मुख्य सामग्रीवर वगळा

श्री गणेशोत्सव विशेष


      श्री गणेश विसर्जन                मिरवणूकीनिमित्त 
      वाहतूक मार्गात बदल

अकोला : (जिमाका)
श्री गणेश विसर्जन मिरवणूकीनिमित्त अकोला शहर व अकोला – अकोट राज्य वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी जारी केला.
       हा बदल खालील कालावधीत लागू राहील. अकोला शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि.7 सप्टेंबर 2025 चे सकाळी 6 वाजेपर्यंत. अकोला-अकोट या राज्य मार्गावरील वाहतूक दि.06 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि.7 सप्टेंबर 2025 चे सकाळी 12 वाजेपर्यंत तसेच अकोला-पारस फाटा ते बाळापूर मार्गावरील वाहतूक दि.6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि.7 सप्टेबर चे सकाळी 12 वाजेपर्यंत.
       
          अकोला शहर श्री विसर्जन 
            मार्गावरील वाहतूक : 

डाबकी रोडकडून बसस्थानकाकडे जाणारी व मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग : भांडपूरा चौक, पोळा चौक, हरिहर पेठ, वाशीम बायपास, लक्झरी स्टँड, अशोक वाटिका मार्गे बसस्थानक अशी वळविण्यात येईल.
         अकोला बसस्थानकाकडून हरिहरपेठेकडे जाणारी वाहतूक : निमवाडी पोलीस वसाहती समोरून वाशिम बायपास हरिहर पेठ अशी वळविण्यात येईल. रेल्वे उड्डाण पुलाकडून कोतवाली, लक्झरी बसस्टँडकडे जाणारी वाहतूक अग्रसेन चौक, जेल चौक मार्गे जाईल. लक्झरी बसस्थानकाकडून अकोट स्टँडकडे जाणारी वाहतूक अग्रसेन चौक मार्गे जाईल. सुभाष चौकाकडून गांधी चौकाकडे जाणारी वाहतूक दामले चौक, टॉवर चौक मार्गे जाईल.

         अकोला – अकोट राज्य
         मार्गावरील वाहतूक

            अकोला ते अकोटकडे जाणारी वाहतूक व येणारी वाहतूक पर्यायी मार्गे : अकोला बसस्थानक, लक्झरी बसस्थानक, वाशिम बायपास, शेगांव टी पॉईंट, गायगाव, देवरी अकोट अशी जाईल. अकोला बसस्थानक ते म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्गे : रेल्वे स्थानक चौक, सातव चौक, खरप टी पॉईंट, म्हैसांग या मार्गे  जाईल व येईल.

      अकोला पारस फाटा – बाळापूर –                खामगांव मार्गावरील वाहतूक

        अकोला ते बाळापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्गे : अकोला- पारस फाटा हायवे ट्रॅप कार्यालयाकडून जाईल व येईल. खामगांव ते पारस फाटा, पातूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्गे : पारस फाटा, वाशिम बायपास चौक, मार्गे वळविण्यात येईल.
            अकोल्याहून खामगावकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गे : अकोला-पारस फाट्याजवळील रोशन धाबा येथून तपे हनुमान मंदिराजवळील डिव्हायडर बॅरेकेटींग पॉईंट पर्यंत वळविण्यात येईल. हे आदेश सर्व वाहनांना लागू राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...