मुख्य सामग्रीवर वगळा


            आरोग्य धनसंपदा
•  तुळशीची पाने रोज चावून खा! 

•   आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी...

                  संकलन-संपादन
          सौ. स्नेहा अ. पाठक,अकोला.

     
पल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते.
       तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने चावून खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, श्वसन संस्थेस मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. या सर्व कारणांमुळेच तुळशीची पाने चावून खाणे ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित  सवय ठरते. 
       तुळशीच्या पानांत नैसर्गिक औषधी गुण असून सर्दी-खोकला आणि ताप यांपासून संरक्षण मिळते, तसेच त्वचेचे आणि पचनाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. तुळशीमध्ये जीवनसत्त्वे सी, ए, के आणि बी-कॉम्प्लेक्स, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम असे विविध पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात, अशा या बहुगुणी औषधी तुळशीची पाने चावून खाण्याचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात... 

     तुळशीची पाने चावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे ... 

1.  रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी :- तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. तुळशीचा अर्क रोगप्रतिकारक पेशींची क्रियाशीलता वाढवतो, ज्यामुळे शरीराचे संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण तुळशीच्या ताज्या पानांचा रस रोज पिऊ शकता. 

2. बीपी आणि शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर :- तुळस त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे, रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानली जाते. क्लीव्हलँड क्लिनिकनुसार , संशोधनातून असे दिसून आले आहे की तुळशीचा रक्तातील साखर कमी करणे आणि रक्तदाब सुधारणे यासह अनेक चयापचय प्रक्रियांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

3. हृदयाचे आरोग्य वाढवते :- तुळशीची पाने हृदयाशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास देखील मदत करतात. तुळशीची पाने रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल सुधारून हृदय निरोगी ठेवतात.

4.  स्ट्रेसपासून मिळेल आराम :- तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास देखील मदत होईल. खरंतर, तुळशीमध्ये अ‍ॅडॉप्टोजेन गुणधर्म असतात. तुळशीतील हा असा एका नैसर्गिक गुणधर्म आहे, जे शरीराला ताणतणावाचा सामना करण्यास आणि मानसिक संतुलन वाढविण्यास मदत करतात.

5. शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी :- शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळशीमुळे शरीरातील ऊर्जा वाढते, यासाठी रोज तुळशीचे पाने चावून खाल्ल्याने अनेक फायदे तर होतात सोबतच शरीरातील एनर्जी देखील वाढते.
.
6. सर्दी आणि  खोकल्यापासून आराम :- आयुर्वेदात, तुळशीला खोकला, सर्दी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या आजारांवर प्रभावी उपाय मानले जाते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...