यात अनेक जण सोमवार, एकादशी, संकष्टी किंवा इतर दिवशी उपवास करतात. उपवास हा श्रद्धेचा भाग असला तरी तो योग्य पद्धतीने केला तर आपल्या आहाराच्या सवयींकडे लक्ष देण्याची एक चांगली संधी ठरू शकतो. श्रावणातील उपवासामध्ये आहार कसा असावा? 💧 १. पाणी पुरेसे प्या उपवास करताना पाणी कमी पडू देऊ नका. तहान, अशक्तपणा किंवा डोकेदुखी जाणवत असल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झालेले असू शकते. 🍎 २. संपूर्ण फळांना प्राधान्य द्या सफरचंद, पेरू, संत्रे, पपई यांसारखी संपूर्ण फळे योग्य प्रमाणात घेता येतात. फळांच्या रसापेक्षा संपूर्ण फळ अधिक चांगला पर्याय आहे. 🥜 ३. प्रथिने आणि पौष्टिक चरबीचा समावेश करा शेंगदाणे, दही, दूध घेत असल्यास दूध/दही आणि योग्य प्रमाणात सुकामेवा यांचा वापर करता येतो. यामुळे पोट भरलेले राहण्यास मदत होऊ शकते. 🍠 ४. रताळे किंवा कंदमुळे प्रमाणात घ्या उकडलेले किंवा भाजलेले कंद तळलेल्या पदार्थांपेक्षा चांगला पर्याय ठरू शक...
  सौर कृषी वाहिनीत अकोला जिल्हा राज्यात प्रथम           (SUPER NEWS-24-मराठी) ✍🏻 अकोला : शेतकऱ्यांना दिवसा आणि खात्रीशीर वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंमलबजावणीत अकोला जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टापैकी ८३.४० टक्के ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य पूर्ण केले आहे.           वाशीम जिल्ह्याने ७०.४३ टक्के उद्दिष्टपूर्तीसह राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. अकोला परिमंडळाने ६०.८० टक्के कामगिरीसह राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती 'महावितरण'चे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी दिली.   महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. अकोला परिमंडळासाठी २०६ ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून महावितरणच्या १७४ उपकेंद्रांसाठी ७९६ मेगावॉट वीज निर्मितीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी १०७ उपकेंद्रांच्या माध्यमातून ४८४ मेगावॉट वीज नि...

यशस्वी कॅडेट्सचा एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे आणि एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

       एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाच्या कॅडेट्सना सीएटीसी. कॅम्पमध्ये ८ पदके             (SUPER NEWS- 24-मराठी)         ✍🏻 अकोला : ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन, अकोला यांच्या वतीने २१ ते ३० ऑगस्ट दरम्यान सी.ए.टी.सी. ११४ या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विकास शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कॅम्पमध्ये ११ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत १२ शाळा व ७ महाविद्यालयांतील एकूण ३५० कॅडेट्सनी सहभाग घेतला होता.        या कॅम्पमध्ये कॅडेट्सच्या नेतृत्वगुणांना वाव देण्याबरोबरच ऑब्स्टॅकल, फायरिंग, ड्रिल, प्रश्नमंजुषा, वादविवाद, निबंध, चित्रकला तसेच विविध सांस्कृतिक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटमधील कॅडेट्सनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ८ पदके प्राप्त केली. यामध्ये सिनियर अंडर ऑफिसर आदित्य टाले याने कंपनी कमांडर व बेस्ट कॅडेट या दोन्ही विभागांत सुवर्णपदके मिळविली.      ...

🔷लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ६०व्या विचारमंथन मेळाव्यात लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा जीवन गौरव व राष्ट्रसेवा जीवनगौरव पुरस्कार ! श्रीरंगदादांच्या कार्याचा गौरव

