मुख्य सामग्रीवर वगळा

•  अॕड. गजानन पुंडकर स्वागताध्यक्ष 
•  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार 



अमरावती दि. 30 :   अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अॕड. गजानन पुंडकर यांची यावर्षीच्या राज्यस्तरीय आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार समारोहाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे. हा सत्कार समारंभ येत्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीच्या शेगाव नाका चौकातील अभियंता भवन मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी  व युवा संवाद प्रतिष्ठान यांच्या वतीने संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती मधील सर्व सनदी अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असून यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आय ए एस ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दहा विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्याबरोबर त्यांच्या आई वडिलांचाही सत्कार या कार्यक्रमात संपन्न होणार आहे.

आपल्या विदर्भात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविण्यासाठी श्री गजानन पुंडकर यांनी सातत्याने पुढाकार घेतला असून त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.याशिवाय त्यांनी दुसऱ्या वर्गापासून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण हा उपक्रम त्यांच्या अकोला जिल्ह्यातील अकोटच्या श्री शिवाजी विद्यालयात प्रारंभ करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याशिवाय अखिल भारतीय कुर्मी महासभेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षा कार्यशाळा उपक्रमात हे विविध शहरात सहभागी झालेले आहेत. त्यांची स्पर्धा परीक्षेमधील ही रुची लक्षात घेता मिशन आय ए एस च्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या  सभेत सर्वानुमते त्यांचे नाव स्वागताध्यक्ष पदासाठी निवडले गेले आहे .
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी आपण स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व यावर्षी आयोजित झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून यापुढेही आपण सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यासाठी नियोजन करीत आहोत
 येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये या नियोजनाची अंमलबजावणी होणार असून विदर्भातील स्पर्धा परीक्षेची टक्केवारी वाढावी हा या मागचा उद्देश असल्याचे त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले आहे. 
डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने दरवर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार घडवून आणते. आतापर्यंत या उपक्रमांमध्ये जवळपास 373 आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहे. एखाद्या संस्थेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने आयएएस अधिकारी सहभागी होणारी ही एकमेवऐडवोकेट धआयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन याप्रसंगी स्वागताध्यक्ष या नात्याने एडवोकेट गजानन पुंडकर यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...