गोरक्षण स्थळावर वैकुंठ रथ असावा : प्रा गजानन भारसाकळे
गणेश साखरे यांनी केले विधिवत पूजन
दर्यापूर : महाराष्ट्र राज्यात गायीला मातेचा दर्जा प्राप्त असून संगोपण कर्तव्यासह तिचा अंत्य संस्कार सुद्धा तितक्याच सन्मानाने साध्य व्हावा या उदात्त हेतुने दर्यापूर तालुक्यातील माहुली ( धांडे ) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्था स्थळावर गाय वासरांच्या अंतीम संस्कारासाठी एका वैशिष्टपूर्ण वैकुंठ रथाची निर्मिती करण्यात आली आहे . गोरक्षण संस्थेचे संचालक प्रा. गजानन भारसाकळे यांनी आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाच्या संकल्पनेतून या मनुष्य चालीत रथाला पूर्णाकृती रूप दिलेले असून या रथावर दोन व्यक्ती साह्याने गाय - वासरांना मोक्ष स्थळावर वर्षभर कोणत्याही ऋतुमध्ये नेण्याची क्षमता आहे . या रथाचे विधिवत पूजन माहुली ( धांडे ) येथील श्री नारायण गुरु क्रीडा मंडळाचे संस्थापक - संचालक गणेश भानुदासराव साखरे यांचे शुभहस्ते करण्यात आले असून या क्रीडा मंडळाच्या समस्त लहान थोर सदस्यांच्या भरीव उपस्थितीत हा कार्यार्पण सोहळा संस्था स्थळावर पार पडला . शेतातील ज्या जागेवर गाईला माती दिली जाते त्या ठिकाणी कधीच शेतातील पिकांना उधळी लागत नाही ही कृषी शास्त्राची माहिती प्रा. भारसाकळे यांनी या प्रसंगी विस्तृत करून मरणानंतर सुद्धा हा गोमातेचा आशीर्वाद शेतकरी जीवनास प्राप्त होतो याचा आवर्जून उल्लेख करीत राज्यातील सर्वच गोरक्षण संस्था स्थळावर या व्यक्ती चालीत वैकुंठ रथाची सुविधा उपलब्ध असावी असे भावनिक आवाहनही केले .यावेळी गोरक्षण संस्थेचे कार्यकारिणी सहसचिव उमेश इंगळे, व्यवस्थापक बाळासाहेब भारसाकळे , वैकुंठ रथाला घडविणारे कारागीर दत्ताभाऊ वैराळे तसेच गोरक्षणचे दैनंदीन गोसेवक श्रीकृष्ण पोटे, संतोष गवई व अंकुश घरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती .



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा