• डॉ. तरंगतुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आवाहन
• देशभक्तीचा नारा ! प्रत्येकाने पाच नागरिकांना व्यसन मुक्त करा
आज दि ३१/५/२५ रोजी अकोला येथे जिल्हाधिकारी अजित कुंभार , अर्चीत चांडक जिल्हा पोलिस अधीक्षक , डॉ तरंगतुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय ,डॉ संतोष सोमाणी आय एम ए अध्यक्ष डॉ सोनल मोदी मुक्ती फाउंडेशन अध्यक्ष, डॉ विनोद करंजीकर माता बाल संगोपन अधिकारी,डाँ आशिष गिर्हे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अकोला डॉ प्रिती कोगदे तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ,डॉ प्रदीप अग्रवाल, डॉ गोविंद खंडेलवाल ,डॉ मयूर अग्रवाल यांचे सहभागात जागतीक तंबाखू विरोधी दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला .
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक गंभीर आजार होत आहेत याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून यात तरून तरुणी सक्रिय होत आहेत हि फार गंभीर बाब आहे तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर परिणाम व त्यापासून दूर राहाण्यासाठी जनजागृती म्हणून आज अजित कुंभार जिल्हाधिकारी यांचे हस्ते उदघाटन करुन अकोला शहरातून भव्य रॅली काढण्यात आली विविध घोषणा सुचणा फलक बॅनर माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले रॅली संपल्यानंतर आँडोटोरियम हाँल जिल्हा रुग्णालय येथे कर्करोग तज्ञ डॉ प्रसाद सर डॉ बगडिया डॉ गौरव मंत्री मानसोपचार तज्ञ डॉ अमोल केळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले जागतीक तंबाखू दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा पथनाट्य स्पर्धा व्हिडिओ रिल स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते यामधुन प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात आले होते त्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रतेक उपस्थितांधी किमाण पाच जणांना व्यसनमुक्त करण्याचे आवाहन केले.डाँ सोमाणी यांनी या लढ्यात सातत्य ठेवण्याचे आश्वासन दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे वडीलांचे अनुभव सांगुन या लढ्यासाठी (व्यसनमुक्ती) सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ प्रिती कोगदे श्री धम्मसेन शिरसाट श्री जानराव अवघड डॉ शितल मस्के आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी मुक्ती फाउंडेशन सदस्य आय एम ए सदस्य यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ निखील महाजन डॉ मयुरी महाजन यांनी केले कार्यक्रमासाठी विविध अधिपरीचारीका महाविद्यालयाचे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा