मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यांच्या या अभ्यासपूर्ण भाषणाला प्रदेश कार्यकारिणीत टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला
पुणे : आ.रणधीर सावरकरांनी मांडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या
अभिनंदनाचा ठराव
(Super News-24-मराठी)
✍🏻 पुणे, दि. ३१ : भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश संघटन मंत्री शिवप्रकाश जी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, राज्यातील सर्व मंत्रिमंडळ सहकारी, ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत दादा पाटील, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विधिमंडळ प्रतोद माजी प्रदेश सरचिटणीस आणि अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यांच्या या अभ्यासपूर्ण भाषणाला प्रदेश कार्यकारिणीत टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.
आमदार रणधीर सावरकर आपल्या भाषणात म्हणाले -"मी स्वतः शेतकरी आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जुळलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या वेदना मला माहित आहेत. आमदार म्हणून माझी ओळख ही सातत्याने शेतकऱ्यांच्या विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य करणारा म्हणून आहे.
आज महाराष्ट्रातील विदारक चित्र आहे, ३५ टक्के शेतकरी शेती परवडत नसल्याने शेती सोडून इतर कामाकडे वळले आहेत, शेती करत नाहीत. ही परिस्थिती बदलली पाहिजे, शेतकऱ्याचे कल्याण झाले पाहिजे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे, या दृष्टीने मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ऐतिहासिक योजना सुरू केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या शेतकरी हिताच्या योजना :
१) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना - जागतिक बँकेचे सहाय्य : खारपाणपट्ट्यातील आणि महाराष्ट्राच्या १९ जिल्ह्यांच्या कल्याणासाठी जागतिक बँकेकडून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे ऐतिहासिक काम केले आहे.
२) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : आपले दिवंगत नेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने ही योजना सुरू करून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी भरीव अनुदान दिले.
३) मागेल त्याला शेततळे : प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी साठवण व्हावी यासाठी ही योजना.
४) मातृशक्ती शेतकरी योजना : महिला शेतकरी भगिनींसाठी विशेष योजना.
५) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत.
६) वन्यप्राण्यांमुळे जखमी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत : मानवतावादी निर्णय.
७) ऐतिहासिक कर्जमाफी - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना :* माझ्या मागणीवरून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतील वंचित शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करून ऐतिहासिक कर्जमाफी केली.
देवेंद्रजी हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हितचिंतक, शेतकऱ्यांचे मित्र, शेतकऱ्यांच्या भावना जपणारे नेते आहेत. ते ग्रामीण भागात जन्मलेले, गडचिरोली-चंद्रपूरचे भूमिपुत्र आहेत.
म्हणून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो."
---




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा