मुख्य सामग्रीवर वगळा

प्रा.डाॅ.नरेशचंद्र काठोळे सरांचा १ जुलैला 73 वा वाढदिवस. त्यासाठी त्यांना खूप खूप आभाळभर शुभेच्छा. आपले हे सेवाभावी व्रत असेच अखंडपणे सुरू राहो. आणि आपले उद्दिष्ट सफल होवो. हीच प्रार्थना...

 


 विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे                     अफलातून व्यक्तिमत्व 
मिशन आयएएसचे संचालक     प्रा.डाॅ. नरेशचंद्र काठोळे
    
              लेखिका
          ©®पल्लवी उमरे
                  कार्यकारिणी सभासद 
                   मिशनआयएसआय
                            मुंबई.

        विद्या विनयेन शोभते. असंच एक  विनयशील प्रतिभावंत , हरहुन्नरी व्यक्तिमत्व,गाढे अभ्यासक,व्याख्याते ,लेखक ,आणि मार्गदर्शक ,
दिवसरात्र मिशन आयएएसच्या कार्याला संपूर्णपणे वाहून घेतलेले उत्स्फूर्त सेवाभावी बुद्धिवादी व्यक्तिमत्व म्हणजे मिशन आयएएस अमरावतीचे संचालक श्री. नरेशचंद्र काठोळे सर...   मिशन आयएएस मुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत...
      दहावी बारावीनंतर काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत असतो. बहुतांश मुले डॉक्टर इंजिनिअर बनण्याची स्वप्न बघतात.  परंतु कलेक्टर बनण्याचं स्वप्न बघणारी फार कमी मुले असतात. अशा विद्यार्थ्यांना गुरू मार्गदर्शक बनून प्रेरणा देण्याचे काम मार्गदर्शन करण्याचे काम आमचे काठोळे सर अविरत करीत असतात. त्यांचा वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी सुध्दा उत्साह दांडगा आहे. नेहमी हसतमुख असणारे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने   झटणारे त्यांचे उपक्रमशील व्यक्तिमत्व 
तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे.
         उत्साहाचा खळखळता झरा आहेत. या वयातही त्यांचे अथक परिश्रम, सतत भ्रमंती, आरोग्य आणि आहाराच्या बाबतीत अतिशय जागरूक असणे आजकालच्या तरूणांना लाजविणारे आहे. 
" उम्र को गर हराना है तो शौक जिंदा रखिए.
 साहाब, मुर्दा दिल क्या खाक जिया करते है"
असंच त्यांच्याकडे बघून म्हणावसं वाटतं. 
गेली 26 वर्षे निस्वार्थपणे संपूर्ण भारतात, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून, समुपदेशन करून विद्यार्थी दशेपासूनच मुलांना आयएएस बनण्याचे स्वप्न ते दाखवित आहेत. वेगवेगळ्या
जिल्ह्यातील शाळांमध्ये जाऊन त्यांना स्वतः मार्गदर्शन करून प्रशासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे ज्ञानाचे धडे देत आहेत.विद्यार्थ्यांना स्पर्धा  परिक्षांचे मार्गदर्शन  करीत आहेत.सहजपणे हसतखेळत ते मुलांमध्ये वावरतात. 
        प्रशासकीय सेवेत मराठी टक्का वाढावा यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.  अनेक सनदी अधिकारी घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा आहे.
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, चांगल्या कामात अडथळेही खूप येतात. परंतु त्यावरही ते सहजपणे मात करतात. यासाठी व्यासंग लागतो, चिकाटी लागते ती त्यांच्याजवळ निश्चितच आहे. या सर्व कामात त्यांच्या सुविद्य पत्नी विद्याताई पण खूप मदत करीत असतात.  आतापर्यंत आदरणीय सुरेश भट, श्री. विश्वास नांगरे पाटील, मधुकर केचे, मिर्झा रफी बेग, साहित्यिक बबन सराडकर यांच्यासह बऱ्याच सनदी अधिकाऱ्यांनी व साहित्यिकांनी त्यांच्या मिशन आय ए एस ला भेटी दिल्या आहेत.
       विद्याताई हसतमुखाने सगळ्यांचे आदरातिथ्य करतात.  गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारे साहित्य व जागा त्यांनी 26 वर्षांपूर्वी आपल्या घरातच उपलब्ध करून देऊन आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला आहे.  ७३ स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे प्रकाशन करून संपूर्ण भारतात 
१८००० कार्यक्रम घेतले  आहेत.
      नुकतेच यावर्षी  16 ते 22 मे रोजी भव्य अशा सिकची रिसार्ट अमरावती येथे सुमारे 129
