मुख्य सामग्रीवर वगळा

अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या हक्काची खुलेआम पायमल्ली



• पेट्रोल पंपावर मोफत हवा मिळत नाही, नियम वाऱ्यावर!
• हवा पंप 'शोभेचे साधन', नियमांकडे दुर्लक्ष

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक पेट्रोल
पंपांवर ग्राहकांच्या हक्काची खुलेआम पायमल्ली होत आहे. मोफत हवा पंपाची सुविधा ही प्रत्येक वाहनधारकाचा हक्क असूनही, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी ही सेवा बंद किंवा दाखवण्यासाठी ठेवलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मोफत हवा, तसेच सुविधा संदर्भात पेट्रोल पंप चालकांना निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कारवाईचे निर्देश 'थंड'

मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी सुविधा नसलेल्या पंपांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर काही पंपांनी सेवा सुरू केली होती. मात्र, आता पुन्हा अनेक ठिकाणी या सुविधा गायब झाल्या आहेत. एवढेच नव्हे, तर काही पंपांवर नियमित पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याचेही प्रकार घडत आहेत, त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ग्राहकांनी करावी तक्रार

'पेट्रोल पंपावर मोफत हवा, पिण्याचे पाणी किंवा शौचालयाची सुविधा नसेल, तर कंपनीकडे किंवा जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल करता येते. तक्रार योग्य आढळल्यास संबंधित पंपावर कारवाई करण्यात येते.

हवा पंप 'शोभेचे साधन', नियमांकडे दुर्लक्ष

मोफत हवा, असे मोठे फलक पंपावर लावले असले तरी प्रत्यक्षात सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे. कायद्यानुसार प्रत्येक पेट्रोल पंपावर मोफत हवा, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय आणि प्रथमोपचार पेटी या सुविधा अनिवार्य आहेत. परंतु वास्तवात अनेक ठिकाणी हवा पंप बंद असतात किंवा 'तांत्रिक बिघाड'चा बहाणा केला जातो. अनेकवेळा पंपावर हवा भरण्यासाठी गेल्यानंतर मशीन बंद आहे, किंवा काही वेळाने या, अशी कारणे सांगितली जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

"जिल्ह्यात काही पेट्रोल पंपावर नागरिकांना सुविधा दिली जात नाही. मोफत हवा असा केवळ नावाला फलक लावला जातो. पेट्रोल पंपावर नागरिकांना सुविधा देणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले आहे. ग्राहकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे".
           • नंदिनी चुनारकर
               जिल्हाध्यक्ष, 
   अखिल भारतीय ग्राहक पंचायत, चंद्रपूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...