मुख्य सामग्रीवर वगळा

 


•  विकासकामे गुणवत्ता राखून  वेळेत पूर्ण करा – खासदार अनुप धोत्रे



•  जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक 

अकोला, दि २८: केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यात रस्ते, स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. विविध विकासकामांचे नियोजन करून सर्व कामे गुणवत्तापूर्ण व विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे दिले.  जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार श्री. धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्जित चांडक,जि प मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोज जाधव महापालिका आयुक्त सुनील लहाने आदी उपस्थित होते. खासदार धोत्रे म्हणाले की, पायाभूत सुविधा, आवास योजना व सामान्य माणसाचे जीवनमान सुकर करण्यासाठी अनेकविध योजना केंद्र शासनातर्फे राबवल्या जातात. त्यांची परिपूर्ण अंमलबजावणी व्हावी. कामे कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

शहरांमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेत व्यसनाधीन व्यक्तींचा वावर आढळतो. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात व्यसनी व्यक्ती टोळक्याने बसलेल्या आढळतात त्यांच्यावर वेळीच कारवाई झाल्यास भविष्यातील चुकीच्या घटना थांबवता येतील, अशीही सूचना त्यांनी केली.मुर्तीजापुर रेल्वे स्थानकाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तपासणी आवश्यक असल्याचेआ. पिंपळे यांनी सांगितले. या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून यामध्ये दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश खासदार  श्री. धोत्रे यांनी दिले. पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते खणले जातात. त्याची वेळेत दुरुस्ती होत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या मुद्द्याकडे आमदार श्री. पिंपळे व आमदार श्री. भारसाकळे यांनी लक्ष वेधले. कुठल्याही कामासाठी ठराविक ठिकाणी रस्ता खणला गेला तर वेळेत दुरुस्ती केली पाहिजे. अशा रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती वेळीच करण्याचे निर्देश खासदार  श्री. धोत्रे यांनी दिले. सार्वजनिक प्रसाधनगृहांची कामे गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी कृषी सिंचन योजना,मनरेगा, समग्र शिक्षा अभियान, संयुक्त शाळा अभियान, निपुण भारत, राष्ट्रीय पोपण अभियान, पीएम उज्ज्वला योजना, अन्नपूर्णा योजना, ई- नाम पोर्टल, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा योजना आदी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना 25 जून पूर्वी शालेय गणवेशाचे वाटप तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करावे, अशी सूचना आमदार श्री. पिंपळे यांनी केली.

             


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...