विद्यार्थ्यांचे आठ दिवसीय शिबीर घेण्यात आले.  यात विद्यार्थ्यां सोबतच पालकांचा उत्साह दांडगा होता. या शिबिराच्या समारोपाला महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे आयएएस, कलेक्टर श्री आशिष येरेकर व इतर अनेक अधिकाऱ्यांनी भेटी घेऊन विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला.
        काही माणसे विशिष्ट ध्येयाने पछाडलेली असतात. काठोळे सरांनी मिशन आयएएससाठी 
आपले जीवन वाहून घेतले आहे.लेखन वाचनाचा छंद असलेले,आणि आतापर्यंत मराठी, हिंदी इंग्रजी इत्यादी  भाषामधून त्यांची ७३ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. परंतु जरा म्हणून गर्व नाही. असं हे हसतमुख व्यक्तिमत्व. विद्यार्थ्यांना लहान पणापासूनच स्पर्धा परीक्षांचे, प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचे आवाहन करीत दिल्ली, बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश महाराष्ट्रात शिबीरं आयोजित करून स्वतः मार्गदर्शन करीत असतात.
       कधी प्रशासकीय अधिकारी कलेक्टर यांना सुद्धा पाचारण केले जाते. आतापर्यंत त्यांच्याकडे 373 सनदी व राष्ट्रपती अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या अभ्यासिकांमधून  मार्गदर्शनपर लेक्चरं दिली जातातच.  त्या बरोबरच कमी खर्चात लायब्ररी,लॅपटाप , टेबल व लागणारे इतर सर्व साहित्य उपलब्ध करून दिले जाते. 
       मिशन आयएसआय 19 राज्यात यासाठी काम करीत आहे. शेवटी शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते. मुंबई, ठाणे पुणे, नागपूर, कोल्हापूर. अमरावती 
येथे मिशन आयएएसच्या अभ्यासाचे केंद्र आहेत. त्यासाठी  विद्यार्थ्यांना फक्त एक रुपया प्रतिदिन इतक्या अत्यल्प दरात अभ्यासिका व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. 
"लहरोसे डरकर नौका पार नही होती
कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती"
बुंद बुंदसे बनता है सागर या उक्तीने ज्ञानार्जन करीत गेल्यास निश्चितपणे प्रशासकीय सेवेत हा टक्का वाढणार आहे. बस त्यासाठी अभ्यासाची जिद्द आणि चिकाटी हवी. आयएएस होण्याची स्वप्न मुलांनी बघायला हवीत. स्वप्नं जी तुम्हाला झोपूच देत नाही, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा.
         मग फिनिक्सभरारी घ्यायला वेळ लागणार नाही. असा उपदेश नेहमी आपल्या मार्गदर्शनातून देत असतात.  त्यांच्या मार्गदर्शनातून आजवर हजारो विद्यार्थी घडले आहेत. संपूर्ण भारतात १८००० च्या वर कार्यक्रम काठोळे सरांनी घेतले आहेत. दरवर्षी नव्याने रुजू झालेल्या सनदी अधिकाऱ्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.
        हे सगळं करीत असताना कुठल्याही मानधनाची ते अपेक्षा करीत नाही. उलट निशुल्क सेवा देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीने अनेक उच्चपदस्थ अधिकारी व्यक्ती त्यांच्या कार्याशी जुळल्या गेल्या आहेत. वैयक्तिक व सामाजिक जीवनात अतिशय काटेकोरपणे जगणारे काठोळे सर म्हणजे समाजकार्याला वाहिलेले सेवाभावी व्यक्तिमत्व.
        त्यांचा १ जुलैला 73 वा वाढदिवस, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा, आपले हे सेवाभावी व्रत असेच अखंडपणे सुरू राहो, आणि आपले उद्दिष्ट सफल होवो. हीच  प्रार्थना. 
"लगेगा जरा वक्त जिंदगी तेरे इम्प्तिहानमे
 अभी तो सफर शुरू हुआ है"
०००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
(PRO)
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी) 

 डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
    संवाद : 9371854706      
हत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .
Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706
  _____________________________________


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...