चला, सायबर सुरक्षित अकोला घडवूया! “माझा डेटा, माझी जबाबदारी — सायबर सुरक्षेसाठी प्रत्येकाची भागीदारी!” 🛡️💻 आयोजक : शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला संचालित शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला संगणकशास्त्र विभाग व IQAC सहकार्य : Quick Heal Foundation, Pune Cyber Shiksha for Cyber Suraksha
अकोलेकरांसाठी ‘सायबर जलसा २०२६’चे आयोजन
‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या संदेशातून सायबर सुरक्षेचा जागर
(Super news-24मराठी)
✍🏻 अकोला : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला संचालित शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील संगणकशास्त्र विभाग व IQAC यांच्या पुढाकाराने आणि Quick Heal Foundation, Pune यांच्या सहकार्याने ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ अंतर्गत ‘सायबर जलसा २०२६’ या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० वाजेपर्यंत पद्मानंद सभागृह, शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना “My Data, My Responsibility – माझा डेटा, माझी जबाबदारी” अशी असून, नागरिकांना आपल्या वैयक्तिक व आर्थिक माहितीची सुरक्षितता, ऑनलाइन व्यवहारातील दक्षता, सायबर फसवणुकीपासून बचाव आणि सुरक्षित डिजिटल जीवनशैली याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या विषयावरील विशेष पोस्टर प्रदर्शन. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पोस्टर्सच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचे संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहेत. यासोबतच सायबर सुरक्षा जनजागृतीपर सादरीकरणे, विद्यार्थ्यांचे पथनाट्य व विविध जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया, ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर सुरक्षितता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे अकोला शहरातील नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि डिजिटल व्यवहार करणाऱ्या सर्वांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
चला, सायबर सुरक्षित अकोला घडवूया!
“माझा डेटा, माझी जबाबदारी — सायबर सुरक्षेसाठी प्रत्येकाची भागीदारी!” 🛡️💻
आयोजक :
शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला संचालित
शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला
संगणकशास्त्र विभाग व IQAC
सहकार्य :
Quick Heal Foundation, Pune
Cyber Shiksha for Cyber Suraksha

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा