मुख्य सामग्रीवर वगळा

 


•   अमरावती येथे  आयएएस  विद्यार्थ्यांचा सत्कार 

•  प्राचार्य डॉ. कमलताई गवई ह्या उपस्थितीत


 
       (प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे)
अमरावती :
यंदाच्या निकालात आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येत्या 6 जून रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीच्या  शेगाव नाका चौकातील अभियंता भवनात आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. लेडी गव्हर्नर व सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी विराजमान झालेले श्री भूषण गवई यांच्या मातोश्री प्राचार्य डॉ. कमलताई गवई ह्या उपस्थित राहणार आहेत.            या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल पोलीस महानिरीक्षक श्री रामदास पोकळे,  जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजीता महापात्रा, तसेच अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन कलंत्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद व मुद्रांक जिल्हाधिकारी श्री अनिल औतकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 
       या कार्यक्रमांमध्ये यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण झालेले कुमारी अदीबा अनम यवतमाळ,  श्री रजत पत्रे  धामणगाव रेल्वे,   डॉ. जयकुमार आडे यवतमाळ, कुमारी नम्रता ठाकरे वरूड,  कुमारी मोहिनी प्रल्हाद खंडारे बुलढाणा,  डॉ कु. अश्विनी धामणकर मंगरूळपीर,  श्री अभय देशमुख यवतमाळ,  डॉ. पंकज पटले गोंदिया  यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. 
        या कार्यक्रमात हे सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकॅडमीच्या मिशन आयएएस व युवा संवाद प्रतिष्ठान यांच्या वतीने संयोजक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व श्री नितीन पवित्रकार यांच्या वतीने करण्यात आले आहे. 
      या सत्काराला व स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती मिशन आय ए एस.चे अध्यक्ष श्री डी व्ही मोडक, कार्याध्यक्ष श्री नरेंद्र बोरकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. रा गो चवरे,  सहसंचालक श्री राजेंद्र इंगोले यांनी एका संयुक्त प्रसिद्धी पत्रकार द्वारे  केली आहे. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...