मुख्य सामग्रीवर वगळा

अमरावती शहरातील भव्य अशा सिकची रिसॉर्टमध्ये


मिशन आयएएसतर्फे ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर 
           (प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे )
       अमरावती : स्पर्धा परीक्षेच्या जगतात संपूर्ण भारतात विनामूल्य काम करणाऱ्या व दुसऱ्या वर्गापासून आयएएस या परीक्षेचे केवळ एक रुपया प्रतिदिन इतक्या अल्पशुल्कामध्ये प्रशिक्षण देणाऱ्या अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस आणि वलगावच्या श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे येत्या उन्हाळ्यात ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 
     हे सात दिवसांचे शिबिर मे महिन्यात अमरावती शहरातील सर्वात भव्य असलेल्या शिकची रिसॉर्ट मध्ये संपन्न होणार आहे. मिशन आयएएस ही भारतामधील प्रतिष्ठीत सेवाभावी संस्था असून गेल्या पंचवीस वर्षांमध्ये या संस्थेने स्पर्धा परीक्षा विषयक विविध उपक्रम आयोजित केले आहेत. 
       या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आय ए एस या संस्थेचे उद्घाटन महाराष्ट्राचे सध्याचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी केले 25 वर्षांपूर्वी केले असून या पंचवीस वर्षात या संस्थेला मार्गदर्शन करण्यासाठी 373 आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकारी आलेले आहेत. 
         याशिवाय संस्थेने संपूर्ण भारतात 
19 000 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन स्पर्धा परीक्षेच्या जगतात अतुलनीय काम केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्पर्धा परीक्षेचे शिबीर घेणारीर ही भारतातील एकमेव संस्था आहे. 
        या संस्कार शिबिरासाठी दहा ते वीस हा वयोगट ठरवण्यात आला असून या शिबिरात बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची अल्पदरामध्ये निवास व भोजन व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास ध्यान साधना स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख मुलाखत तंत्र सराव परीक्षा व विविध आयएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन  आयोजित करण्यात येते.                  याशिवाय एक दिवस शैक्षणिक सहल काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मनपा आयुक्त कार्यालय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येते.           या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत असून 2012 साली या शिबिरामध्ये 850 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावर्षी अमरावती जवळील वलगाव येथील श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टने हे शिबीर आयोजित करण्यात सहकार्य केले असून हे शिबीर अमरावती परतवाडा रोडवरील वलगाव बस स्टॅन्ड जवळील सिकची रिसॉर्ट मध्ये होणार आहे. 
         ज्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी मिशन आयएएस च्या सहसंचालिका प्रा. पल्लवी नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9823294326 या क्रमांकावर तर श्री प्रेम किशोर सिकची   चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर यांच्याशी 7875713975 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आय. ए. एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे. 
संपर्क : -.डॉ. नरेशचंद्र काठोळे 
संचालक,मिशन आयएएस 
अमरावती कॅम्प 
संवाद : 9890967003

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...