जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
आ.रणधीर सावरकर यांचे प्रतिपादन
•अकोला :
अकोला महानगरीच्या नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विकास हे सूत्र कायम लक्षात घेऊन जात-पात धर्म न पाहता शहराचा सर्वांगीण विकास सर्व स्पर्शी विकास हे एकमेव लक्ष घेऊन शहर सुधार आघाडी काम करेल, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
अनेक कार्यकर्ते कमी मताने पराभूत झालेत. त्यांनी हताश न होता सामाजिक उपक्रम राबवून पक्षाचा आणि स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा काम करावं तसेच पक्ष ही आपली आई आहे, पक्षाची भूमिका तसेच पक्षाने घेतलेला निर्णय याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. पक्ष हा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवत असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या उद्देशाने पक्षाच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती आमदार सावरकर यांनी केली. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांचा सन्मान केल्या जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
हा विजय अकोल्यातील जनतेला आणि देवेंद्र फडणवीस यांना समर्पित आहे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करून कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा आत्मा असून अकोलेकर ही आमची ताकद विश्वास आणि राज राजेश्वर नगरीचे प्रेम कायम ठेवून त्यांच्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द असून शहर सुधार आघाडीच्या माध्यमातून जनतेला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असेही आमदार सावरकर यांनी सांगितले.
शारदाताई खेडकर यांची महापौर पदी तर अमोल गोगे यांची उपमहापौर पदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी कार्यालयात कार्यक्रमात ते बोलत होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने राजकीय दुखवटा असल्यामुळे कोणतीही आतिषबाजी कोणती घोषणाबाजी तसेच हार तुरे न स्वीकारता आनंद व्यक्त करीत हा कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसने हे होते तर मंचावर खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, संतोष शिवरकर, किशोर पाटील वसंत बाछुका, शारदाताई खेडकर, अमोल गोगे, वैशालीताई शेळके, पूजाताई गावंडे, उषाताई विरक,, पवन महल्ले, कृष्णा शर्मा, माधव मानकर अंबादास उमाळे, आम्रपाली उपरवट, चंदाताई शर्मा, संजय गोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड, विराजमान होते.
जय आणि पराजय यापासून भाजपा कार्यकर्ता हतबल होत नसून आत्मचिंतन करून कार्यरत राहावं, समाजसेवा आणि समाजाच्या शेवटच्या घटकाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असतो तसेच हा विजय मित्रपक्ष यांच्या सहकार्याने प्राप्त केला आहे हा विजय शहराच्या विकासासाठी असल्याचेही खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी विजय देशमुख, संग्राम गावंडे, आमदार अमोल मिटकरी, सुनील भाऊ मेश्राम, रफिक सिद्दिकी, उषा विरक यांच्या सहकार्याने हा विजय शहर सुधार आघाडीला मिळाला आहे असे विजय अग्रवाल यांनी सांगून कार्यकर्त्यांच्या बळावर हा विश्वास विजय रथ अविरतपणे सुरू राहिला असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जयंत मसने, किशोर पाटील संतोष शिवरकर यांचे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनेते पवन महल्ले यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा