मुख्य सामग्रीवर वगळा

श्री गणेश उत्सव विशेष

     
    पेशवेकालीन  परंपरा लाभलेला
   श्री बाराभाई गणपती
             

             लेखक
                   विजय द. केंदरकर
              संवाद : 9371854706

 कोल्यातील मानाचा गणपती म्हणून जुने शहरातील श्री बाराभाई गणपती महराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आजही या गणपतीला भक्तगण मोठयाभक्ती भावाने दर्शनाला येऊन मनोकामना पूर्ण करतात. विसर्जनाच्या वेळी सर्वात आधी मानाचा गणपती म्हणून पुजल्या जातो. श्री बाराभाई गणपतीची विधिवत पूजा अर्चा आरती करून अकोल्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. ही परंपरा अजूनही कायम आहे.


श्री बाराभाई गणपती अकोला शहरातील गणेश उत्सवाचे आगळेवेगळे आकर्षण आहे.अकोल्यातच नव्हे तर पूर्ण विदर्भात हा गणपती प्रसिद्ध आहे. हा गणपती प्रथम मानाचा समजल्या जातो. शेकडो वर्षापासून ही प्रथा अखंड सुरु असून सुरूच राहणार आहे. आता बाराभाई गणपती म्हणजे काय? तो कोठे व केव्हा स्थापन झाला? याविषयी जनमानसात अनेक दंत कथा ऐकावयास मिळतात. बाराभाई गणपतीची स्थापना नेमकी केव्हापासून सुरू झाली याबाबत अजूनपर्यंत कोणतीही नोंद सापडलेली नाही. बाराभाई गणपतीचे आजचे मुख्य प्रवर्तक व परंपरागत चालक धर्मनाथ एकनाथ इंगळे यांच्या मते हा गणपती पेशवेकालीन असावा. पेशवेकालीन बारभाईच्या कारस्थानाशी यांचा निकट संबंध असावा. म्हणूनच याला बाराभाई हे नाव प्राप्त झाले आहे. अशी परंपरागत माहिती आहे. दरवर्षों बाराभाई गणपती स्थापना, पूजा अर्चा आणि विसर्जन इंगळे कुटुंबियांकडून होते. विशेष म्हणजे बाराभाई गणपती उत्सवासाठी कुणाकडूनही वर्गणी गोळा केल्या जात नाही, असे आजचे अध्यक्ष धर्मनाथ इंगळे हे सांगतात.
बाराभाई गणपतीचे सर्वेसर्वा इंगळे कुटुंब कसे झाले, या करिता भूतकाळात जावे लागेल. सार्वजनिक असणारा बाराभाई गणपती इंगळे, इंगळे कुटुंबाकडे कसा आला याचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. २१ व्या शतकाच्या पूर्वार्धात आयुष्याचे अर्धशतक ओलांडलेल आजचे अध्यक्ष धर्मनाथ इंगळे यांची परंपरा ऐकीव माहिती सांगते की, श्री बाराभाईचा गणपती रूढी परंपररेने स्थापन केला जात असे. मात्र कालांतराने त्यातला उत्साह कमी होत गेला. त्यातल्या त्यात सामाजिक व राजकीय निरुत्साहाचा तो काळ  लोकांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचे ठरले. मंडळी जवळपास संपुष्टात आली, पण परंपरागत बाराभाई गणपती चे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस संस्थापक अध्यक्ष कै. भगवानराव इंगळे, सार्वजनिक नाही तर नाही पण बाराभाईचा गणेश उत्सव आपल्या स्वतःच्या घरी साजरा करण्याचे ठरविले. त्या वर्षापासून बाराभाई गणपती उत्सव इंगळे यांच्या घरी साजरा केला जातो.  लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी जुने शहरातील असदगड किल्ला भोवतीच्या छोट्याशा अकोला शहरातही पाच-सात मंडळे स्थापन झाली. मोठ्या थाटात मिरवणूक काढली जायची. विसर्जन मिरवणुकीत सर्वात प्राचीन व जुना गणपती म्हणून प्रथम स्थान श्री बाराभाई गणपतीला मिळे. त्याला दुसरे एक कारण होते ते म्हणजे त्यावेळी मिरवणूक काढणे म्हणजे एक दिव्य होते. 