पत्रकारांनी अनाचार  व सामाजिक अडचणी निर्भयतेने मांडल्या पाहिजेत :श्रीरंग पिंजरकर   स्व.डी.वाय‌.पाटील व पत्रकार कुंदन जाधव यांना श्रध्दांजली  पत्रकार मनोज भगत, श्रीकृष्ण माळी‌ व कलावंत समिती अध्यक्ष विठ्ठल खापरकर महाराज सन्मानित     ✍🏻 अकोला :    सामाजिक जीवनामध्ये वर्तमानात निर्माण झालेल्या अडचणी,बेरोजगारी,आणि अनाचाराविरूध्द पत्रकारांनी निर्भयपणे बोललं पाहिजे,महिला अत्त्याचार,शेतकरी व सर्वसामान्यांच्या ज्वलंत वेदना लेखणीतून मांडल्या पाहिजेत.तरच उद्याचा उद्याचा सुखी,समाधानी विकसित भारत आपण पाहू शकू.असे वास्तवतावादी प्रतिपादन माजी उपमहापौर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ माजी अकोला जिल्हा प्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर  यांनी केले.        लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या ६०व्या मासिक विचारमंथन मेळाव्यात ते अध्यक्षिय मनोगतातून बोलत होते.अकोला महानगराचा विकास आणि पारदर्शक कारभार तथा महाविद्यालयीन जीवनापासून शिवसेनेची बांधणी करणारे, आणि १८ वर्षाच्या दिर्घकाळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद भुषविणारे अकोल्यातील प...

आजचे राशिभविष्य मंगळवार,दि.१ सप्टेंबर २०२६

                            सुविचार १०३.   चांगले विचार चांगले जीवन घडवतात. 🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 स र्व प्रकारच्या पूजा,वास्तू व ज्योतिष शास्त्रविषयक माहितीसाठी संपर्क पंडीत व्यंकटेश देशपांडे   (गुरुजी) संवाद :     7499121664                 9881601459. 🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹 आजचे राशिभविष्य    मंगळवार,दि.१ सप्टेंबर २०२६ (आजचे दैनिक पंचांग) विक्रम संवत 2083, शक संवत 1948 (पराभव संवत्सर), श्रावण. चतुर्थी नंतर पंचमी सकाळी 07:42 पर्यंत. भरणी नंतर पहाटे 02:42 पर्यंत नक्षत्र अश्विनी. रात्री 11:38 पर्यंत वृद्धी योग , त्यानंतर ध्रुव योग. करण बलव सकाळी 07:42 पर्यंत, कौलव नंतर संध्याकाळी 07:00 पर्यंत, तैतिल नंतर. राशी भविष्य  मेष राशी :-  आत्मविश्वास आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि  कार्यक्षमतेचे कौतुक केले जाईल. व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक परिस्थ...

जिल्हा उद्योग केंद्र यांच्या व्दारे हॉटेल आरजी इक्सक्यूलिव्ह येथे आयोजित जिल्हा गुंतवणूकदार शिखर परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज करण्यात आले होते.

    उद्योगांसाठी उपलब्ध पायाभूत सुविधांचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी वर्षा मीना              अकोल्यात गुंतवणुकीसाठी                      पोषक वातावरण         जिल्हा गुंतवणूकदार शिखर परिषदेत                                उद्योजकांना आवाहन            सुमारे ८० उद्योगांमधून ₹८०० कोटींच्या                         प्रस्तावित गुंतवणुकीवर भर            ✍🏻 अकोला, दि. ३१ (जिमाका)अकोला जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मुबलक औद्योगिक जमीन, कृषी व कृषी प्रक्रिया उद्योगांची मोठी क्षमता, कुशल मनुष्यबळ तसेच रेल्वे व रस्ते वाहतुकीची सक्षम जोडणी उपलब्ध आहे. या अनुकूल वातावरणाचा लाभ घेऊन उद्योजकांनी अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी आणि मूल्यवर्...

चला, सायबर सुरक्षित अकोला घडवूया! “माझा डेटा, माझी जबाबदारी — सायबर सुरक्षेसाठी प्रत्येकाची भागीदारी!” 🛡️💻 आयोजक : शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला संचालित शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला संगणकशास्त्र विभाग व IQAC सहकार्य : Quick Heal Foundation, Pune Cyber Shiksha for Cyber Suraksha

