मुख्य सामग्रीवर वगळा

1 मार्च 2026 .जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त पहिला लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस, आयपीएस, आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील लेख आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा पहिला लेख.

जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त

मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव 
  मेट्रो वुमन अश्विनी भिडे  

1 मार्च 2026. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त पहिला लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस, आयपीएस, आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील लेख आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा पहिला लेख.

                     लेखक
          प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
           मिशन आयएएस,अमरावती
           संवाद : 9890967003

        हाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात जे अधिकारी कार्यरत आहेत त्यामध्ये डॉ. श्रीकर परदेशी व प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे यांचा समावेश आहे. 14 डिसेंबर 2024 रोजी त्या मुख्यमंत्री कार्यालयात रुजू झाल्या. श्रीमती अश्विनी भिडे मॅडम यांना संपूर्ण देश मेट्रो वुमन म्हणून ओळखतो. 
 शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी असताना त्यांनी मुंबई मेट्रो मध्ये जे अतुलनीय काम केलेले आहे त्यामुळे प्रसार माध्यमांनी त्यांना मेट्रो वुमन ही सार्थक पदवी दिलेली आहे .
           1985 या वर्षाला दहावी 1987 वर्षाला बारावी 1990 यासाली बीए आणि 1992 या वर्षाला एम ए इंग्रजी ह्या परीक्षा त्यांनी गुणवत्तेत पास केल्या आहेत. कला शाखेतील पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असलेल्या या प्रशासकीय महिलेने एम एम आर डी ए व मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशन मध्ये जे उल्लेखनीय कार्य केलेले आहे ते शब्दातीत आहे.
           मुळच्या सांगली येथे राहणाऱ्या सांगलीच्या  विलिगं कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केलेल्या पुढे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेल्या नागपूरला अतिरिक्त आयुक्त तसेच मुंबईला राज्यपालाच्या कार्यालयात राजभवन मध्ये सहसचिव म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे पुढे एम एम आर डी ए ला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून गेल्या आणि त्यानंतर मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. कला शाखेत पदवी व पदवी नंतरचे शिक्षण झालेल्या व कोणतीही अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेल्या अश्विनी भिडे यांनी एम एम आर डी ए व मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये जे अतुलनीय काम केले त्यामुळे मेट्रो वुमन या पदवीस पात्र झाल्या. सध्या त्या मुंबईला मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत 
        अश्विनी भिडे यांचे वडील सांगली येथील स्टेट बँकेमध्ये नोकरीला होते. त्यांच्या वेळोवेळी बदल्या होत गेल्या .काही बदल्या तर तालुक्याच्या ठिकाणी झाल्या .त्यामुळे अश्विनी भिडे यांचे शिक्षण  जिल्ह्याबरोबर तालुक्याच्या गावी,ही झाले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांना भाषण वादविवाद नाटक चित्रकला त्याची खूपच आवड होती.कुणाची जयंती असो पुण्यतिथी असो त्यांनी आपल्या भाषण कलेचे त्या त्या वेळेस प्रदर्शन केले. वडिलांचा चित्रकलेचा वारसा त्यांनी आत्मसात केला. घरचे वातावरण शैक्षणिक होते. घरच्या सर्व मंडळींनी अश्विनी भिडे यांना तिच्या भाषण वादविवाद नाटक चित्रकला या गोष्टींना सतत प्रोत्साहन दिले. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन जीवनातच त्यांचा उत्साह वाढला 
      एवढ्या सगळ्या उपक्रमात भाग घेऊनही अश्विनी दहावीच्या परीक्षेमध्ये मेरिट आल्या .तसेच बारावीच्या परीक्षेतही सातव्या क्रमांकाचे मेरीट प्राप्त करून त्यांनी भाषण वादविवाद नाटक चित्रकला यात भाग घेतल्यामुळे गुणवत्तेत कुठलाही फरक पडला नाही. . 
         सुप्रसिद्ध  आयएफएस   अधिकारी तेव्हाचे परराष्ट्र सचिव व कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी तसेच चांगुलपणाची चळवळ व पुढचं पाऊल या मराठी आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांची संघटना असलेल्या परराष्ट्र सचिव असलेल्या डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे मार्गदर्शन मिळाले. पुढे इंग्रजीमध्ये एम ए करण्यासाठी त्यांनी सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यासाला सुरुवात केली. एम ए इंग्रजी पदवीतही अश्विनी भिडे यांनी आपली यशोगाथा कायम ठेवली .या परीक्षेमध्ये  गुणवत्तेत दुसरी आली आणि लगेच सांगलीच्या महाविद्यालयात  प्राध्यापक पदाची मागणी पण आली. इकडे पदवी आणि तिकडे नोकरी हा सुवर्णयोग  चालून आला .
          अभ्यासातील सातत्य सकारात्मक दृष्टिकोन चिकाटी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे मार्गदर्शन तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील अभ्यास यामुळे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उपजिल्हाधिकारी परीक्षा उत्तीर्ण केली.  रुजू होणार तेवढ्यात आयएएस पूर्व परीक्षेचा निकाल लागला आणि त्यातही  पास . आता नजरेसमोर दोन गोष्टी होत्या .एकतर उपजिल्हाधिकारी नाहीतर जिल्हाधिकारी. अर्थातच  यातला जिल्हाधिकारी हा प्राधान्यक्रम निवडला आणि मुंबईच्या सुप्रसिद्ध अशा महाराष्ट्र राज्य प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्रामध्ये मुख्य परीक्षेसाठी तयारी सुरू केली. 
        मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसच्या समोर व मुंबई महानगरपालिकेच्या समोर असलेले हे केंद्र इथल्या गुणवत्तेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मुंबईला सर्वात मोठा प्रश्न येतो तो राहण्याचा.  महाराष्ट्र शासनाच्या सावित्रीबाई फुले वस्तीगृहात प्रवेश मिळाला. काळजीपूर्वक आयएएस परीक्षेची तयारी केली आणि संपूर्ण भारतातून नववा क्रमांक प्राप्त करून महाराष्ट्रातला नावलौकिक प्राप्त करून दिला. सर्वात महत्त्वाचं मुलीमधून पहिला येण्याचा मान देखील त्यांना प्राप्त झाला. कला शाखेत राहिलेल्या इंग्रजीमध्ये एम ए परीक्षा पास झालेल्या वादविवाद चित्रकला अभिनय भाषण या क्षेत्रामध्ये महाविद्यालयीन जीवनात  वावरणाऱ्या अश्विनी मॅडमनी जे यश संपादन केलेले आहे ते खरेच खरंच आदर्शवत आहे .आता सध्या त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त  त्यांना  हार्दिक शुभेच्छा .
•प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे 
संचालक, मिशन आयएएस 
अमरावती कॅम्प 
संवाद : 9890967003
            ‌.        ०००००
              SUPPER NEWS-24

विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार,अकोला.
       महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती.. मिळविण्यासाठी
Follow this link to join my WhatsApp group: or contact 9371854706



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...