मुख्य सामग्रीवर वगळा


किशोर बळी यांचा तुफान विनोदी एकपात्री प्रयोग ' सारं गाव मामाचं'...


#लोकरंग_सादर_करीत_आहे..!!
* एप्रिल महिन्यात मधुरा वेलणकर यांच्या प्रसिद्ध ' मधूरव' या यशस्वी कार्यक्रमानंतर लोकरंग घेऊन येत आहे किशोर बळी यांचा तुफान विनोदी एकपात्री प्रयोग ' सारं गाव मामाचं'...
      लोकरंग चे सभासद होण्यासाठी तातडीने संपर्क साधा... ग्रामपंचायत टुनकी (डिजिटल) आपले सहर्ष स्वागत करीत आहे... टाईमातला टाईम काढून अन सतरा कामं बाजुले ठेवून या लागतेच बरं ! 

▪️'लोकरंग'चे अध्यक्ष मा.अनिलभाऊ गावंडे, उपाध्यक्ष भारतदादा गणेशपुरे अन पुऱ्या टीमनं आकोलेकर रसिकाईसाठी किशोर बळी यांचा पहिला एकपात्री नाट्यप्रयोग नि:शुल्क आयोजित करेल हाये. मात्र प्रवेशिका आवश्यक हाये. प्रवेशिका आकोल्यात कुठी भेटतील, ते पोस्टरवर वाचा. 

▪️मर्यादित आसनसंख्या अन 'प्रथम प्रवेश प्रथम प्राधान्य' असा हिशोब असल्याच्यानं उशिरा आल्यावर जागा भेटनच, याची गॅरंटी नाई. 

▪️आकोल्यात वर्षातून असे पाच कार्यक्रम होतील. मेम्बर व्हासाठी एक अनामत रक्कम अन वार्षिक शुल्क राहील. त्याबद्दल पोस्टरवार वाचा. काहून की दोन कार्यक्रम फ्री झाले, पुढच्या कार्यक्रमात फक्त मेम्बर मंडळीलेच प्रवेश भेटीन. 

▪️तं मंग आता कायचा इचार करून राह्यले ? अस्सल वऱ्हाडी दोन डझन भूमिका साकारत अख्खी टुनकीची जत्रा घेऊन आम्ही येऊन राह्यलो, तुम्हीबी नक्की येजा. पह्यला प्रयोग आपल्या आकोल्यात -  'सारं गाव मामाचं ...' 😄😄 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...