       अकोलेकरांसाठी ‘सायबर जलसा २०२६’चे आयोजन ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या संदेशातून सायबर सुरक्षेचा जागर           (Super news-24मराठी) ✍🏻 अकोला : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला संचालित शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील संगणकशास्त्र विभाग व IQAC यांच्या पुढाकाराने आणि Quick Heal Foundation, Pune यांच्या सहकार्याने ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ अंतर्गत ‘सायबर जलसा २०२६’ या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.         बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० वाजेपर्यंत पद्मानंद सभागृह, शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे हा कार्यक्रम होणार आहे.       या कार्यक्रमाची संकल्पना “My Data, My Responsibility – माझा डेटा, माझी जबाबदारी” अशी असून, नागरिकांना आपल्या वैयक्तिक व आर्थिक माहित...
राज राजेश्वर मंदिरात ‘माय वसुधा विकास’तर्फे प्लॅस्टिक निर्मूलन जनजागृती प्लॅस्टिक पिशव्या जमा करून मोफत कापडी पिशव्या वितरीत : डॉ. मनिषा पालीवाल       (Super News-24-मराठी) अकोला :  पवित्र श्रावण सोमवारनिमित्त जुने शहरातील सुप्रसिद्ध श्री राज राजेश्वर मंदिर परिसरात ‘माय वसुधा विकास’ संस्थेच्या वतीने ‘प्लॅस्टिक निर्मूलन व जनजागृती अभियान’ राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना ३४० कापडी पिशव्या आणि २२ बेलाच्या रोपांचे मोफत वितरण करण्यात आले.       ​सकाळी ८:३० ते १०:०० या वेळेत पार पडलेल्या या अभियानात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दर्शनासाठी येणाऱ्या ज्या भाविकांच्या हातात प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग होत्या, त्यांना थांबवून प्लॅस्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडील प्लॅस्टिक पिशव्या जमा करून त्यांना मोफत कापडी पिशव्या देण्यात आल्या,अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मनिषा पालीवाल यांनी दिली.             दिनेश बडगुजर व भर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यांच्या या अभ्यासपूर्ण भाषणाला प्रदेश कार्यकारिणीत टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला

् पुणे : आ.रणधीर सावरकरांनी मांडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या         अभिनंदनाचा ठराव          (Super News-24-मराठी) ✍🏻 पुणे, दि. ३१ : भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश संघटन मंत्री शिवप्रकाश जी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, राज्यातील सर्व मंत्रिमंडळ सहकारी, ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत दादा पाटील, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते.            या बैठकीत विधिमंडळ प्रतोद माजी प्रदेश सरचिटणीस आणि अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यांच्या या अभ्यासपूर्ण भाषणाला प्रदेश कार्यकारिणीत टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.         ...

कन्हैयालाल रंगवानी यांनी १,५७४ मतांच्या मोठ्या फरकाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या विजयासह सिंधी समाजाच्या प्रमुखाचा (अध्यक्ष) मुकुट त्यांच्या शिरावर सजला आहे

                  सिंधी समाज निवडणूक:  कन्हैयालाल रंगवानी १,५७४ मतांनी विजयी        ✍🏻 अकोला : शहरातील पूज्य सिंधी जनरल पंचायत निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल रंगवानी यांनी १,५७४ मतांच्या मोठ्या फरकाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या विजयासह सिंधी समाजाच्या प्रमुखाचा (अध्यक्ष) मुकुट त्यांच्या शिरावर सजला आहे. रंगवानी यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी, भाजप महानगर उपाध्यक्ष व माजी नगरसेवक विनोद मनवाणी यांचा एकांगी लढतीत पराभव केला.        विनोद मनवाणी यांना एकूण पडलेल्या २,१५० मतांपैकी केवळ ५५९ मते मिळाली, तर रंगवानी यांच्या खात्यात १,५७४ मते जमा झाली. तिसरे उमेदवार दौलत चंदवाणी यांना १० मते मिळाली आणि १० मते बाद ठरवण्यात आली. इतिहासात पहिल्यांदाच ८५% विक्रमी मतदान      पंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये ३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पात्र समाजबांधवांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला. या नवीन लोकशाही व्यवस्थेबद्दल...

मराठा सेवा संघाची स्थापना श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना केली. आज या गोष्टीला 35 वर्ष पूर्ण झालेले आहेत.

१सप्टेंबर मराठा सेवासंघाचा वर्धापनदिनानिमित्त मराठा सेवा संघाचे संस्थापक     : पुरुषोत्तम खेडेकर                          लेखक  प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे               माजी सरचिटणीस           मराठा सेवा संघ अमरावती कॅम्प               संवाद : 9890967003 ✍🏻 एक सप्टेंबर हा मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन.  हा वर्धापन दिन संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात संपन्न केला जातो. महाराष्ट्रातही संपूर्ण 36 जिल्ह्यात तसेच वेगवेगळ्या तालुक्यात हा वर्धापन दिन आयोजित करण्यात येतो. मराठा सेवा संघाची स्थापना श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना केली. आज या गोष्टीला 35 वर्ष पूर्ण झालेले आहेत.          प्रत्येक समाजाने आपापल्या समाजाला संघटित करावे व या संघटित समाजाने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचे सामाजिक परिवर्तनाचे काम करावे य...