मुख्य सामग्रीवर वगळा



श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे  सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराचा समारोप

नव्या पिढीला संस्कार देण्यासाठी शिबिरासारखे उपक्रम महत्वपूर्ण

– पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर


        अकोला : मोबाईल आणि नवमाध्यमांच्या या युगात नवी पिढी अध्ययन, जीवनमूल्ये व संस्कार यापासून दुरावता कामा नये. मुलांना ही शिकवण व संस्कार देण्यासाठी सर्वांगीण विकास शिबिरासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.

      अकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराचा समारोप पालकमंत्री श्री. फुंडकर यांच्या उपस्थितीत झाला. श्री क्षेत्र आळंदी (देवाची) येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या उपशाखेचे उद्घाटनही यावेळी झाले. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे, ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले, प्रकाश महाराज जवंजाळ, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आदी यावेळी उपस्थित होते.
         पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, पाठांतर, ओव्या, अध्याय, बालमनावर सुसंस्कार करणाऱ्या पारंपरिक अध्ययन पद्धती यांची जपणूक संस्थेतर्फे बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून होत आहे. नवमाध्यमांच्या काळात नवी पिढीला आपल्या महान परंपरा व प्राचीन वारसा, मूल्ये यांची शिकवण देण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न होत आहेत. संस्थेच्या कार्यासाठी व पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासन स्तरावरून मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
       प्रारंभी पालकमंत्री श्री. फुंडकर यांनी श्री वासुदेव महाराज यांच्या पादुका व प्रतिमेचे दर्शन घेतले. संस्थेच्या भोजनगृहाचे भूमिपूजन यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गीतेतील श्लोकांचे सादरीकरण केले. शिबिरातील गुणवंतांना यावेळी गौरविण्यात आले.
०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...