यावेळी महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ. संजय गरकल,महाव्यवस्थापक (विपणन) व्ही.आर.देशमुख,महाव्यवस्थापक (प्रक्रिया)पी. जी. पागृत,महाव्यवस्थापक (उत्पादन)व्ही. व्ही. ठाकरे, प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक गुणी,श्री.यादव महा व्यवस्थापक वित्त यांच्यासह महाबीज मुख्यालयातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाबीज मुख्यालयात निनादले भक्तिगीतांचे सूर
महाबीज मुख्यालयात आषाढी महोत्सवानिमित्त 'भक्तिरंग’ कार्यक्रम
✍🏻अकोला : पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून भावभक्ती, समता, विज्ञानवादी विचारांचा संदेश देणारी वैश्विक ओळख आहे. संतांनी मांडलेले विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे जीवनात यश आणि समृद्धीची कापणी करायची असेल, तर भक्ती आणि सकारात्मक विचारांची पेरणी करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या मुख्यालयात आषाढी महोत्सवाच्या निमित्ताने
पार पडलेल्या भक्तिरंग कार्यक्रमात बोलत होते..
यावेळी महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ. संजय गरकल,महाव्यवस्थापक (विपणन) व्ही.आर.देशमुख,महाव्यवस्थापक (प्रक्रिया)पी. जी. पागृत,महाव्यवस्थापक (उत्पादन)व्ही. व्ही. ठाकरे, प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक गुणी,श्री.यादव महा व्यवस्थापक वित्त यांच्यासह महाबीज मुख्यालयातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री.स्वामी पुढे म्हणाले की, ज्याचा अंत आणि पार आजवर कुणालाही कळला नाही तो पंढरीचा पांडुरंग प्रत्येक भक्ताला आपल्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे वाटतो. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी पंढरीची वारी अनुभवली पाहिजे.
महाबीजचे संचालक श्री.देशमुख म्हणाले की,संतांच्या विचारांचा वारसा समाज कल्याणासाठी प्रेरणादायी असून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करणाऱ्या महाबीजसाठी ‘भक्तिरंग’सारखे सांस्कृतिक उपक्रम सकारात्मक ऊर्जा, सामाजिक बांधिलकी आणि मूल्यांची जपणूक करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतील.
कार्यक्रमात गायक राजेश सोनोने,गायिका कविता वरघट यांच्या सुमधुर सुरात तबलावादक सागर म्हसाळ, कीबोर्ड स्वप्नील शिरसाट,आकटोपॅड वादक मनीष हुडेकर यांच्या संगीतमय साथीने माझे माहेर पंढरी,‘नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’, ‘शोधिसी मानवा’, ‘विठू माऊली तू माऊली जगाची’, ‘ऐरणीच्या देवा तुला’कानडा राजा पंढरीचा, बाजे रे मुरलीया बाजे, माऊली माऊली यांसह विविध भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले.भक्तिरसपूर्ण गीतांनी महाबीज मुख्यालयाचा परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमूनला.भक्तिरंग कार्यक्रमाचे संचलन प्रा.नाना भडकेयांनी,तर प्रास्ताविक श्री.गरकल यांनी केले.
०००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
(P. R. O.)
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी)
डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावतीसंवाद : 9371854706महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706 ____________________________ _________
डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
संवाद : 9371854706
महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .
Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706
____________________________ _________




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा