आपला प्रांत सोडून इकडे मोलमजुरी करणाय्रा आदिवासी व अत्यंत गरीब कुटुंबासोबत "कस्तूरी"ने साजरी केली दिवाळी व भाऊबीज
मेळघाट परिक्षेत्रातील ' रुईपाठा' या आदिवासी गावामध्ये कस्तुरी या सेवाभावी संस्थेने यंदाचा , दिवाळी' हा सण नुकताच साजरा केला...या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण आज सकाळी पुनश्च घुसरवरून दीड किमी. अंतरावर आपातापा रोडवर शेतमजुरी करण्यासाठी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील अंबाळा गावातील आदिवासी व अत्यंत गरीब कुटुंबातील पाड्यावर भेट देऊन त्यांच्यासोबत संवाद साधला आणि त्या कुटुंबातील मजुरांची दिवाळी व भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा केला . हे लोक स्वतःच्या पोटापाण्यासाठी आपला प्रांत सोडून इकडे मोलमजुरी करण्यासाठी आले आहेत.. ते दिवाळी व भाऊबीज साठी आपल्या गावी जाऊ शकले नाहीत. ही बाब निदर्शनास येताच कस्तुरी टीम ने भेट देऊन त्या समूहातील ५० महिलांना नवीन साड्या व दिवाळीचे फराळ आणि मिठाई पॅकेट्स चे आज वितरण केले.. याप्रसंगी सर्व माता भगिनी व लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते...उपक्रमात सर्वश्री प्रा.किशोर बुटोले , डॉ.शांताराम बुटे , डॉ.सत्यनारायण बाहेती , एकनाथराव उके , संजय गायकवाड , संजय ठाकरे , अंबादास तल्हार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग दिला.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा