मुख्य सामग्रीवर वगळा


• बहूगुणी जिरा...
• दैनंदिन जीवनातील उपयोग...

संकलन-संपादन
अभय संजयराव पाठक

      बदलत्या जीवनशैली मुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका संभवतो. कोलेस्टेरॉल वाढल्याने ह्रदय विकार उद्भवू शकतात. जिरे दररोज सातत्याने सेवन केले तर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
      वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक डाएट केले जातात. जिरे गरम पाण्यात उकळून त्याचे दररोज सकाळी अनाशापोटी सेवन केले तर वजन कमी होते असे सिद्ध झाले आहे.
       मुळव्याधीवरही जिरे हा रामबाण उपाय आहे. जिरे, सैंधव मीठ आणि ताक एकत्र करून पिल्यास मुळव्याधीपासून आराम मिळतो.
       सांधेदुखी चा त्रास हा अत्यंत त्रासदायक असतो. सांधेदुखीवरही जिरे इलाज करू शकतात. जिरे, मेथ्या, ओवा, बडीशेप इत्यादि घटकांना बारीक वाटून हे चूर्ण दररोज खाल्ले तर सांधेदुखी वर आराम मिळतो.


       बदधकोष्ठतेमुळे बैचेन झाल्यासारखे होते व यावर मात्रा म्हणून ताक, सैंधव मीठ आणि जिरे पावडर एकत्र करुन त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
       उलटी किंवा मळमळ होत असेल तर जिरे चावून खावे. जिरे चावून खाल्ल्याने त्याच्या रसामुळे उलटी व मळमळ थांबते.
      जिरे हे पित्तशामक आहे त्यामुळे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी जिरे व धन्याची पूड खडीसाखर सोबत सेवन केल्यास करपट ढेकर येणे, छातीत जळजळ होणे ही लक्षणे दूर केली जाऊ शकतात.
      काही व्यक्तींना सर्वच हंगामात सर्दीचा त्रास होतो. सर्दीचा त्रास दूर करण्यासाठी सुद्धा जिरे प्रभावी उपाय आहे. जिरे थोडेसे भाजून ते रूमालात बांधून त्याची पोटली तयार करून ती नाकाने हुंगावी यामुळे काही काळानंतर सर्दीचा त्रास कमी होतो.
       सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पोट फुगणे, गँसेस या समस्या  मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे आढळून येते. यावर उपाय म्हणून जिरे, लिंबू आणि सैंधव मीठ यांचे मिश्रण मुरवून ते सेवन करावे.
       जिरे हे तापशामक व उष्णताशामक आहे. सातत्याने तापाची कणकण येत असेल तर खूप पूर्वीपासून जिरे वापरले जाते. जिरे आणि जुना गूळ एकत्र करून त्यांच्या छोट्या छोट्या गोळ्या करून या गोळ्यांचे एकवीस दिवस रोज सकाळ संध्याकाळ सेवन केले तर तापाची कणकण दूर होऊ शकते. याखेरीज जिरे पावडर आणि दूधाचे मिश्रण पिण्याचाही सल्ला ताप आल्यावर दिला जातो. उष्णतेमुळे ओठ किंवा तोंडावर जर आल्याचे दिसून येते. अशावेळी उष्णता शामक जिरे वाटून त्याचा लेप जर आलेल्या ठिकाणी लावावा.
      पचनसंस्थेशी निगडित निरनिराळ्या विकारांवर जिरे खूप प्रभावी ठरते. जि-यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीआँक्सिडंट असतात ज्यामुळे चयपचयाच्या कार्यात मोठी भूमिका बजावणा-या आतड्यांना निरोगी राखले जाते व परिणामी पचनक्रिया नीट पार पाडली जाते. पोटाशी निगडीत अजून एक समस्या म्हणजे जंत किंवा कृमी होय, जिरे जंतांचासुद्धा नायनाट करतात. पोटामध्ये वायू धरण्याच्या समस्येवर सुद्धा जिरे मात करु शकतात. पोटाशीनिगडीत अपचन, गँसेस, शौचास त्रास होणे, यांसारख्या समस्या जिरे नियमित सेवन केल्यास दूर ठेवता येऊ शकतात. भूक वाढण्यासाठी जिरे हा उत्तम पर्याय आहे.... जिरे, आवळा, काळे मीठ आणि ओवा यांच्या मिश्रणाचे नियमित सेवन केल्यास भूक वाढते व खाल्लेले अन्न चांगले पचते.
       जी-यामध्ये  एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असतात. जि-यामध्ये शरीराला उपयुक्त असणारे अनेक  क्षार सुद्धा असतात. जि-यामध्ये पॉटेशिअम (Potassium), मँगनीज, कॅल्शिअम (Calcium), झिंक (Zinc) आणि मॅग्नेशिअम (Magnesium यांसारखे उपयुक्त घटक असतात. जिरे हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा प्रमुख स्त्रोत आहे.
       जीरे हे  कफनाशक, पित्तशामक गुणधर्म असलेले आहे. जि-या मुळे भूक वाढण्यास साहाय्य मिळते. जि-या मुळे जुलाब थांबण्यास मदत मिळते. जिरे हे उलटी, मळमळ, अपचन इत्यादी त्रासांवर आरामदायी उपाय आहे.
वजन कमी करण्यासाठी सुद्धा जिरे सेवन केल्यास प्रभावी  फरक दिसून येतो.

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...