यशस्वी कॅडेट्सचा एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे आणि एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
(SUPER NEWS- 24-मराठी)
✍🏻 अकोला :११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन, अकोला यांच्या वतीने २१ ते ३० ऑगस्ट दरम्यान सी.ए.टी.सी. ११४ या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विकास शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कॅम्पमध्ये ११ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत १२ शाळा व ७ महाविद्यालयांतील एकूण ३५० कॅडेट्सनी सहभाग घेतला होता.
या कॅम्पमध्ये कॅडेट्सच्या नेतृत्वगुणांना वाव देण्याबरोबरच ऑब्स्टॅकल, फायरिंग, ड्रिल, प्रश्नमंजुषा, वादविवाद, निबंध, चित्रकला तसेच विविध सांस्कृतिक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटमधील कॅडेट्सनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ८ पदके प्राप्त केली. यामध्ये सिनियर अंडर ऑफिसर आदित्य टाले याने कंपनी कमांडर व बेस्ट कॅडेट या दोन्ही विभागांत सुवर्णपदके मिळविली.
कॉर्पोरल निखिल मोरया याने मेस कमांडर स्पर्धेत रौप्यपदक, कॅडेट आयुष कुलकर्णी याने वादविवाद स्पर्धेत रौप्यपदक, तर कॅडेट प्रथमेश वसतकार याने चित्रकला स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. कॅडेट जय तायडे याने प्रश्नमंजुषेत सुवर्णपदक व ड्रिल कमांडरमध्ये रौप्यपदक मिळविले.
कॅडेट आदित्य मोते याने निबंध स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. या यशस्वी कॅडेट्सचा एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे आणि एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कॅडेट्सच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दि. बी.जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष अँड. मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजितजी परांजपे, सहसचिव अमितजी सुरेका व समस्त कार्यकारणी सदस्यांनी एन.सी.सी. कॅडेट्सचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा