मुख्य सामग्रीवर वगळा

ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक डॉ. मोहन खडसे यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.


  प्रा.डॉ. मोहन खडसे यांना राज्यस्तरीय वाङ्गय पुरस्कार जाहीर
मराठी भाषा संवर्धन संस्थेची घोषणा

अकोला :  वाचकप्रिय दैनिक देशोन्नतीतून दर रविवारी कवडसा' स्तंभलेखन करणाऱ्या प्रा. डॉ. मोहन खडसे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  मराठी साहित्यातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जाणारे मराठी भाषा संवर्धन संस्थेचे राज्यस्तरीय वाङ्गय पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आलेत.
       मराठी भाषा संवर्धन संस्थेच्या वतीने एकूण आठ साहित्य प्रकारांमध्ये घोषित पुरस्कारांमध्ये आत्मचरित्र विभाग-दौशाड-डॉ. नंदकुमार राऊत, नाशिक, ब्युटी ऑफ लाईफ. द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हयवर-आशा नेगी, पुणे, बालसाहित्य विभाग-१६९५ स्मार्ट रोबो ए आय आणि औरंगजेब-सुरेश वांदिले, मुंबई, आगळ्या वेगळ्या कथा- बबन शिंदे, कळमनुरी, कथासंग्रह विभाग- पोलीस मन-अजित देशमुख, मुबंई बयनामा- बा.बा.कोटंबे, परभणी ललित विभाग- गुपित आनंदाचं-डॉ. मोहन खडसे, अकोला (मधुश्री प्रकाशन, पुणे) जीवनसाथीचा * वियोग आणि विवेकनिष्ठ विचारसरणी-अलका काकडे, पुणे समीक्षा विभाग नामदेव ढसाळ यांची कविता आस्वाद आणि चिकित्सा- डॉ. विनोद राऊत, नागपूर साहित्यसमीक्षा आणि समाजचिंतन-संपादक डॉ. रुपेश कऱ्हाडे, दिग्रस कादंबरी विभाग घाणी भाग दोन-कविता पाचंग्रे, शिरूर, वचपा-मोतीराम राठोड, नांदेड, कविता विभाग- सिझर न झालेल्या कविता- डॉ. सुनील पवार, मेहकर, दंगल होतेच कशी ?- गौतम ढोके-बडनेरा, अनुवादीत साहित्य- डॉ. संजय बोरुडे, अहिल्यानगर, पुरस्कार प्राप्त सर्व लेखकांचे मराठी भाषा संवर्धन संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सुरेश पेंढरवाड, कार्याध्यक्ष नागोराव कोम्पलवार, सचिव गणेश बुटे यांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळा येत्या जून महिन्यात होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश पेंढरवाड, कार्याध्यक्ष नागोराव कोम्पलवार, सचिव गणेश बुटे यांनी कळविले आहे.

१७९ लेखकांच्या प्रवेशिकांमधून 
झाली निवड

जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या प्रवेशिका मराठी भाषा संवर्धन संस्था ढाणकीच्या वतीने मागविण्यात आल्या होत्या. याला संपूर्ण राज्यभरातून व गुजरात, गोवा, ओरिसा, पश्चिम बंगाल येथील लेखकांनी प्रतिसाद देत संस्थेकडे आठ साहित्य प्रकारातील एकूण १७९ लेखकांनी आपल्या प्रवेशिका संस्थेकडे राज्यस्तरीय पुरस्काराला पाठविल्या होत्या. त्यातून संस्थेच्या त्रिस्तरीय निवड समितीने ८ साहित्य प्रकारातील निवडक सोळा पुस्तकांची राज्यस्तरीय वाङ्गय पुरस्कारासाठी निवड केली. या पुरस्काराबध्दल डॉ. मोहन खडसे यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
                 ०००००
              SUPPER NEWS-24

विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार,अकोला.
       महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती.. मिळविण्यासाठी
Follow this link to join my WhatsApp group: or contact 9371854706






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...