मुख्य सामग्रीवर वगळा

"ज्ञानोबा-तुकाराम" तसेच विठ्ठल नामाचा अखंड गजर करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा भक्तिमय वातावरणाने भारावून टाकली. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग, भारूड आणि गौळण सादर केली

आषाढी एकादशीचा पालखी सोहळा


खंडेलवाल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर  पालखी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन
🔷अकोला : स्थानिक गोडबोले प्लॉट डाबकीरोड स्थित खंडेलवाल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर  पालखी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री. विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदंग, भगवे ध्वज आणि तुळशीची रोपे हातात घेऊन पालखीची मिरवणूक काढली.


         "ज्ञानोबा-तुकाराम" तसेच विठ्ठल नामाचा अखंड गजर करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा भक्तिमय वातावरणाने भारावून टाकली. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग, भारूड आणि गौळण सादर केली.  पंढरपूर मध्ये पोहोचणाऱ्या पालखी पैकी मुख्य पाच ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान देव आणि मुक्ताबाई यांच्या पालख्यांचे प्रदर्शन करण्यात आले.  त्यादरम्यान रिंगण सोहळ्याचे आयोजन सुद्धा केले होते.
       कार्यक्रमाचे सूत्रांचलन कु.ओवी चीने आणि प्रणाली शेलार यांनी केले.  अभंग  कु.मनस्वी चेडगे आणि भारुड कु.वनश्री कौलकर तसेच सहकारी यांनी सादर केले.
       शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री पांडे यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतांच्या विचारांची माहिती दिली.
        या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त, एकता आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदराची भावना निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
०००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
(P. R. O.)
संवाद : 9371854706      
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी) 

 डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
हत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .
Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706
  _____________________________________


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...