मुख्य सामग्रीवर वगळा


      
  इडली डोश्याचा 
MBA प्रवास


                                          लेखक
                                ©®मकरंद पिंपुटकर
                              चिंचवड, पुणे, 8698053215

       १९८९ साली हैदराबाद शहरी लक्ष्मणराव शिंदे यांनी आपली सगळी जमापुंजी गुंतवली आणि एक रेकडी - ढकलगाडी विकत घेतली. आपल्या ८ वर्षांच्या मुलाच्या - रामच्या सोबतीने त्यांनी इडली डोश्याचा व्यवसाय सुरू केला. शाळा सांभाळून राम वडिलांना सकाळ - संध्याकाळ मदत करायचा. लक्ष्मणराव रोज वेगवेगळ्या ठिकाणी गाडी लावून नवनवीन ग्राहकांपर्यंत पोचायचे. हातची चव आणि बापलेकांची मेहनत यामुळे व्यवसाय ठीकठाक चालला होता. रोजचे खर्च निभत होते, रामच्या शिक्षणाचा खर्च निघत होता. पण ना धंद्याला म्हणावी तशी बरकत होती, ना गाठीशी पैसे साठत होते. 


       राम शिकत गेला, नुसता पदवीधर नव्हे तर MBA (मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) झाला. आता राम नोकरीसाठी ठिकठिकाणी अर्ज करू लागला, नोकरीच्या शोधात दारोदार फिरू लागला. पण देऊ केला जाणारा पगार त्याला काही पुरेसा वाटत नव्हता.
     आपण आपलाच व्यवसाय नावारूपाला आणावा असंच त्याचं अंतर्मन त्याला सांगत होतं. आणि त्यानं तसंच केलं, तो पूर्णवेळ आपल्या वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाला. वर्ष होतं २०११. 
       पण परिस्थिती आणि उत्पन्न "जैसे थे"च होतं. स्पर्धा होती मॉलमधील गाळ्यांशी आणि आजूबाजूच्या अन्य मोठ्या दुकानांशी - हॉटेल्सशी. लोकांना कमी पैश्यांत आणि कमी वेळात वैविध्य हवं होतं.
       रामने या सगळ्याचा अभ्यास केला, आपलं व्यवस्थापनाचं (मॅनेजमेंट) पुस्तकी शिक्षण प्रत्यक्षात उतरायचं ठरवलं आणि मेनू आमूलाग्र बदलला. साध्या इडली डोश्यांसोबताच आता शेझवान डोसा, चीज डोसा, पिझ्झा डोसा, तवा इडली असे अनेकविध पदार्थ मिळू लागले. या नवनव्या पदार्थांची चर्चा शहरभर होऊ लागली, लोकं त्यांना शोधत येऊ लागले, आता त्यांना रोज वेगवेगळ्या ठिकाणी गाडी लावावी लागत नव्हती. उत्पन्न वाढलं, आणि गंमत म्हणजे ५० रुपयांच्या डोश्यापेक्षा १५० रुपयांच्या पिझ्झा डोश्यावर लोकं जास्त तुटून पडत होते. उत्पन्न वाढू लागलं होतं. 
       लक्ष्मणराव आजही सकाळी ८ वाजल्यापासून व्यवसायाला सुरुवात करत होते. ही वेळ आणखी लवकर करण्याची आयडिया रामला एका ग्राहकाकडून मिळाली. आयटी कंपनीत नोकरी करणारा तो ग्राहक सांगत होता, "आमची रात्रपाळी पहाटे ३ वाजता संपते. तुम्ही त्या वेळेला काही गरमागरम नाश्ता देऊ शकाल का ?"
        बाप लेकांना हा विचार पटला. दुसऱ्या दिवशीपासून पहाटे ३ वाजता त्या भागातल्या आयटी क्षेत्रातल्या चाकरमान्यांना रात्रपाळी संपवून घरी जाताना भरपेट गरमागरम नाश्त्याचा एक समर्थ स्वादिष्ट पर्याय उपलब्ध झाला होता. 
      इतकं उत्पन्न आजवर कधीच मिळालं नव्हतं.
       दहा वर्षांत या रामलक्ष्मणांच्या जोडीने चांगले बस्तान बसवले. २०२० साली त्यांच्या दोन नियमित ग्राहकांनी त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला. जगभरातल्या करोना संकटामुळे हा प्रस्ताव थोडा लांबणीवर पडला पण २०२१ साली "राम की बंडी (हातगाडी)" च्या शहरभर पाच शाखा यशस्वीरीत्या सुरू झाल्या. 
       आज ७० हून जास्त माणसं आता इथं रात्रंदिवस कामाला आहेत आणि रोज हजारो ग्राहक यांच्याकडे क्षुधाशांतीसाठी येतात. खरंतर आता "राम की बंडी" हे फक्त पोट भरण्याचं ठिकाण राहिलेलं नाही, तो एक must visit अनुभव झाला आहे. 
       आता लक्ष्मणराव निवृत्त झाले आहेत. आणि आयुष्यभर जोपासलेल्या रोपाचा, आपल्या मुलाच्या नेतृत्वाखाली विशाल वटवृक्ष झालेला पाहून सुखावलेही आहेत आणि हरखलेही आहेत.
(सत्यघटना)            
(आवडल्यास सामायिक करतांना सत्यकथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच सामायिक करा ही विनंती. - मेघःशाम सोनवणे)
                     00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...