मुख्य सामग्रीवर वगळा


आयुष्मान भारत अंमलबजावणीत अकोला जिल्हा सातवा

`मोबाईलने इ केवायसी करा,
पाच लाखांचे कवच मिळवा`

अकोला : 
आयुष्मान भारत, जनआरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा अधिकाधिक गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी गावे, वस्त्या, शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन केवायसी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात खासगी व शासकीय मिळून ४० रुग्णालयांत योजनेत सुविधा उपलब्ध असून, योजनेच्या अंमलबजावणीत अकोला जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. 
      या योजनेतून लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार व १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया सुविधा मिळणार आहेत. ई-केवायसी करून घेण्यासाठी आरोग्य प्रशासनाने पुढाकार घेतला असून, ७ लक्ष ६० हजार ३५० कार्ड तयार झाले आहेत. लाभार्थ्यांची एकूण संख्या १७ लक्ष ३३ हजार १६ असून, उर्वरित ई- केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. 
   योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे शिधापत्रिकाधारक पात्र आहेत. मात्र यासाठी आयुष्मान कार्ड तयार करून घेणे बंधनकारक आहे. 
        लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवर देखील आयुष्मान अॅप डाऊनलोड करून इ केवायसी करू शकतात. आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या कार्डधारकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा आहे.  त्याकरिता आयुष्यमान कार्ड काढणे गरजेचे आहे. ज्याच्याकडे अजूनही कार्ड नाही त्यांनी व ज्यांची ही केवायसी बाकी आहे त्यांनी त्वरित करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, योजनेच्या जिल्हा समन्वयक आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...