ब्रिटिशांच्या अमलात म्हणजे दुरापास्त कार्य होते. मात्र यांनी या दिव्यातून जाण्याची तयारी केली. परधर्मीयांच्या सहकार्याने अतिशय शांत, संयमी व दूरगामी वृत्तीने त्यांनी ती विसर्जन मिरवणूक यशस्वी करून दाखविली होती. तेव्हापासून विसर्जन मिरवणुकीत पहिल्या क्रमांकाच्या स्थानावर श्री बाराभाई गणपती व दुसऱ्या स्थानावर श्री राजराजेश्वराचा गणपती अलिखित आहे.
१८९० पासून सुरू झालेली ही प्रथा आजही अखंडपणे उत्साहात सुरू आहे. श्री बाराभाई गणपतीची मूर्ती गेल्या शंभराहून अधिक वर्षांपासून एकच आहे. त्या आधी कैक वर्षे पूर्ण आकार व पूर्ण स्वरूपाची नवी मूर्ती जुन्या पिढीतील मुर्तिकार ओंकारराव मोरे ठाकूर हे ती मूर्ती तयार करीत. त्यांच्या मृत्यूनंतर बाराभाई ची मूर्ती तयार झालीच नाही.
नवीन मूर्ती तयार करण्यासाठी परंपरागत चालक  एकनाथ व रघुनाथ यांनी अनेकदा प्रयत्न केले पण यश आले नाही. त्यामुळे ही मानाची मूर्ती विसर्जित होत नाही. परंतु पूजेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. या गणपती चे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीचे पालखी वाहणारे भोईराज सुद्धा पिढ्यानपिढ्या आपली सेवा गणपती चरणी अर्पण करीत आहे आणि कुठल्याही प्रकारचे मानधन न घेता त्यांचे मानधन म्हणजे गणपतीच्या गळ्यातील हार आणि प्रसाद म्हणून एक नारळ. तसेच उमरी येथील मानाची दिंडी व विझोरा येथील दिंडी ते ही पिढ्यानपिढ्या ते सुद्धा कुठल्याच प्रकारचे मानधन घेत नाही ते सुद्धा गणपतीच्या गळ्यातील हार आणि प्रसाद म्हणून नारळ मानधन म्हणून स्वीकारतात. श्री बाराभाई गणपतीविषयी अकोलेकरांना अतिशय श्रद्धा आहे. अनेक जण या गणपतीला साकडे घालतात. नवस करतात, इच्छापूर्ती करतात. श्रद्धेने आणि विश्वासाने पूजेला जाणारा श्री बाराभाई गणपतीच्या चरणी साष्टांग दंडवत.
       श्री बारभाई गणेशोत्सव मंडळातर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की शाळू मातीच्या पासून तयार केलेली मूर्ती सर्व गणेश भक्तांनी आपापल्या घरी स्थापन करावी.जास्त मोठया आकाराची मूर्ती ही घेऊ नये मूर्तीचा आकार हा मर्यादित असावा.तसेच प्रत्येक मंडळांनी वृक्षा रोपण करणे, रोगनिदान शिबिर घेणे ,रक्तदान शिबिर घेणे,  या प्रकारचे समाज उपयोगी व हिताचे शिबिरे घेऊन सामाजिक संदेश देण्याचा श्री गणेश भक्तांनी करावा, असे आग्रही आवाहन श्री बारभाई गणेशोत्सवाचे श्री राहूल कैलाश इंगळे यांनी केले आहे.
            • विजय द. केंदरकर
              संवाद : 9371854706






टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...